सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा “झुंड” या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून अनेकांना तो पसंत पडत आहे.सोशल मीडियात यावर आता चर्चा सुरु झाली आहे.‘बिग बी’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.झुंड (jhund movie ) हा चित्रपट झोपडपट्टीतील मुलांच्या जीवनावर आधारीत आहे.
झुंड चित्रपट रिलीज होतोय
अमिताभ बच्चन यांनी सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून चित्रपटाची रिलीज डेट कळवली होती.मात्र हि तारीख आता बदलून ४ मार्च रोजी हा झुंड हा चित्रपट सर्व चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.“कोरोनाने आपल्याला अनेक झटके दिले, मात्र आता पुनरागमन करण्याची वेळ आली आहे. आपण थिएटर्समध्ये परतलो आहोत. झुंड सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे” अमिताभ बच्चन यांनी झुंड सिनेमाचे पोस्टर शेअर करत अशा शब्दात कॅप्शन लिहिली.
झुंड चित्रपट रिलीज डेट
4th मार्च 2022 रोजी झुंड हा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होतो आहे.
चित्रपटाचा ट्रेलर तीन तासात व्हायरल
चित्रपटाचा ट्रेलर आज संध्याकाळी युट्युबवर रिलीज करण्यात आला.त्याला अवघ्या तीन तासातच तब्ब्ल 8 लाख पेक्षा जास्त views मिळाल्याचे पाहायला मिळाले.तसेच इतर सोशल मिडियातही झुंड च्या ट्रेलरचीच चर्चा दिसत असून अनेकांना हा ट्रेलर पसंत पडला असून लोकांना आता चित्रपटाची उत्सुकता आहे.
सत्य घटनेवर आधारित आहे हा चित्रपट
या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे.झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून जातं.असे या चित्रपटाचे कथानक आहे.हा चित्रपट सत्यकथेवर आधारित असून नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची स्क्रीप्ट लिहिण्यासाठी सुमारे दोन वर्ष वेळ घेतला. अमिताभ बच्चन यांना नजरेसमोर ठेवूनच नागराज यांनी ही स्क्रीप्ट लिहिली असल्याचे समजते.ज्या विजय बारसेंवर झुंड हा सिनेमा आधारित आहे, त्यांनी अनेक मुलांचं आयुष्य बदलून टाकलं आहे. विजय बारसे एका कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक होते. निवृत्तीनंतर त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण दिलं.
डॉ.आंबेडकरांचे पोस्टर होत आहे व्हायरल
चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका दृश्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची फ्रेम असलेलं पोस्टर सध्या सोशल मीडियात प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
जेष्ठ पत्रकार दिलीप मंडल म्हणतात,“हिंदी चित्रपटसृष्टीच्या 110 वर्षात, बॉलीवूडमधील कोणत्याही चित्रपटात अशी फ्रेम आम्ही पाहिली नाही.मात्र झुंड मध्ये ती पाहू शकतोय.या बदलाचे स्वागत.”
फिल्ममेकर सोमनाथ वाघमारे यांनीही या पोस्टर बद्दल म्हटलंय की “गेल्या शंभर वर्षात हिंदी सिनेमात आम्ही अशी फ्रेम कधी पाहिली नव्हती.पण आता बदल झाला आहे.त्याचे स्वागत करतो.”
झुंड चित्रपट कलाकार
झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan as Vijay Barse) , आकाश ठोसर (Akash Thosar as Sambhya), रिंकू राजगुरू (Rinku Rajguru), विकी कदीयन (Vicky Kadian as Abhijeet Barse, Vijay’s son) आणि गणेश देशमुख (Ganesh Deshmukh) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Pushpa movie box office collection|पुष्पा फिल्म बॉक्स ऑफिस
बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिवजयंती च्या मिरवणुकीत सामील होतात
आंबेडकर आणि पेरियार यांचं भगत सिंग यांच्या बलिदानावर मत..
व्हॅलेंटाईन डे – मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 23, 2022 20:50 PM
WebTitle – Jhund Movie Trailer out Ambedkar’s poster goes viral Find Out Release Date