राज्यातील तीन राजकीय पक्ष पुरेसे संख्याबळ पण सत्तास्थापन करण्यास भाजपकडून आडकाठी.फोडाफोडी.या तीन पक्षांच्या वैचारिक प्रवाहाला थोडं बाजूला ठेवूया.परंतु लोकशाहीत लोकशाही पद्धतीने तुम्हाला जनतेचा कौल घेऊन सरकार स्थापन करावं लागतं.परंतु असं असताना इतर पक्ष असंवैधानिक पद्धतीने आडकाठी आणतो.
लोकशाही व्यवस्थेच्या विरोधातील षडयंत्र आहे.
आता ही युती अनैतिक आहे.सत्तेसाठी वैचारिक अधपतन आहे.वगैरे चर्चा करता येवू शकते.ती करूच पण त्यांना सरकारच स्थापन करू न देणे.यासाठी रात्रीत राष्ट्रपती राजवट लावणे अन उठवणे.शिवाय बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसा वेळ न देणे.हे सगळं लोकशाही व्यवस्थेच्या विरोधातील षडयंत्र आहे.
या सर्वांपासून जर कुणी वाचवलं असेल.संवैधानिक हक्क अधिकार अबाधित राखण्याचे काम केले असेल तर ते भारतीय राज्यघटनेने केले आहे.याचं भान कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस अन शिवसेनेला नक्कीच आहे.अन ते आपणासर्वांना असायला हवं.
संवैधानिक व्यवस्था असल्याने हे निरंकुशपणे राबवता येत नाही
भारतीय राज्यघटना यासाठी देशातील प्रत्येक शेवटच्या नागरिकासाठी अतिशय महत्वाची आहे.भले तो हिंदू असो मुस्लिम असो बौद्ध असो शीख असो ख्रिस्ती आदिवासी पारशी सिंधी जैन लिंगायत असो सर्वांच्या हक्क अधिकारांचे संरक्षण भारतीय राज्यघटना म्हणजेच आपलं संविधान करत आहे.अन या सर्वांचा या देशावर समान हक्क आहे.या देशात ज्याचा जन्म झालाय तो भारतीय नागरिक आहे.असं माझं मत आहे.मी इतिहासात रमत नाही.
उद्या जर कायदा बदलला अन तुमच्या सगळ्या जमिनी स्थावर मालमत्ता यांची जप्ती आली? तुमचे बँकेतील पैसे जप्त झाले? तर तुम्ही काय करणार आहात? तसेही ते काही प्रमाणात झालेलं आहे.परंतु संवैधानिक व्यवस्था असल्याने हे निरंकुशपणे राबवता येत नाही.
आज हिंदू महिला मुलींना हक्क अधिकार मिळत
आज हिंदू महिला मुलींना जे हक्क अधिकार मिळत आहेत.इस्टेटीत वाटा मिळतो घटस्फोट घेण्याचा अधिकार अन त्यानंतर पोटगी मिळण्याचा अधिकार मिळतो तो फक्त संविधानिक तरतुदी असल्यामुळेच मिळतो.अन्यथा स्त्रिया फक्त चूल आणि मुल जन्माला घालण्याची मशीन आहे.अशी आधिकारिक वक्तव्य केलेली तुम्ही पाहिली ऐकली आहेतच.
सामान्य माणसांना संविधानाबद्दल फारशी माहिती नसते अन उत्सुकता सुद्धा नसते.परंतु तुमच्या दैनंदिन जीवनातही संविधानाचं अत्यंत महत्व आहे.अन ते पदोपदी तुमच्या हक्क अधिकारांचे संरक्षण करत असते.
तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी मिळणारा मुक्त प्रवेश,हॉटेल्स सिनेमागृह इत्यादी ठिकाणी मिळणारा भेदभाव रहित प्रवेश.ट्रेन्स मेट्रो बसेस रिक्षा अशा सार्वजनिक वाहतुकीची साधने भेदभाव विरहीत वापरण्यासाठी मिळणारी संधी.इतकच काय तुम्ही करता ती नोकरी तीचं संरक्षण तुमचा पगार हे सगळं सगळं संविधानिक तरतुदींच्यामुळे तुम्हाला प्राप्त होत आलं आहे.हे कधीही विसरू नका.
त्यांना हे सगळं विकायचं आहे.उध्वस्थ करायचं आहे.फक्त एकच गोष्ट त्यांना रोखते ती म्हणजे संविधान.म्हणून लक्षात ठेवा.
प्राणपणाने जपली पाहिजे ती गोष्ट म्हणजे भारताचं संविधान
तुमचे हक्क अधिकार स्वातंत्र्य अबाधित राखायचं असेल तर एक गोष्ट तुम्ही प्राणपणाने जपली पाहिजे ती म्हणजे भारताचं संविधान
अन देश म्हणजे काय हो? डोंगर नद्या देशाची सीमा ? राज्य त्यांचे नकाशे ? देशाचा नकाशा? म्हणजे देश होतो का? नाही अजिबात नाही.इथल्या नागरिकांचा मिळून जो बनतो तो देश असतो त्याला राष्ट्र म्हणले जाते.अर्थात आपण अजूनही राष्ट्र बनलेलो नाही.का त्याची कारणे अभ्यासा तो एक स्वतंत्र विषय आहे.तूर्तास तुमच्या स्वातंत्र्याबद्दल आपण जाणून घेतलं.
इग्रजांनी देशाच्या पायात बेड्या घातल्या नव्हत्या,इग्रजांनी देशावर नियम आडकाठी केलेली नव्हती ती केलेली लोकांवर.जनतेवर तेव्हा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा.
तुम्ही स्वतंत्र म्हणजे देश स्वतंत्र.
अन तुमचं स्वातंत्र्य भारताच्या राज्यघटनेत आहे.म्हणून ती प्राणपणाने तुम्ही प्रत्येकाने जपली पाहिजे.अन ही तुमची जबाबदारी आहे.2 वर्ष 11 महीने 18 दिवस अथक परिश्रम घेत ही प्रक्रिया सुरू होती. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संसदेने संविधानाला मंजुरी दिली. २६ जानेवारी १९५० रोजी पासून देशात लागू झालं. या दिवसापासून स्वतंत्र भारत देश आता प्रजासत्ताक सुद्धा झाला होता. संसदेने संविधानाला मंजुरी दिली राज्यघटना घटनाकारांनी देशाप्रती अर्पण केली.तो हा आजचा दिवस
खुद की आजादी से है प्यार तो
हरपल यह कहना चाहिए
मैं रहूं या ना रहूं संविधान ये रहना चाहिए
मैं रहूं या ना रहूं संविधान ये रहना चाहिए
जय भारत ! जय संविधान !
ON RECORD: डॉ. आंबेडकरांच्या संविधान निर्मिती योगदानाबद्दल
संविधान दिन : संविधान समजून का घ्यायचे?
संविधानामुळे भारतीय स्त्रिया गुलामीतून मुक्त
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो.. @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)