दुसऱ्या महायुद्धानंतर 1948 मध्ये जपान पासून वेगळे होत, रशियाच्या खुराकपाण्याच्या मदतीने उत्तर कोरिया या देशाची निर्मिती झाली. तेव्हाचा रशियाचा साम्यवादी नेता #जोसेफ_स्टॅलिन चा अत्यंत विश्वासू व खुशमस्कऱ्या #कीम_इल_संग ह्याला तिथला राष्ट्रप्रमुख बनवण्यात आलं. उत्तर कोरियाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्याचं नसलेलं योगदान रशियाच्या मदतीने त्या भूमीत पसरवण्यात आलं. तिथल्या जनतेच्या मनावर त्याच्या बद्दल इतक्या चांगल्या गोष्टी पत्रके छापून बिंबवण्यात आल्या की लोक त्याला त्यांचा देवता मानू लागले.
जगात 2021साल असलं तरी आज उत्तर कोरिया मध्ये 108 साल सुरू आहे.
दक्षिण कोरिया वरती अमेरिकेने ताबा मिळवला होता त्यामुळे रशियाला उत्तर कोरियाला
आपल्या हातचं बाहुलं करायचं होतं त्यात चीन ने ही उत्तर कोरियाला सर्वतोपरी मदत करत आपलं औद्योगिक बस्तान तिथं बसवलं.
याचाच फायदा उठवत कीम-इल-संग तिथला हुकूमशहा झाला
आणि एका साम्यवादी विचारसरणीच्या रशिया नावाच्या जागतिक महासत्तेने एक हुकूमशाही देश घडवला.
1948 ते 1994 ह्या काळात एकहाती सत्ता गाजवत कीम-इल-संग मनात नसताना निर्सगाच्या नियमानुसार मरून गेला.
त्यांनतर त्याचा त्याच्यापेक्षाही क्रूर असलेला #कीम_जोंग_इल नावाचा पुत्र तिथल्या गादीवर बसला.
आपला बाप हा ईश्वरी आत्मा होता, त्याने ह्या भूमीच्या रक्षणासाठी किती त्याग केलेत हे तो सांगू लागला.
आपल्या बापाचा जन्मदिन हा सर्वात पवित्र दिवस आहे म्हणून त्याने त्या सालापासून
उत्तर कोरियाचे नवीन कॅलेंडर लागू केले,आज उत्तर कोरिया मध्ये 108 साल सुरू आहे.
वयाच्या 11 व्या वर्षांपासून अय्याशीखोर
2011 मध्ये हे महाशय ही निसर्गचक्रात हृदयविकाराच्या झटक्याने लुप्त झाले.
पण ह्यांनी जो महान आत्मा जन्माला घातला तो आज्याचा आणि बापाचा ही बाप होता, #कीम_जोंग_ऊन म्हणतात त्या क्रूरतेच्या दूताला..
यांचा कहर म्हणजे हा पुण्याआत्मा जन्म झाल्यानंतर तिसऱ्या आठवड्यात बोलायला लागला होता,
वयाच्या सातव्या वर्षी कार चालवायला लागला होता या आणि बऱ्याच अश्या सर्कशी खेळात तो पारंगत होता
असं तिथल्या इतिहासाच्या पुस्तकात 21 व्या शतकात ही शिकवलं जातं..
लपून छपून नाव बदलून स्वित्झर्लंड मध्ये शिक्षण घेतलेला हा परमात्मा वयाच्या 11 व्या वर्षांपासून अय्याशीखोर आहे.
दुष्काळ व भूकमारीने उत्तर कोरिया मधील लोक अक्षरशः किड्या मुंगी सारखे मरत होते
आपल्या क्रूर आजोबाचा आणि बापाचा पुतळा जागोजागी उभा करणे व नवनवीन अण्वस्त्रे विकसित करणे हा यांचा छंद आहे.
उत्तर कोरिया मध्ये तेथील जनतेला कसलंही स्वातंत्र्य नाही, जगात काय चालू आहे यापासून तेथील लोक लाखो मैल दूर आहेत.इंटरनेट वापरायला आहे पण सरकारने दिलेले ठराविक अप्लिकेशन चं वापरू शकतात, व्हाट्सअप्प आणि फेसबुक काय असतं हे त्यांना अवगत नाही. टीव्ही वरती फक्त 5 चॅनेल येतात त्यात जगातील इतर देशातील संस्कृती कशी असते हे दिसणे मुश्किल आहे, झुरिच विचारधारा सोडून इतर धर्मावरती व धार्मिक साहित्यावर तेथे बंदी आहे, उत्तर कोरिया मध्ये बायबल, कुराण व इतर धार्मिक ग्रंथ घेऊन जाण्यास सक्त मज्जाव आहे, तसं आढळल्यास मृत्यूदंड ही शिक्षा आहे.
सर्व सरकारी इमारतींवर कीम-जोंग-ऊन च्या बापाचा आणि त्याच्या बापाचा फोटो हा असतोच तसच तेथील नागरिकांना त्यांच्या घरातही ह्या दोन पुण्याआत्म्यांचे फोटो लावणे बंधनकारक आहे. कोरियन लोक स्वतःसाठी कार खरेदी करू शकत नाहीत, आपला देश सोडून कुठेही जाऊ शकत नाहीत. लग्न झाल्यानंतर आपल्याकडे गावदेव करणे व कुलदैवताला जाणे ही प्रथा आहे आणि उत्तर कोरियात ही नवदाम्पत्याला लग्नानंतर पयोंग्ययांग ( राजधानी ) येथील कीम-इल-संग व कीम-जोंग-इल च्या पुतळ्यांना पुष्पहार घालणे बंधनकारक आहे. 2014 मध्ये दुष्काळ व भूकमारीने उत्तर कोरिया मधील लोक अक्षरशः किड्या मुंगी सारखे मरत होते पण जोंग-ऊन अण्वस्त्र परीक्षण करण्यात मश्गुल होता.
अमित शहा यांची सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी बरोबरी
सध्या आपला भारत देश ही त्याच दिशेने मार्गक्रमण करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली जात आहे, कोणी त्यांना विष्णूचा अवतार ही मानत आहेत. तर अमर साबळे नामक खूषमस्करे त्यांना ओबीसी चे आंबेडकर म्हणत पदासाठी लाळ घोटत आहेत. त्यांच्या पाठोपाठ गृहमंत्री अमित शहा यांची सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी बरोबरी केली जात आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मेरठ शहराचे नामकरण करून त्याला राष्ट्रपिता महात्मा गांधींचे हत्यारे नथुराम गोडसे चे नाव देण्याच्या तयारीत आहेत. हिंदुत्ववाद हिंदुत्ववाद म्हणत मनुवाद पुन्हा ह्या संविधानिक देशात पेरण्याच्या कसरती करत आहेत. पिढ्यानपिढ्या इथल्या मातीत जगलेल्या जनतेला तुम्ही येथीलच का? म्हणून पुरावे मागत आहेत. देशवासियांना नागरिकत्व सिद्ध करा म्हणून तगादा लावत आहेत आणि बाहेरील परकीयांना या या आमच्या बोकांडी बसा म्हणून आमंत्रण देत आहेत. दुसरं महायुद्ध घडवण्यात हिटलर आणि गोबेल्स या जोडगोळीचा सिंहाचा वाटा होता आता आपल्या देशातील ही जोडगोळी नक्की कोणतं पुण्यकर्म करणार आहेत हेच काही कळेना…
लेखन – आण्णा बनसोडे
9975433393
अवतार सिंह पाश…. सबसे ख़तरनाक होता हैं अपने सपनो का मर जाना..
महाश्वेता देवी, शोषित-उत्पीडित वंचिताच्या वेदनेचा आवाज
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)