संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्या नंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.यानंतर काँग्रेस नेत्यांनी संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली. राज्यभरात काँग्रेस , वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षांनी आंदोलने केली,त्यानंतर काँग्रेस नेत्यांना धमक्या यायला सुरुवात झाली,काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी देण्यात आली. त्यानंतर आता अमरावती येथील काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना तर थेट तुमचा दाभोळकर करू अशी धमकी देण्यात आलीय.
मराठवाडा विभागातील नांदेड जिल्ह्यातील एका पत्त्यावरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना भिडेंचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केल्याबद्दल आणि त्यांच्या अटकेची मागणी केल्याबद्दल धमकी देणारा ई-मेल आला. चव्हाण यांनी धमकीचा ईमेल कराड पोलिसांना कळवला, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी कराड येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धमकीचा ईमेल पाठवल्याबद्दल अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून कराड पोलिसांनी त्यांच्या नांदेडच्या सहकार्यांनाही कळवले असून तेथील पोलिसांनीही याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या व्यक्तीकडून आज पहिल्यांदाच झालेला नाही
सभागृहात पृथ्वीराज चव्हाण यांनी सभापतींना उद्देशून म्हटलं की, ” काल अमरावती मध्ये संभाजी भिडे नामक गृहस्थाने राष्ट्रपित्याच्या बद्दल अत्यंत निंदाजनक अपमानजनक वक्तव्य केलं आहे.आपण त्याची माहिती घेतली असेल.अशाप्रकारे समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीला 153 किंवा जे काही कलम आहे त्या अन्वये ताबडतोब अटक करण्यात यावी.समाजात तेढ निर्माण करणे धोके निर्माण करणे दंगे घडविण्याचा प्रयत्न हा या व्यक्तीकडून आज पहिल्यांदाच झालेला नाही.हा अनेक वर्षापासून प्रयत्न चालला आहे.आणि आता राष्ट्रपित्याबद्दल हा व्यक्ती असं व्यक्तव्य करत आहे तर हा माणूस बाहेर कसा फिरू शकतो? यावर जर प्रतिसाद उमटले तर याला जबाबदार कोण असणार आहे? माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या व्यक्तीला ताबडतोब 153 खाली अटक केली पाहिजे.
यानंतर उत्तर देताना,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि नोंद घेतली आहे,उचित कारवाई करण्यात येईल.
डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा संदर्भ
यानंतर आज अमरावती येथील काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या पोस्टवर धमकीचे ट्विट करण्यात आले.
एका व्यक्तीनं यशोमती ठाकूर यांना धमकी दिलीय.डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा संदर्भ देत धमकी दिलीय
“दाभोळकर असाच ओरडत होता जन्नत मध्ये पाठवला. टरा टरा फाडून टाकला. हारमखोर कोण आहे बाई स्पष्ट करा.”
कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही
सुर्यवंशी कोणत्या संघटनेशी संबधीत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दुसरीकडे संभाजी भिडे यांना अटक करा, या मागणीसाठी यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या आहेत. धमकी बाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “आम्हाला मारून टाकायचं असेल तर खुशाल मारून टाका,आम्ही घाबरत नाही,आम्ही पर्दाफाश करत राहू,या सगळ्यामागे सत्ताधारी पक्षाचा हात आहे.माझ्या जीवाला जर काही झालं तर त्याला होम डिपार्टमेंट जबाबदार राहील.” दरम्यान अमरावती जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर आज त्या आंदोलन सुरू केलं आहे. तिरग्यांचा आणि महापुरूषांचा अपमान करणाऱ्या मनोहर कुलकर्णी ला पाठीशी घालणाऱ्या भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली मात्र मनोहर कुलकर्णी अजूनही मोकाट आहे. मनोहर कुलकर्णी वर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.असं त्यांनी म्हटलंय.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 31,2023 | 14:55 PM
WebTitle – Threat to Yashomati Thakur, Dabholkar reference