मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. (Ramcharitmanas Controversy) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) जातिव्यवस्थेवर मोठं भाष्य करताना म्हणाले की, जाती या देवाने नाही तर जात पंडितांनी निर्माण केल्या आहेत. हिंदू समाज नष्ट होण्या योग्य आहे काय? दोष तर उघड उघड दिसत आहेत,आपल्याच लोकाना पशू प्रमाणे वागवतो. एकमेकांच्या प्रती भेद मानतो. स्वार्थासाठी आपल्या बांधवांना विकून टाकायला मागेपुढे पाहत नाही इतका खाली उतरलेला हा समाज,हा तर मरायच्याच लायकीचा आहे.याची परंपरा मोडीत काढायच्या लायकीची आहे. असं आहे की नाही हे पंडित लोक सांगू शकत नाही.ज्याना प्रचिती आहे तेच सांगू शकतात.
जाती व्यवस्थेसंदर्भात मोहन भागवत काय म्हणाले?
व्यवस्था जाचक होतात काटेरी बनतात हळूहळू त्यांच्या रूढी बनतात,त्या काळानुसार बदलण्याचे समाज सोडून देतो, आणि त्यामुळे एखादी व्यवस्था गळफास बनत असली तरी आपलं पोट भरण्याकरता ती हट्टाने चालवायचे आग्रह करणारी लोकं इथं आहेत हे सगळं आपल्याकडे झालं आहे,हे सगळं झाल्यावर आपल्याकडे परकीयांचे लक्ष गेले,या गोष्टी झाल्यामुळे परकीयांना तुकडे करून खायला वाव मिळाला.
दैनिक नवभारत ने दिलेल्या वृत्तानुसार ते म्हणाले की, देवाने नेहमीच सांगितले आहे की माझ्यासाठी सर्व एक आहेत..
त्यात कोणतीही जात-वर्ण नाही..पण पंडितांनी एक वर्गवारी केली जी चुकीची होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख म्हणाले की,
देशात विवेक, चैतन्य सर्व एक आहेत, त्यात काही फरक नाही, फक्त मते भिन्न आहेत.
मुंबईत संत रविदास (संत रोहिदास) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान संघ प्रमुखांनी हे वक्तव्य केले.
वृत्तवाहिनी आजतक ने दिलेल्या वृत्तानुसार संघप्रमुख मोहन भागवत म्हणाले की,आमच्या समाजाच्या विभाजनाचा फायदा इतरांनी घेतला आहे.याचा फायदा घेऊन आपल्या देशात हल्ले झाले आणि बाहेरून आलेल्या लोकांनी फायदा घेतला. तुम्हाला समजून घ्यावं लागेल.
आपली उपजीविका म्हणजे समाजाप्रती जबाबदारी.जेव्हा प्रत्येक काम समाजासाठी असते तेव्हा काही उच्च, काही नीच,श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे.
संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त मला काही बोलण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्यच आहे, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.
संत रोहिदास म्हणाले, तुमचे काम करा, संपूर्ण समाजाला जोडा, समाजाच्या प्रगतीसाठी काम करणे हाच धर्म आहे.
केवळ स्वतःचा विचार करून पोट भरणे हा धर्म नाही आणि त्यामुळेच समाजातील मोठे लोक संत रोहिदासांचे भक्त झाले.
रविदासांनी सामाजिक समतेचा मंत्र दिला.रविदास म्हणाले हा समाज बदलेल सतत प्रयत्न करत रहा.
हिंदू आणि मुस्लिम सर्व समान आहेत
मोहन भागवत म्हणाले की, हिंदू आणि मुस्लीम सर्व समान आहेत. काशीच्या मंदिराच्या विध्वंसानंतर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहून सांगितले की, हिंदू असो वा मुस्लिम, आपण सर्व एकाच देवाची मुले आहोत. हे जर तुम्हाला मान्य नसेल तर उत्तरेला तुमच्याशी लढायला यावे लागेल. समाज आणि धर्माकडे द्वेषाने पाहू नका.. सदाचारी व्हा, धर्माचे पालन करा.
मातंग समाज इतिहास संदर्भात काही प्रश्न – शाहू पाटोळे
शरजील इमाम अन्य लोकांची देशद्रोह आरोपातून मुक्तता
लंडनच्या एडवर्ड चा औरंगाबादच्या सांची सोबत बौद्ध पद्धतीने विवाह
अदानी यांच्या अडचणीत वाढ NDTV सोडतायत पत्रकार
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 06,2023 01:27 AM
WebTitle – Caste is not created by God, created by Pandits – Mohan Bhagwat