ज्येष्ठ अभिनेत्री जयाप्रदा यांना चेन्नई न्यायालयाने ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच त्याच्यावर ५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. एका सिनेमा हॉलच्या कर्मचाऱ्यांनी जया प्रदा आणि त्यांच्या बिझनेस पार्टनर विरोधात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात अभिनेत्रीसह राम कुमार आणि राजा बाबू दोषी आढळले होते.दोघेही त्यांचे व्यावसायिक भागीदार आहेत. राम कुमार आणि राजा बाबू सिनेमा हॉल चालवत होते. त्यांनी सिनेमा हॉल कर्मचाऱ्यांचा ईएसआय न भरल्यानं वाद निर्माण झाला होता,त्यांनंतर कामगारांनी तक्रार दाखल करत कायदेशीर मार्गाने लढा दिला.
काय आहे संपूर्ण प्रकरण
रिपोर्टनुसार, जया प्रदा आणि त्यांचे बिझनेस पार्टनर चेन्नईमध्ये एक सिनेमा हॉल चालवत होते पण तोटा सहन करून तो बंद करण्यात आला होता. तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जयाप्रदा यांच्यावर पगारातून कापलेली ईएसआय रक्कम न भरल्याबद्दल गुन्हा दाखल केला.त्यानंतर लेबर गव्हर्नमेंट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने चेन्नई येथील एग्मोर मॅजिस्ट्रेट कोर्टात जया प्रदा, राम कुमार आणि राजा बाबू यांच्याविरुद्ध खटला दाखल केला.याप्रकरणी न्यायालयानं जयाप्रदा आणि संबंधितांना शिक्षा सुनावलीय.
जया प्रदा यांनी कर्मचाऱ्यांची थकबाकी देण्याचे आश्वासन दिले होते. खटला फेटाळण्याची विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली पण न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळले.
जयाप्रदा यांच्या खास गोष्टी
जया प्रदा या ७० आणि ८० च्या दशकातल्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. हिंदी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी तेलुगूमध्ये अनेक चित्रपट केलं होतं. त्यांच्या काळातील त्या सुंदर अभिनेत्रींमध्ये गणल्या जात होत्या. जीतेंद्रसोबतची तिची जोडी चांगलीच गाजली. जयाप्रदा यांच्या प्रमुख चित्रपटांमध्ये ‘तोहफा’, ‘संजोग’, ‘कामचोर’, ‘शराबी’, ‘आखरी रास्ता’, ‘ठाणेदार’, ‘आज का अर्जुन’ आणि ‘मां’ यांचा समावेश आहे.
जयाप्रदा रामपूरमधून दोनदा खासदार
जयाप्रदा यांची राजकीय वाटचाल तेलगू देसम पक्षासोबत सुरू झाली होती.
त्यानंतर समाजवादी पार्टी ने त्यांना रामपूर लोकसभेत दोनदा प्रतिनिधीत्व दिले.
२००४ आणि २००९ मध्ये त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत रामपूर मध्ये विजय मिळवला होता.
नंतर सपामधून त्या बाहेर पडल्या आणि त्यांनी २०१४ मध्ये बिजनौर येथून आरएलडीच्या तिकिटावर निवडणूक लढवली,
पण यावेळी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपनेही त्यांना उमेदवारी दिली. मात्र, यावेळीही त्यांना पराभव पत्करावा लागला.
जयाप्रदाची राजकीय वाटचाल 1994 मध्ये तेलगू देसम पक्षासोबत सुरू झाली होती.
जयाप्रदा प्रथम १९९६ मध्ये आंध्र प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या.
त्यानंतर त्यांना समाजवादी पार्टी ने २००४ मध्ये उमेदवारी दिली होती.आता त्या भारतीय जनता पक्षात आहेत.
Jayaprada hit songs
भारतीय चित्रपट सृष्टीतील सुवर्ण पाने
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 12,2023 | 11:30 AM
WebTitle – Jayaprada was sentenced to 6 months and fined 5 thousand