पुणे : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे कायम वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहत असतात.त्यानी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय.छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास सध्या सुरु असून यानिमित्ताने संभाजी भिडे पुणे (Pune) जिल्ह्यातील शिरुर (Shirur) तालुक्यात आले असता त्यांनी वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं.त्यानंतर शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा, निर्वी या गावात जाऊन त्यांनी शिवप्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. याच वेळी संभाजी भिडे यांनी त्यांच्या भाषणात हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल, इस्लाम हा खरा देशाचा शत्रू असं वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या नव्या वक्तव्यानं वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झालीय. संभाजी भिडे यांनी यापूर्वी देखील वेगवेगळे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले संभाजी भिडे ?
”धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास आपण पाळत आहोत. त्यामध्ये हिंदुस्थानच्या अस्तित्वाला आव्हान दडलेलं आहे.संभाजी आणि औरंगजेब ही दोन माणसं होती,आणि त्यांचे वैर होतं म्हणून त्यांनी संभाजी महाराजांना तुकडे तुकडे करून मारलं नाही.तर त्याच्या अंतःकरणातील इच्छा जी होती ती वेगळी होती.कन्याकुमारी ते काश्मिर हा देश संपून टाकावा तुकडे करावा ही त्याच्या पोटातली आग आणि चीड आणि दृष्ट भावना संभाजी महाराजांच्या बलिदानातून पूर्ण करून घेतली.त्यातून अंशतः समाधान मिळवलं.
आपण लक्षात घेतलं पाहिजे आज संभाजी महाराज नाहीत,औरंगजेब नाही.मग ही मेलेली मढी कशाला उकरून काढायची,आता नवीन युग आहे.नवीन जगाबरोबर चालूया मागचं झालं गेलं विसरुया असं म्हणणारी नादान नालायक आणि देशघातकी वृत्ती सुशिक्षित लोकांच्यात फार मोठ्या प्रमाणावर आहे.
इस्लाम हा खरा देशाचा शत्रू – भिडे
संभाजी महाराज आज नाहीत.औरंगजेब नाहीये.पण आजही औरंगजेब नसला तरी पाकिस्तान, बांगलादेश आणि गावात वसलेल्या मुस्लिम समाजाच्या रुपाने तो शत्रू हिंदू समाजाच्या पुढे उभा ठाकला आहे. देशासाठी आणि हिंदू धर्मासाठी ऐन तारुण्यात संभाजी महाराजांनी बलिदान पत्कारले पण धर्म सोडला नाही, अशा छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळत असताना हिंदुस्थानातील प्रत्येक हिंदुने छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देता त्यांना हाल-अपेष्टा सहन करत मरणाला प्रवृत्त करणारा तोच इस्लाम धर्म, मुस्लिम समाज हा खरा कारणीभूत आहे आणि तोच हिंदुस्थानचा खरा शत्रू आहे.
आपणही त्यांच्यापासून सावध राहून त्यांना हिंदू समाजामध्ये पोटतिडकीने झालेल्या बलीदानाचा सूड घेण्याची जसेच्या तसे उत्तर देण्याची ताकद प्रत्येक हिंदू दाखवेल, असा एक दिवस नक्की उगवेल. हीच खऱ्या अर्थाने हिंदुस्थानातील हिंदुची छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली असेल.” असं शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यावेळी म्हणाले. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
झुंड सिनेमा:झोपडपट्टी मध्ये जन्मलेले जागतिक दर्जाचे दिग्गज खेळाडू
झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
झुंड मुव्ही: रितेश देशमुख यांची पोस्ट व्हायरल; दोन भारताचा विचार..
झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”
Jhund film।झुंड चित्रपट,आंबेडकरांचे पोस्टर व्हायरल,पाहा रिलीज डेट
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
Pushpa movie box office collection|पुष्पा फिल्म बॉक्स ऑफिस
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 18, 2022 12: 38 PM
WebTitle – Islam is the real enemy of the country – Sambhaji Bhide’s controversial statement