मुंबई : कुख्यात डॉन चा भाऊ इक्बाल कासकर याला ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ईडी चौकशीत इक्बाल कासकर ने राष्ट्रवादीचे नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे नाव घेतल्याचे सांगत नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. दरम्यान, आता नवीन माहिती समोर येत आहे. इक्बाल कासकर याच्या वकिलांनी न्यायालयात एक अर्ज केला आहे. इंग्रजी येत नसताना इंग्रजी भाषेतील काही कागदपत्रांवर सही कशी घेतली, असे या अर्जात म्हटलंय. ( Iqbal did not know English language, Why Taken some English language documents signed)
इक्बाल कासकर च्या वकीलांचा आक्षेप
ईडीकडून इक्बाल कासकर ला अटक करण्यात आलीय. सध्या तो ईडीच्या कोठडीत असून कोठडीत असताना इक्बाल कासकरकडून इंग्रजी भाषेतील काही कागदपत्रांवर स्वाक्षरी घेण्यात आलीय. यावर त्याच्या वकीलांनी आक्षेप नोंदवला आहे. इक्बाल कासकर याला इंग्रजी भाषा कळत नसल्याने याबाबत अर्ज केल्याची माहिती इक्बालच्या वकिलांनी दिली.
जेलमधूनच ईडीने कासकर ला केलीय अटक
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर खंडणीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये ठाणे तुरुंगात होता.2017 मध्ये त्याच्यावर तीन गुन्हे दाखल झाल्यामुळे इकबाल कासकर ठाणे कारागृहात शिक्षा भोगत होता. हे प्रकरण खंडणीशी संबंधित आहेत. यामध्ये कासकरवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावण्यात आला आहे. इक्बाल कासकर आणि त्याचा भाऊ दाऊद याच्यावर डी गॅंग (डी कंपनी) च्या नावाखाली खंडणी उकळत असल्याचा आरोप आहे. मुंबईतील डी कंपनीचा अवैध धंदा कासकर पाहत असल्याचे सांगितले जात आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात स्थानिक न्यायालयाने बुधवारी इक्बाल कासकरविरुद्ध वॉरंट जारी केले होते. वॉरंट जारी करताना विशेष न्यायाधीश एमजी देशपांडे यांनी सांगितले होते की, आरोपीला शहरातून येथे आणून 18 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर करण्यासाठी ईडीकडून सर्व व्यवस्था करण्यात येईल. खंडणीच्या प्रकरणांमध्ये तपास यंत्रणाही त्याला परत पाठवेल, असे न्यायालयाने सांगितले.
कासकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
विशेष न्यायालयाने इक्बाल कासकर याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीकडून कोठडीची मागणी करण्यात आली नव्हती. इक्बाल कासकरची पुन्हा ठाणे जेलमध्ये रवानगी होणार आहे. इक्बालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची चर्चा सुरु होती. बुधवारी मनी लॉंड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली.नवाब मलिक याना पोटदुखीचा त्रास जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
किरीट सोमय्या यांनी डर्टी डझन ची यादी जाहीर केली
या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्यांनी ‘डर्टी डझन’ ची यादी जाहीर केली, यादीतील नावे
१. अनिल देशमुख
२. नवाब मलिक
३. अनिल परब
४. संजय राऊत
५. सुजित पाटकर
६. भावना गवळी
७. आनंद आडसुळ
८. अजित पवार
९. हसन मुश्रीफ
१०. प्रताप सरनाईक
११. रविंद्र वायकर
१२. जितेंद्र आव्हाड
इतर महत्वाच्या बातम्या/अपडेट्स
युक्रेन युद्ध : “आता जगानं दीर्घकाळ युद्धासाठी तयार राहावं” – मॅक्रॉन
रशिया युक्रेन युद्ध latest update :अमेरिका एक्शन मोडमध्ये बोलावली बैठक
रशिया युक्रेन संघर्षामागील कारणे;आतापर्यंत काय घडले पहा अपडेट्स
Jhund film।झुंड चित्रपट,आंबेडकरांचे पोस्टर व्हायरल,पाहा रिलीज डेट
Pushpa movie box office collection|पुष्पा फिल्म बॉक्स ऑफिस
बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिवजयंती च्या मिरवणुकीत सामील होतात
आंबेडकर आणि पेरियार यांचं भगत सिंग यांच्या बलिदानावर मत..
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 28, 2022 12:45 PM
WebTitle – Iqbal Kaskar doesn’t know English, how did he sign? Questions on ED’s action