मुंबई: क्रूझ ड्रग्ज प्रकरणी दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत.दररोज नवनवे आरोप,प्रत्यारोप आणि गौप्यस्फोट केले जात आहेत.गेल्या काही दिवसात या प्रकरणात सुनील पाटील हे नाव आलं.क्रूझ ड्रग प्रकरणात भाजपचे नेते मोहित कंबोज भारतीय यांनी आरोप केला होता की सुनील पाटील, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असून आर्यन खान प्रकरणाचा मास्टर माइंड सुनील पाटील असल्याचा दावा करण्यात आला होता.मध्यंतरी सॅम डिसूझा यानेही सुनील पाटील यांचे नाव घेतले होते.
यामुळे गेले अनेक दिवस पडद्यावर नसलेले सुनील पाटील स्वत: माध्यमांच्या समोर आल्याने आता या प्रकरणाला आणखी एक वेगळं वळण लागलं आहे. सुनील पाटील यांनीच समोर येत या सर्व आरोपांवर उत्तर दिलं आहे. तसेच, त्या दिवशी घडलेला घटनाक्रम समोर ठेवला आहे. मुंबईतक या वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला आहे.
मी यातला मास्टरमाईंड नाही,मी फक्त ओळख करून दिली
यातला मास्टरमाईंड मी नाही. मी कोणतीही टीप दिली नाही.मला या केसमध्ये गोवले गेले आहे.या केसमधले मास्टरमाईंड कुणीतरी वेगळेच आहेत. माझा मनीषशी संपर्क मित्र म्हणून गेल्या १०-१२ वर्षांपासून आहेत. मी मनीषसोबत कंपनीच्या एका कामासाठी २७ तारखेला अहमदाबादला गेलो होतो. मनीष भानुशाली आणि मी एकाच रूम मध्ये होतो.आणि किरण गोसावी दुसऱ्या हॉटेलला थांबला होता.आम्हाला जी टीप आली त्यावर काम करण्यास मी नकार दिला.कारण मला त्यात इंटरेस्ट नव्हता.माझे कोणत्याही एनसीबी अधिकाऱ्याशी संबंध नव्हते, समीर वानखेडे सोबत माझी ओळख नव्हती.
याविषयीची टिप मध्यप्रदेशवरून आली
मला याविषयीची टीप मनीष भानुशालीकडून आली आणि त्याला ती नीरज यादव यांच्याकडून आली.नीरज यादव मध्य प्रदेशमधला भाजपाचे वरिष्ठ कार्यकर्ता आहे.कैलास विजगवर्गीय आणि मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत.त्यांनी मला 4 वाजता कॉल केला होता.धवल भानुशाली म्हणून एक त्यांचा कार्यकर्ता आहे. जो दिल्ली येथील नोवाटेल हॉटेल मध्ये वास्तव्यास असतो,त्यांच्याकरवी मला कॉल केलेला.तेव्हा मी अहमदाबाद मध्ये होतो,तेव्हा मी काम करण्यास नकार दिला.या भानगडीत मला पडायचं नाही असं सांगितलं.
सॅम, मनीष भानुशाली आणि के. पी. गोसावी यांनी शाहरुख खानच्या मॅनेजरसोबत काही डील केली होती का? या प्रश्नावर पाटील यांनी त्याचा घटनाक्रम सांगितला. “त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते रात्रभर मुंबईत होते. मी ४ तारखेपर्यंत अहमदाबादलाच होतो. त्यांचा मला एकदा फोन आला की आमची बोलणी चालू आहेत. मला मनीषने सांगितलं की शाहरुख का लडका भी है.. मग मी म्हटलं तुम्ही बघून घ्या जे काही करायचंय ते करा”
मी राष्ट्रवादीत होतो…आता नाही
“मी १९९९ ते २०१६ या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होतो.
त्यानंतर मी कुठल्याही पक्षात कार्यरत नाही,नवाब मलिक यांच्यासोबत माझं आयुष्यात एकदाही बोलणे झालेले नाही.”
माझी इनवॉल्वमेंट फक्त पैसे देण्यापूर्ती
माझी इनवॉल्वमेंट फक्त पैसे देण्यापूर्ती कारण त्यांनी पैसे माझ्यावर विश्वास ठेवून दिले होते.तेव्हा सॅमचं म्हणणं असं होतं की आपके बोलणे पे पैसा दिया तो आप जिम्मेदार हो.तेव्हा मी फक्त दिलेले पैसे (पन्नास लाख रुपये) काढून घेण्यासाठी किरण गोसावीवर प्रेशर करत होतो.सॅमला पैसे काढून देण्यास मी फक्त मदत केली.आणि ते पैसे मी सॅमलाच दिले आहेत.
मला दिल्लीत मारहाण करण्यात आली,जीवाला धोका
तुम्ही इतके दिवस कुठे होतात ? तुम्ही अचानक समोर कसे आलात? त्यावर उत्तर देताना सुनील पाटील म्हणाले “माझ्यावर वेगवेगळे आरोप व्हायला लागले.मला दिल्लीत मारहाण करण्यात आली.मी अहमदाबादला होतो,मला दिल्लीत बोलावून नोवाटेल हॉटेलला मारहाण करण्यात आली.धवल भानुशाली मनीष भानुशाली आणि तिकडचा एकजण असे मिळून या लोकांनी मला मारहाण केली.मला स्टेटमेंट देण्यासाठी दबाव आणला गेला.तू एनसीबीचा आहेस असं काहीतरी बोल असे सांगण्यात आले. माझ्या जीवाला धोका उत्पन्न झाला,मी दिल्लीतून परत अहमदाबादला परतलो आणि तिथून मुंबई गाठली मला गुजरात मध्ये मारून फेकून देतील कुणाचा काय विषय? ” अशा शब्दात सुनील पाटील यांनी आपले म्हणने मांडले.
नवाब मलिकांच्या विरोधात वानखेडेंच्या वडिलांचा मानहानीचा दावा
या 22 राज्यांची पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात,इतर राज्यांत कपात नाही
धार्मिक स्वातंत्र्य:भारताला रेड लिस्ट मध्ये टाका,अमेरिकन संस्थेची शिफारश
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 07, 2021 20:12 PM
WebTitle – Aryan Khan drugs case I was beaten in Delhi, my life is in danger-Sunil Patil