बंगलोर – भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली,अन या रौप्य मोहोत्सवी वर्षात देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले,येत आहे.भारत देश हा ज्या संविधानावर चालवला जातो,ज्या संविधानातील तरतुदीनुसार लोककल्याणकारी व्यवस्था नियम कायदे बनवले जातात अशा संविधान निर्मितीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती आदर सन्मान व्यक्त करण्यास मात्र काही मनुवादी जातीय किडे कमी पडतात,असेच एक संतापजनक प्रकरण बंगलोर येथील जैन विद्यापीठ मध्ये घडलं आहे.या जैन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी एका कार्यक्रमात आंबेडकरी समाजाबद्दल आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अर्वाच्च आणि अपमानजनक स्कीट सादर केले होते.त्यानंतर देशभरातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या,या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य सदस्य आयु. अक्षय बनसोडे यांनी या संतापजनक प्रकारची तक्रार पोलिस स्टेशन मध्ये दाखल केली आहे.
बंगलोर येथील जैन विद्यापीठ येथे हे स्किट सादर करण्यात आलं
बंगलोर येथील जैन विद्यापीठ मध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यामध्ये हे स्किट सादर करण्यात आलं होतं.
याचा व्हिडीओ समाज माध्यमावर देखील व्हायरल करण्यात आला होता.
या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने राज्य सदस्य अक्षय बनसोडे यांनी नांदेड येथे
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन गुन्हे दाखल करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली.
तसेच हे स्किट सादर करणाऱ्या लोकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
‘मॅड-अॅड्स’चा (Mad-Ads) एक भाग असणाऱ्या सीएमएसच्या थिएटर ग्रुप ‘द डेलरॉईज बॉईज’ (The Delroys Boys)
यांनी हे जातीयवादी स्किट तयार केलं होतं.स्किट मध्ये सहभागी असणाऱ्यांना
विनोदाच्या धर्तीवर काल्पनिक उत्पादनांची जाहिरात करतात,आणि इतरांची खिल्ली उडवातात.
“त्यांनी सादर केलेल्या स्किटमध्ये तथाकथित निम्न जातीची पार्श्वभूमीअसणारा एक पुरुष एका तथाकथित उच्चजातीय महिलेला डेट करण्याचा प्रयत्न करतो.दुसरीकडे डॉक्टर बी आर आंबेडकरांना ‘बीअर आंबेडकर’ असं संबोधलं गेलं आहे. आणि ‘तुम्ही डी-लिट होऊ शकता मग दलित का होताय’ यासारखे इतर अनेक विषारी जातीय द्वेषयुक्त संवाद टाकून निकृष्ट दर्जाची विनोद निर्मिती करण्याचा केविलवाणा खटाटोप मनुवादी पिळावळ करत आहे.” असं तक्रारदार याचिकाकर्त्यांनी म्हटलंय.
तक्रार दाखल झाल्यानंतर बनले माफीवीर
“आम्ही ‘द डेलरॉईज बॉईज’ (The Delroys Boys)ग्रुप ज्यांच्याबद्दल वाईट बोललो त्या प्रत्येकाला माफी मागत आहोत.आम्ही आमच्या चुकीबद्दल मनापासून माफी मागतो. आमचा हेतू सामाजिक संदेश देण्याचा होता परंतु हे अस्वीकार्य ठरले,” असं त्यांनी त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर जाहीर माफीही पोस्ट केली आहे.
व्हिडिओ लिंक
डॉ.आंबेडकर जीवंत असते तर गोळ्या घातल्या असत्या – हमारा प्रसाद ला अटक
मोहन भागवत जातीप्रथा निर्मुलन करण्यासाठी पुढाकार घेणार का ?
जाती भगवान ने नहीं, पंडितों ने बनाई.. – मोहन भागवत
अदानी हिंडेनबर्ग अहवाल : व्यवहारात पारदर्शकता आवश्यक
संभाजी भिडे गडकोट मोहीम वादात,दुर्गंधी पसरली; कारवाईची मागणी
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 11,2023 21:00 PM
WebTitle – Jain University Skit Case: Insulting Dr.Babasaheb Ambedkar; Complaint filed by Vanchit bahujan aghadi