2021 या वर्षात सुर्याचा नुकताच रिलीज झालेला जय भीम हा चित्रपट रिलीज झाल्यापासून देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. चित्रपटाने समीक्षक आणि सामान्य प्रेक्षकांकडून जबरदस्त सकारात्मक दाद मिळविली आणि अनेक लोकांना भावनिक केले. चित्रपटाने अनेक विक्रम नोंदवले आहेत.IMDb या जगभरातील चित्रपट माध्यमाला वाहिलेल्या लोकप्रिय साईटवर या वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय 10 चित्रपटांमध्ये जयभीम ला स्थान देण्यात आले आहे.जागतिक सिने जगतात IMDb.com ही अत्यंत महत्वाची व विश्वसनीय वेबसाईट मानली जाते.
यावर्षी म्हणजे 2021 मध्ये रिलीज झालेल्या 10 लोकप्रिय चित्रपटांमध्ये तमिळ चित्रपटांनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे.त्यातही जयभीम चित्रपट टॉपवर आहे.
जय भीम हा शोषितांच्या वेदनांवर भाष्य करणारा, जीवनातील काळे वास्तव उजेडात आणणारा चित्रपट आहे.सत्तेचा दुरुपयोग त्यांच्या मूलभूत संसाधनांपासून आणि गरजांपासून वंचित असलेल्या लोकांच्या जीवनावर कसा परिणाम करू शकतो हे देखील या चित्रपटाने दाखवले आहे.दरम्यान, जय भीम चित्रपट आता पुन्हा एकदा एका रोमांचक कारणाने चर्चेत आला आहे.जयभीम चित्रपटाने आणखी एक विक्रम नोंदवत आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवला आहे.
हा सिनेमा जसा भारतात गाजतो आहे तसाच परदेशात ही गाजतो आहे.
जागतिक सिने जगतात IMDb.com ही अत्यंत महत्वाची व विश्वसनीय वेबसाईट मानली जाते.
जगातील सर्व सिनेमानं येथे मानांकन मिळते. त्यांना रेटिंग दिले जाते.
जगातील एक हजार मुव्ही तपासल्या तर 9.6 रेटिंग घेऊन जयभीम हा सिनेमा आज जगात पहिल्या नंबर वर आहे
तर 1984 वर्षाचा हॉलिवूड मुव्ही The Shawshank Redemption हा 9.3 रेटिंग घेऊन दुसऱ्या नंबर वर आहे
IMDb top 1000 असे जरी google मध्ये टाईप केले तरी आपल्याला ते पाहता येईल.
सांगण्याचे तात्पर्य हा महत्वपूर्ण मुव्ही सिनेप्रेमींनी आवश्य पहावा असा आहे.
जयभीम चित्रपट आंतरराष्ट्रीय सन्मान
जय भीम आता प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कार 2022 साठी सबमिट करण्यात आला आहे आणि या नव्या अपडेट नंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. तमिळ चित्रपटसृष्टीसाठी हा खरोखरच अभिमानाचा क्षण आहे कारण त्यांच्या चित्रपटांपैकी एकाने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात स्टाईलने प्रवेश केला आहे. जय भीमचे सहनिर्माते राजसेकर पांडियन यांनी अधिकृतपणे ही महत्वाची बातमी त्यांच्या ट्विटर पेजद्वारे शेअर केली त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जय भीम व्यतिरिक्त, पीएस विनोथ राज दिग्दर्शित, कूझंगल (पेबल्स) देखील गोल्डन ग्लोब 2022 साठी सबमिट करण्यात आला आहे. जय भीम आणि कूझंगल हे दोन्ही सर्वोत्कृष्ट गैर-इंग्रजी भाषेतील चित्रपटाच्या श्रेणी अंतर्गत सबमिट केले गेले आहेत.
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 09, 2021 16: 35 PM
WebTitle – Jaibhim ranks among the 10 most popular Indian movies of the year 2021 on IMDb