तमिळ अभिनेता सुर्या चा ‘जय भीम’ पिक्चर (चित्रपट) (Jai bhim movie) प्रदर्शित झाल्यानंतर देशभरात आणि जागतिक स्तरावर देखिल चर्चेचा विषय बनला आहे. जय भीम पिक्चर ने समीक्षक आणि सामान्य प्रेक्षकांकडून जबरदस्त सकारात्मक दाद मिळविलीच त्याशिवाय जागतिक स्तरावर देखिल जय भीम चित्रपट अनेक विक्रम करत भारताचे नाव जागतिक चित्रपटांच्या परीप्रेक्षात ठळकपणे ठसा उमटवतानाचा हा क्षण समस्त भारतीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा ठरला आहे.ऑस्कर अकादमी च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर जय भीम पिक्चर ची दखल घेत त्याचा काही भाग आणि दिग्दर्शक टी जे ज्ञानवेल (TJ Gyanvel) यांची मुलाखत प्रदर्शित करण्यात आली आहे.(JaiBhim has been featured in the official YouTube channel of @TheAcademy) जय भीम हे नाव जागतिक स्तरावर पुन्हा एकदा झळकले.
ऑस्कर अकादमी ने दखल घेतलेला जय भीम पिक्चर (चित्रपट) हा शोषितांच्या वेदनांवर भाष्य करणारा, जीवनातील काळे वास्तव उजेडात आणणारा चित्रपट आहे.सत्तेचा दुरुपयोग त्यांच्या मूलभूत हक्क संसाधनांपासून आणि गरजांपासून वंचित असलेल्या लोकांच्या जीवनावर कसा परिणाम करू शकतो हे देखील या चित्रपटाने दाखवले आहे.
ऑस्कर अवॉर्ड ची स्थापना कधी झाली?
(Oscar Award) ऑस्कर अवॉर्ड विश्व में फिल्म जगत के सबसे अधिक लोकप्रिय ,चर्चित आणि मानाचे प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून मानले जातात.याची सुरुवात 1929 साली झाली.याला ऑस्कर हे नाव नंतर देण्यात आले अगोदर यास (Academy Awards) अकादमी पुरस्कार असे म्हटले जात होते.ऑस्कर पुरस्कार हे अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स ॲंड सायन्स या चलचित्र अकादमीमार्फत दिले जाणारे वार्षिक पुरस्कार आहेत. चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्यांना गौरवण्यासाठी हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. मेट्रो-गोल्डिन-मेयर स्टुडिओचे लुईस बी. मेयर यांनी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स ॲंड सायन्स अकादमीची स्थापना केली.
जयभीम चित्रपट बद्दल थोडक्यात
TJ ज्ञानवेल दिग्दर्शित या चित्रपटात सुर्या, के. मणिकंदन, लिजोमोल जोस आणि प्रकाश राज यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. चित्रपटाची कथा एका वकिलाच्या जीवनावर आधारित आहे जो आदिवासी लोकांवरील अत्याचाराविरुद्ध आवाज उठवतो आणि जिंकतो. पोलीस स्वतःच्या फायद्यासाठी निष्पाप आणि गरीब लोकांच्या जिवाशी कसे खेळतात हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
जय भीम चित्रपट चीन मध्ये सुद्धा लोकप्रिय
दरम्यान, जय भीम चित्रपट आता पुन्हा एकदा एका रोमांचक कारणाने चर्चेत आला आहे.
जयभीम चित्रपटाने विक्रम नोंदवत आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवला होताच.
आता भारताचा शेजारी चीन मध्येही जयभीम चित्रपट लोकप्रिय ठरत आहे.
IMDb.com वर सुद्धा जय भीम सिनेमा अव्वल
जागतिक सिने जगतात IMDb.com ही अत्यंत महत्वाची व विश्वसनीय वेबसाईट मानली जाते.
जगातील सर्व सिनेमानं येथे मानांकन मिळते. त्यांना रेटिंग दिले जाते.
जगातील एक हजार मुव्ही तपासल्या तर 9.6 रेटिंग घेऊन जयभीम हा सिनेमा आज जगात पहिल्या नंबर वर आहे तर 1984 वर्षाचा हॉलिवूड मुव्ही The Shawshank Redemption हा 9.3 रेटिंग घेऊन दुसऱ्या नंबर वर आहे. IMDb top 1000 असे जरी google मध्ये टाईप केले तरी आपल्याला ते पाहता येईल. सांगण्याचे तात्पर्य हा महत्वपूर्ण मुव्ही सिनेप्रेमींनी आवश्य पहावा असा आहे.
चित्रपटाविषयी आणखी जाणून घ्या..
जयभीम चित्रपट आता प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कार 2022 साठी सबमिट करण्यात आला आहे आणि या नव्या अपडेट नंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. तमिळ चित्रपटसृष्टीसाठी हा खरोखरच अभिमानाचा क्षण आहे कारण त्यांच्या चित्रपटांपैकी एकाने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात स्टाईलने प्रवेश केला आहे. जय भीमचे सहनिर्माते राजसेकर पांडियन यांनी अधिकृतपणे ही महत्वाची बातमी त्यांच्या ट्विटर पेजद्वारे शेअर केली त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जय भीम व्यतिरिक्त, पीएस विनोथ राज दिग्दर्शित, कूझंगल (पेबल्स) देखील गोल्डन ग्लोब 2022 साठी सबमिट करण्यात आला आहे. जय भीम आणि कूझंगल हे दोन्ही सर्वोत्कृष्ट गैर-इंग्रजी भाषेतील चित्रपटाच्या श्रेणी अंतर्गत सबमिट केले गेले आहेत.
जय भीम पिक्चर कुठे पाहता येईल?
जय भीम पिक्चर तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकाल. Amazon Prime Video हे एक ओटीटी प्लॅटफॉर्म आहे.
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
जयभीम चित्रपट:नोंदवला आणखी एक विक्रम आंतरराष्ट्रीय सन्मान
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा, )
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 18, 2022 12: 40 PM
WebTitle – Jai Bhim film Another record, honored by Oscar Academy