मुंबई: 31-07-2023 जयपूर एक्सप्रेस गोळीबार : महाराष्ट्रातील पालघर रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानाने रेल्वेत चढलेल्या चार जणांची गोळ्या झाडून हत्या केली. जवानाने आपल्या स्वयंचलित शस्त्राने गोळीबार केला. ही ट्रेन जयपूरहून मुंबईला येत होती.महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून पालघरचे अंतर सुमारे 100 किमी आहे. पालघर स्टेशन ओलांडल्यानंतर आरपीएफ कॉन्स्टेबलने मुंबईकडे जाणाऱ्या चालत्या ट्रेनच्या बी-४ बी-५ बोगीमध्ये गोळीबार केला.त्याने एक आरपीएफ एएसआय आणि इतर तीन प्रवाशांना गोळ्या घालून बोरिवली स्थानकाजवळ साखळी ओढून ट्रेनमधून उडी मारली. पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपी हवालदार चेतनला शस्त्रासह जीआरपीने ताब्यात घेतले आहे.
जयपूर एक्सप्रेस गोळीबार हल्ला झाला तेव्हा काहीच समजलं नसल्याचं प्रवाशांनी सांगितलं. ट्रेनमध्ये अचानक गोळीबार सुरू झाला. घबराट पसरली. बोगी सोडून प्रवासी इकडे तिकडे धावू लागले. काहींनी मुलांना लपवून धावत सुटले तर काहींनी सामान घेऊन पळ काढला.काही लोकांना रेल्वे अपघात झाल्यासारखे वाटले,एका प्रवाशाने सांगितले की, गोळीबार झाला तेव्हा तो झोपला होता. अचानक मोठा आवाज ऐकू आला आणि मी घाबरलो. सुरुवातीला त्यांना रेल्वे अपघात झाला असावा असे वाटले. सकाळी आवाजाने डोळे उघडले अन समोरचं दृश्य हादरवून टाकणारं होतं समोर रक्ताचा सडा असलेले मृतदेह पडले होते.ते पाहून मी घाबरलो आणि सीटच्या कोपऱ्यात घाबरून बसलो.
“पहाटे पाचच्या सुमारास गोळीबाराचा आवाज आला. मी एसी कोचच्या दिशेने गेलो तर तिथे मृतदेह पडलेले दिसले. पोलीस हवालदाराच्या हातात रिव्हॉल्व्हर असून तो डब्यात इकडे तिकडे फिरत होता. एएसआय सर खाली पडले होते.”
लोकांना वाटलं हा ‘दहशतवाद्यांचा हल्ला’
एका प्रवाशाने सांगितले की, प्रवाशांवर अचानक गोळीबार सुरू झाल्याने तो घाबरला, हा दहशतवादी हल्ला झाला आहे असे वाटले.हातात शस्त्र घेऊन एक व्यक्ती गोळीबार करत होती,डोळे उघडले तेव्हा समोर हे भयानक दृश्य होतं,हाबाजूला रक्ताने माखलेले मृतदेह पडलेले दिसले.त्यामुळे हा प्रवासी ती बोगी सोडून दुसऱ्या डब्याकडे धावला.
‘मुलांसह ट्रेनमधून उडी मारली’
काही प्रवाशांनी सांगितले की, गोळ्यांचा आवाज ऐकून ते इतके घाबरले होते की त्यांना काहीच समजले नाही.
ट्रेनचा वेग कमी झाल्याने त्याने उडी मारली.चालत्या ट्रेनमधून उडी मारल्याने अनेक प्रवाशांना दुखापतही झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोपी आपल्यावर गोळीबार करतील या भीतीने अनेक महिलांनी आपल्या मुलांना छातीशी धरून जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधून उड्या मारल्या
जाणून घ्या कारण,का केला गोळीबार ?
रिपोर्ट्सनुसार, कॉन्स्टेबल चेतन चा त्याच्या सहकाऱ्याशी वाद झाला आणि काही लोकांनी हस्तक्षेप केला तेव्हा आरोपींनी गोळीबार केला, ज्यात चार जण ठार झाले.गोळीबाराची ही घटना 31 जुलै रोजी पहाटे 5.23 वाजता ट्रेन क्रमांक 12956 जयपूर एक्सप्रेसमध्ये घडली. बोगी B-5 मध्ये गोळी झाडली. एस्कॉर्ट ड्युटीवर तैनात असलेल्या सीटी चेतनने एस्कॉर्ट इनचार्ज एएसआयवर गोळीबार केला. गोळीबार करून तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला भाईंदर चौकीजवळ पकडण्यात आले.
एका रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल चेतन ने त्याच्या स्वयंचलित पिस्तूल मधून सकाळी 5 च्या सुमारास हा गोळीबार केला,
गोळीबारात RPF ASI आणि ट्रेनमधील इतर 3 प्रवाशांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्याने सांगितलं की,
चेतन कुमार चौधरी ने चालत्या ट्रेनमध्ये त्याच्या एस्कॉर्ट ड्युटीचे प्रभारी एएसआय टिका राम मीणा यांच्यावर गोळीबार केला.
आपल्या वरिष्ठाची हत्या केल्यानंतर हवालदाराने दुसऱ्या कोचमध्ये जाऊन आणखी तीन प्रवाशांची गोळ्या झाडून हत्या केली.
गोळीबारादरम्यान मारेकरी आरपीएफ जवान चेतन कुमार याने ट्रेनमध्ये 12 राऊंड गोळीबार केल्याचे वृत्त आहे.
चेतन कुमार कुठला आहे?
चेतन कुमार हा उत्तर प्रदेशातील हाथरसचा रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.
तर, गोळीबारात शहीद झालेले आरपीएफचे सहायक उपनिरीक्षक टिका राम मीना हे राजस्थानमधील सवाई माधोपूरचे होते.
मीना 2025 मध्ये निवृत्त होणार होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि 80 वर्षांची आई असा परिवार आहे.
त्यांचा 35 वर्षांचा मुलगा आणि 25 वर्षांच्या मुलीचे लग्न झाले आहे.
कुटुंबासाठी ₹ 25 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून याशिवाय ₹ 15 लाखांची अतिरिक्त मदत देण्यात येणार असल्याचे कळते.
रेल्वे अपघातग्रस्तांना भरपाई देईल
इतर बळींच्या नातेवाईकांनाही भरपाई दिली जाईल, असे रेल्वेने म्हटले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन आणि मीना यांच्यासह एकूण चार आरपीएफ जवान एस्कॉर्ट ड्युटीसाठी गुजरातमधील सुरत स्टेशनवरून ट्रेनमध्ये चढले होते.सुरक्षेसाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये एस्कॉर्ट तुकड्या तैनात केल्या जातात. ड्युटीवर असलेल्या दोन आरपीएफ कर्मचार्यांचीही चौकशी करण्यात येत आहे.पश्चिम रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हवालदार चेतन कुमार हा लोअर परळ आरपीएफ पोस्टवर ड्युटीला होता.
यशोमती ठाकूर यांना धमकी,दाभोळकरांचा संदर्भ
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 31,2023 | 16:30 PM
WebTitle – Jaipur Express 12956 firing