टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित जय भीम चित्रपट, सध्या सोशल मिडियात चर्चेचा विषय बनला आहे.अनेकांना हा चित्रपट पसंतीस उतरला आहे. सुरिया, लिजोमोल जोस आणि मणिकंदन हे कलाकार यात मुख्य भूमिकेत आहेत. 2 नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाल्यानंतर त्याला सर्वच स्तरातून चांगली ओपनिंग मिळाली.खरतर अनेकांना चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच चित्रपटाची उत्सुकता होती.जय भीम हा चित्रपट मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के चंद्रू यांनी 90 च्या दशकात लढलेल्या वास्तविक जीवनातील खटल्यावर आधारित आहे.
चित्रपटात, इरुलर जमातीतील राजकन्नू या व्यक्तीला चोरीच्या खोट्या आरोपाखाली अटक केली जाते,
त्याच्यासह इतर दोन पुरुष नातेवाईकांना. पुढे काय कोठडीतील छळ आणि त्याची पत्नी सेनगान्नी (वास्तविक जीवनात, पार्वती)
आणि वकील चंद्रू यांच्या नेतृत्वाखालील ऐतिहासिक कायदेशीर लढाईची एक भयानक गाथा आहे.
चित्रपटाने जवळपास सर्वच चित्रपट समीक्षकांच्या सकारात्मक रिव्ह्यू चे मानांकन पटकावले आहे.प्रत्येकाच्या तोंडी जयभीम चित्रपटाची चर्चा आहे.
पोलिसांनी सुटकेस भरून लाच देण्याचा प्रयत्न केला
TNM ला दिलेल्या मुलाखतीत न्यायमूर्ती चंद्रू यांनी प्रकरणातील विविध खाचखळगे व्यवस्थेची लक्तरे उघड करत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विचार करायला भाग पाडलं आहे.खटल्यातील राजकन्नू कोठडीतून निसटला असे रंगवले गेले होते परंतु त्याच्या कुटुंबीयांना तो कुठेच सापडला नाही, ज्यामुळे त्याच्यासोबत काहीतरी भयंकर वाईट घडल्याचा त्यांना विश्वास वाटू लागला.
चित्रपटात पोलिस कोठडीतील हिंसाचाराची दृश्ये असली तरी ती दर्शकांना अतिशयोक्तीपूर्ण असल्याचा प्रश्न पडू शकतो,मात्र न्यायमूर्ती चंद्रू म्हणतात की काही सिनेमॅटिक स्वातंत्र्याव्यतिरिक्त, जय भीम चित्रपट हा मुळ सत्याशीच संबंधित आहे आणि तोच त्याचा बॅकबोन देखील आहे.पोलिसांनी केवळ राजकन्नूच्या पत्नीलाच नव्हे तर त्यांनाही लाच देण्याचा प्रयत्न केला होता.पोलिस एक मोठी बॅग/सुटकेस घेऊन न्यायमूर्ती चंद्रू यांच्या ऑफिसात गेले होते.मात्र न्यायमूर्ती चंद्रू यांनी त्यांना स्पष्ट सांगतिलं असं काही होणार नाही,आणि त्यांना त्यावेळी हाकलून दिले होते.
जय भीम चित्रपटाव्यतिरिक्त, माजी न्यायमूर्ती चंद्रू यांनी जातीच्या जनगणनेवर होणारा सरकारचा विलंब, पेगासस हेरगिरी विवाद आणि देशद्रोह कायद्याबद्दलची त्यांची मते इत्यादी महत्वाच्या मुद्यावर चर्चा केली आहे.
संपूर्ण मुलाखत खालील व्हिडिओ मध्ये पाहता येईल.
जय भीम मुवी मधील प्रकाश राजच्या ‘झापड मारण्याच्या’ सीनने नवा वाद
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 05, 2021 12:33 PM
WebTitle – Jai Bhim Movie: Police tried to bribe by filling suitcase, I threw it: Justice Chandru