जयभीम हा चित्रपट रिलीज झाल्यापासून देशभरात आणि जागतिक स्तरावर देखिल चर्चेचा विषय बनला आहे. चित्रपटाने समीक्षक आणि सामान्य प्रेक्षकांकडून जबरदस्त सकारात्मक दाद मिळविली आणि अनेक लोकांना भावनिक केले. जय भीम हा शोषितांच्या वेदनांवर भाष्य करणारा, जीवनातील काळे वास्तव उजेडात आणणारा चित्रपट आहे.सत्तेचा दुरुपयोग त्यांच्या मूलभूत हक्क संसाधनांपासून आणि गरजांपासून वंचित असलेल्या लोकांच्या जीवनावर कसा परिणाम करू शकतो हे देखील या चित्रपटाने दाखवले आहे.दरम्यान, जय भीम चित्रपट आता पुन्हा एकदा एका रोमांचक कारणाने चर्चेत आला आहे.जयभीम चित्रपटाने विक्रम नोंदवत आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवला होताच. आता भारताचा शेजारी चीन मध्येही जयभीम चित्रपट लोकप्रिय ठरत आहे.
हा चित्रपट एका आदिवासी जोडप्याच्या कथेवर आधारित
अनेकदा असं म्हटलं जातं की चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. बहुतांश चित्रपटांमध्ये समाजातील कटू वास्तवाची जाणीव लोकांना करून दिली जाते. तमिळ भाषेत बनलेल्या जय भीम चित्रपटाची कथाही अशीच आहे. जय भीम हा एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट असून यामध्ये आदिवासींवरील अत्याचार चांगल्या प्रकारे दाखवण्यात आले आहेत. भारतातील लोकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले, पण आता जयभीम चित्रपटाचे चीन मध्येही या चित्रपटाचे खूप कौतुक होत आहे.
TJ ज्ञानवेल दिग्दर्शित या चित्रपटात सुर्या, के. मणिकंदन, लिजोमोल जोस आणि प्रकाश राज यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. चित्रपटाची कथा एका वकिलाच्या जीवनावर आधारित आहे जो आदिवासी लोकांवरील अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतो आणि जिंकतो. पोलीस स्वतःच्या फायद्यासाठी निष्पाप आणि गरीब लोकांच्या जिवाशी कसे खेळतात हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
हा सिनेमा जसा भारतात गाजतो आहे तसाच परदेशात ही गाजतो आहे.जागतिक सिने जगतात IMDb.com ही अत्यंत महत्वाची व विश्वसनीय वेबसाईट मानली जाते. जगातील सर्व सिनेमानं येथे मानांकन मिळते. त्यांना रेटिंग दिले जाते. जगातील एक हजार मुव्ही तपासल्या तर 9.6 रेटिंग घेऊन जयभीम हा सिनेमा आज जगात पहिल्या नंबर वर आहे तर 1984 वर्षाचा हॉलिवूड मुव्ही The Shawshank Redemption हा 9.3 रेटिंग घेऊन दुसऱ्या नंबर वर आहे. IMDb top 1000 असे जरी google मध्ये टाईप केले तरी आपल्याला ते पाहता येईल. सांगण्याचे तात्पर्य हा महत्वपूर्ण मुव्ही सिनेप्रेमींनी आवश्य पहावा असा आहे.
चीनमधील लोकांना चित्रपट का आवडला?
जयभीम चित्रपट अन त्याची कथा चीन मधील लोकांनाही आवडली कारण तमिळप्रमाणेच चीनमध्येही अशीच एक घटना घडली.चीनच्या सोशल मिडिया आणि चित्रपट समीक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावला आहे.जय भीमच्या कथेप्रमाणेच जपानमध्ये एका चिनी महिलेची हत्या करण्यात आली होती, जिच्याविरुद्ध न्यायव्यवस्थेत दीर्घ खटला चालला होता.
काही चिनी नेटिझन्सनी निदर्शनास आणून दिले की सेंगनीचा अनुभव जपानमध्ये मारल्या गेलेल्या चिनी विद्यार्थ्याची आई (Jiang Qiulian) जियांग किउलियन सारखाच आहे.
बीजिंगमधील चित्रपट समीक्षक शी वेन्क्यू (Shi Wenxue) यांनी ग्लोबल टाईम्स ला सांगितले की, भारताने चित्रपटांना सांस्कृतिक धोरणाच्या उंचीवर नेले आहे.जे चित्रपटांना देशाच्या सॉफ्ट पॉवरचा एक भाग बनवते, ज्यामुळे चित्रपटांची निर्मिती गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.
भ्रष्टाचार, जातिव्यवस्था आणि अन्यायाविरुद्ध बनवलेल्या चित्रपटाची कथा चीनमधील लोकांच्या हृदयाला भिडली. त्यामुळे चीन मधिल नागरिक सुद्धा चित्रपटाचे कौतुक करताना थकत नाहीत.
चीन मधिल ते प्रकरण नेमकं काय होतं?
(Jiang Qiulian) जियांग किउलियन च्या आईने तिच्या मुलीच्या माजी रूममेट लिऊ नुआन्क्सी (Liu Nuanxi) विरुद्धचा खटला जिंकला होता,
न्यायालयाने निर्णय दिला की रूममेटने जबाबदारी घेतली पाहिजे कारण तिने पीडितेला त्यांच्या अपार्टमेंटच्या बाहेर लॉक केले होते,
जेव्हा पीडितेवर लिऊच्या माजी प्रियकराने हल्ला केला होता.
लिऊ झिनला (Liu Nuanxi) पूर्व चीनच्या शेडोंग प्रांतातील किंगदाओ येथील न्यायालयाने
जियांगला (Jiang Qiulian) एकूण 696,000 युआन ($109,193) भरपाई देण्याचा आदेश दिला.
(Jiang Qiulian) जियांग किउलियन च्या खुनाचा खटला तीन वर्षांहून अधिक काळ खटला चालवल्यामुळे हा निकाल लागला.
हा खटला चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अतिशय ठळकपणे प्रदर्शित करण्यात आला होता
आणि सिना वेइबोवर (Sina Weibo) अनेक वेळा ट्रेंड झाला होता.
बर्याच चिनी नेटिझन्सनी लिऊ झिन (Liu Nuanxi) कडून नुकसानभरपाई मिळविण्याच्या जियांगच्या प्रयत्नाचे समर्थन केले
आणि ते म्हणाले की तिच्या विजयामुळे आपल्या न्यायिक व्यवस्थेची निष्पक्षता दिसून आली.
एका सिना वेइबो युजरने म्हटलं की ” जयभीम चित्रपटातील पत्नी प्रमाणेच जियांग ची आई देखिल तेवढीच कणखर आहे
जिने आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी लाखो युआन खर्च केले,”
पत्नी सेंगनीचा आपल्या पतीवरील विश्वास आणि प्रेम आणि चंद्रूची न्यायाची भावना अनेक चिनी प्रेक्षकांना स्पर्शून गेली.
सेंगनी ने तिच्या पतीसाठी न्याय मिळविण्याचा आग्रह धरला,तसाच आग्रह जियांग ने
तिच्या मुलीसाठी केलेल्या चिकाटीसारखाच मानला जातो आहे.
जर तुम्ही चित्रपट पाहिला नसेल तर तो पाहण्यास उशीर झालेला नाही.लवकर पाहा.
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा, )
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 15, 2022 14: 30 PM
WebTitle – Jai Bhim movie is becoming popular in China