मंगळवारी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झालेल्या अभिनेता सुरियाच्या बहुचर्चित जय भीम या चित्रपटातील एका दृश्याने नवा वाद सुरू झाला आहे. अभिनेता प्रकाश राजने साकारलेल्या व्यक्तिरेखेने एका व्यक्तीला झापड मारल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. चित्रपट पाहिलेल्या समीक्षकांनी निदर्शनास आणले आहे की पात्राला कानाखाली यासाठी मारण्यात आली कारण तो हिंदीत बोलत आहे आणि अभिनेते प्रकाश राज त्याला म्हणतात तमिळ मध्ये बोलण्यास सांगत आहे.जय भीम मुवी मधील या सीनमुळे वाद निर्माण झाला असून हा सीन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वादग्रस्त दृश्यात काय आहे?
या चित्रपटातील प्रकाश राजच्या व्यक्तिरेखेला हिंदी भाषेबद्दल तीव्र तिरस्कार आहे आणि म्हणूनच तो त्या वृद्धाच्या कानाखाली मारतो.
या दृश्यावर सोशल मीडियावर जोरदार वाद सुरू आहे. ‘जय भीम’ चित्रपटातून हा सीन हटवण्याची मागणी लोक करत आहेत.
काही लोक म्हणतात की हा सीन चित्रपटात टाकण्याची गरज नव्हती.
याच सिनवरुन चित्रपट समीक्षक रोहित जसवाल यांनी नाराजी व्यक्त करत म्हटलं की हा सीन पाहून, वाईट वाटलं
काही लोकांनी मात्र योग्य असल्याचं म्हणत प्रकाश राज यांचे कौतुक केले
दरम्यान, जय भीम मुवी मधील या दृशाच्या निषेधाचे समर्थन करणारे काही लोक आहेत. एका युजरचे म्हणणे आहे की हा चित्रपट हिंदी भाषिकांच्या विरोधात नाही आणि तो त्यांना चुकीच्या पद्धतीने दाखवत नाही. खरे तर प्रकाश राज यांना त्याचा मुद्दा समजू नये म्हणून त्या व्यक्तीला हिंदी बोलून पळून जायचे होते. परंतु प्रकाश राज यांना त्यांची युक्ती समजली आणि म्हणून त्यांनी त्यांना कानाखाली मारली आणि तमिळमध्ये बोलण्यास सांगितले. चित्रपटाच्या या दृश्यावरून जे गोंधळ घालत आहेत त्यांनी आधी चित्रपट पाहावा आणि नंतर प्रतिक्रिया द्यावी, असे काही लोकांचे म्हणणे आहे.
‘जय भीम’ हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि आता हिंदीमध्ये रिलीज झाला आहे.हा चित्रपट 1993 च्या सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटात न्यायमूर्ती के चंद्रू यांनी आदिवासी समूहाच्या प्रश्नावर एक केस लढवली होती.
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
किरण गोसावी चा अटक होण्यापूर्वी आला नवा व्हिडिओ
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त; जामिनावर नवाब मलिकांची प्रतिक्रिया
आर्यन खान प्रकरण; वानखेडेंवर आरोप;पंच चा धक्कादायक गौप्यस्फोट!
फॅक्ट चेक : शाहरुख खानचे वडील स्वातंत्र्यसैनिक नव्हते का?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 03, 2021 15:22 PM
WebTitle – jai-bhim-movie-controversy-prakash-raj-slaps-hindi-speaking-man-tamil-language