जबलपूर: Jabalpur News जबलपूरमध्ये भाजप नेता प्रियांश विश्वकर्मा याने एमबीएची विद्यार्थिनी वेदिका ठाकूर हिच्या कार्यालयात गोळ्या झाडल्या. उपचारादरम्यान वेदिकाचा मृत्यू झाला आहे. आता पोलीस या प्रकरणातील आरोपी प्रियांशच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करणार आहेत. यापूर्वी खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.वेदिका ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. वेदिकाच्या मृत्यूने नातेवाईक आक्रोश करत बेहाल झालेत.वेदिका ठाकूर देश की बेटी किंवा जस्टीस फोर देविका म्हणून ट्विटर ट्रेंड झालेला नाही.
16 जून रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथील आरोपी भाजप नेता प्रियांश विश्वकर्मा याच्या कार्यालयात गोळीबाराची घटना घडली होती. यामध्ये वेदिका ठाकूर नावाच्या एमबीए विद्यार्थिनीवर प्रियांशने गोळी झाडली होती. वेदिकाच्या पोटात गोळी लागल्याने ती गंभीर जखमी होती. गेल्या 10 दिवसांपासून तीच्यावर उपचार सुरू होते. अलीकडेच 2 दिवसांपूर्वी वेदिकाच्या मृत्यूची अफवा पसरली होती. पण आता डॉक्टरांनी वेदिकाचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले आहे.मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी भाजप नेता प्रियांश विश्वकर्मा वर खुनाचा गुन्हा दाखल करणार आहेत.
घटनेनंतर आरोपी फरार झाला होता
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रियांश विश्वकर्मा जबलपूरच्या धन्वंतरी भागात राहायला असून तो इमारत बांधकाम आणि वाळूचा व्यवसाय करत असल्याची माहिती मिळत आहे. 16 जून रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास या नराधमाने वेदिकावर गोळ्या झाडल्या.त्यांनंतर बऱ्याच वेळाने तिला खासगी रुग्णालयात दाखल करून घटनास्थळावरून पळ काढला. आरोपी इतका सराईत आहे की त्याने त्याचे कार्यालय गाठून सीसीटीव्हीचा डीव्हीआर गायब केला. याशिवाय रक्ताचे डागही पुसून काढून तेथून पळ काढला.
आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
जखमी विद्यार्थिनी वेदिकाने प्रियांश विश्वकर्मानेच आपल्यावर गोळी झाडल्याचे आपल्या जबानीत म्हटले होते.
घटनेच्या ३ दिवसांनंतर आरोपीला अटक करण्यात आली.पोलिसांकडून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न करणे असा गुन्हा दाखल केला होता.
सोबतच या प्रकरणाची चौकशी करण्यात येत होती.
आता उपचारादरम्यान जखमी विद्यार्थिनी वेदिका चा मृत्यू झाल्यानंतर आरोपी प्रियांश विश्वकर्मा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपचार मिळण्यास उशिर झाल्याने देविका ठाकूर ची प्रकृती बिघडली
देविकाच्या काकूंनी पाहिले की देविका बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडली होती.प्रियांश विश्वकर्मा तीला गाडीत टाकून इकडे तिकडे फिरत राहिला. नंतर काही समजू न शकल्याने त्यांनी देविकाला भाजप नेता डॉ. अमित खरे यांच्या स्मार्ट सिटी हॉस्पिटलमध्ये नेले. पोलिसांना माहिती न देता देविका हीच्यावर भाजप नेत्याच्या रुग्णालयात तब्बल 6 तास उपचार करण्यात आले. याची कुणालाही माहिती नसावी, यासाठी वरील ऑपरेशन थिएटरमध्ये येण्या-जाण्यावर बंदी घालण्यात आली होती.
पोलिस करत होते टाळाटाळ मृताच्या नातेवाईकांचा गंभीर आरोप
वेदिकाच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
पोलिस गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
पोलिसांना हे प्रकरण दडवून ठेवायचे होते.बऱ्याच दबावानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
भाजपच्या नेत्यांकडून महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे.
आम्ही त्यावर बातम्या करत असताना ही बाब लक्षात आली आहे.
मात्र आपल्याकडील प्रस्थापित मिडिया अशा बातम्या दाबून टाकण्यात किंवा त्यावर चर्चा होणार नाही इतपत काळजी घेत आहे,
याशिवाय अशा मुद्यावर विरोधी पक्ष म्हणून सत्तेत नसणाऱ्या पक्षांची सुद्धा काही जबाबदारी दिसून येत नाही,
अशा मुद्यावर सरकारला प्रश्न विचारण्याचे काम विरोधी पक्षाने केले पाहिजे.महिला मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला पाहिजे.
मात्र असं काही होताना दिसत नाही.त्यामुळे अशा किती वेदिका बळी जाणार हा एक गंभीर चिंतेचा विषय आहे.
अमेरिकेतील रस्त्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव
भगवान बुद्ध अस्थि दर्शन ,सुट्टी न दिल्याने उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी दिला राजीनामा
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा....
First Published by Team Jaaglya Bharat on 27 JUN 2023, 11:20 AM
WebTitle – Jabalpur News: : Vedika Thakur dies during treatment, BJP leader Priyansh Vishwakarma murdered