मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे दररोज वेगवेगळे गौप्यस्फोट करत आहेत.आता त्यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या मेहुणीच्या संदर्भाने एक मोठा निशाणा साधला आहे. समीर वानखेडेंची पत्नी- अभिनेत्री क्रांती रेडकर यांची बहीण हर्षदा दीनानाथ रेडकर (Harshada Dinanath Redkar) या ड्रग्ज च्या व्यवसायात असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. नुकतेच समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandeo Wankhede) यांनी मुंबई उच्च न्यायालयात मलिक यांच्याविरोधात 1.25 कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता.त्यानंतरही नवाब मलिक यांच्याकडून आरोपांची सरबत्ती सुरुच आहे.
“क्रांती रेडकर यांची बहीण ड्रग्ज व्यवसायात आहे का?”
समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या. हा आहे पुरावा, असं लिहून नवाब मलिक यांनी ट्विटरवर काही कागदपत्रे पुरावे म्हणून सादर केले आहेत.
काय म्हणाले नवाब मलिक?
साक्ष द्यायला येवू नयेत म्हणून लोकांना धमकावले जात आहे
नवाब मलिक यांनी नुकतेच पत्रकार परिषद घेऊन ड्रग्ज प्रकरणात आणखी काही गौप्यस्फोट केले होते. लोकांना धमकावले जात आहे.तुम्ही पैसे दिले त्यामुळे तुम्हीही दोषी ठराल असं म्हणून त्यांच्यावर दबाव आणला जात आहे.मी आवाहन करतो की या लोकांनी माझी साथ द्यायला पुढे यावं तुम्हाला काही होणार नाही.ज्याना धमकावले जाते आणि पैसे वसूल केले जातात ते दोषी नाहीत तर व्हिक्टिम असतात.एनसीबीने आपल्यातील घाणेरडे मासे काढून बाहेर फेकले पाहिजेत. हे ‘मेरा नाम जोकर’ आणि ‘संगम’ या दोन इंटरव्हलचे पिक्चर नाहीत. जोपर्यंत व्हिलन आत जात नाही, तोपर्यंत पिक्चर संपणार नाही. ललित हॉटेल सात महिने बुक होते. तिथूनच प्रायव्हेट आर्मी काम करत होती. विलास भानुशाली, धवल भानुशाली, सॅम डिसूजा असे अनेक जण येत होते. सॅम चे खरे नाव सॅनविल डिसूझा आहे.तिथे मुलीही येत होत्या. तिथे ड्रग्जही घेतलं जात होतं. ललितमध्ये शबाब आणि कबाब सुरु होते. फक्त नवाब नव्हता. हे सर्व तुमचेच लोक होते. समीर वानखेडेंच्या प्रवक्त्यानेच ती माहिती दिली, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता.
मला दिल्लीत मारहाण करण्यात आली,जीवाला धोका-सुनील पाटील
नवाब मलिकांच्या विरोधात वानखेडेंच्या वडिलांचा मानहानीचा दावा
या 22 राज्यांची पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात,इतर राज्यांत कपात नाही
धार्मिक स्वातंत्र्य:भारताला रेड लिस्ट मध्ये टाका,अमेरिकन संस्थेची शिफारश
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 08, 2021 11:59 AM
WebTitle – “Is Kranti Redkar’s sister in the drug business?” Malik’s serious allegations