बिहार : गया मध्ये नक्षलवाद्यांचे तांडव,गया मुख्यालयापासून ७० किमी अंतरावर असलेल्या डुमरिया ब्लॉकच्या मौनवर गावात माओवाद्यांनी दोन महिलांसह चार जणांची हत्या केली. चौघांनाही घराच्या बाहेरील नाल्यात लटकवण्यात आले. ठार झालेल्यांमध्ये एकाच घरातील दोन पती-पत्नींचा समावेश आहे.आणि नंतर गावातील लोकांमध्ये दहशत पसरवण्याच्या उद्देशाने घर स्फोट घडवून उडवून देऊन मोटारसायकल पेटवून दिली.
मृतांमध्ये सतेंद्र सिंग, महेंद्र सिंग, मनोरमा देवी आणि सुनीता सिंग यांचा समावेश आहे. माओवाद्यांनी एक चिठ्ठी लिहून ती भिंतीवर चिकटवली आहे.त्यात म्हटले आहे की, खुनी, देशद्रोही आणि मानवतेचा द्रोह करणाऱ्यांना फाशीशिवाय पर्याय नाही.अमरेश, सीता, शिवपूजन आणि उदय या चार साथीदारांच्या हत्येचा हा बदला आहे.या लोकांना विष देऊन त्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा माओवाद्यांनी केला आहे.आणि म्हणूनच हे कृत्य करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.भविष्यातही अशी कारवाई सुरूच राहणार आहे.असेही त्यांनी म्हटले आहे.
निवडणुकीत वर्चस्व दाखवण्यासाठी हे भ्याड कृत्य
घटनास्थळी लावलेले पत्रक जनमुक्ती छापाकार सेना, मध्य विभाग झारखंड, सीपीआय (माओवादी) यांच्या नावाने लावण्यात आले आहे.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. स्थानिकांपैकी कुणीही या घटनेवर अधिक बोलण्यास तयार नाही.
गया मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.
याप्रकरणी एसएसपी आदित्य कुमार म्हणाले,”निवडणुकीत वर्चस्व दाखवण्यासाठी नक्षलवाद्यांनी हे भ्याड कृत्य केले आहे. ज्या ठिकाणी चकमकीत चार नक्षलवादी मारले गेले त्याच ठिकाणी ही हत्या करण्यात आली.” पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली आहे.
दरम्यान,काल पोलिसांनी मोठी कारवाई केली.महाराष्ट्रातील गडचिरोली येथे सकाळी झालेल्या जोरदार चकमकीत 26 नक्षलवादी ठार झाले असून 3-4 जवान जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. नक्षलवादी (CPI (Maoist) माओवादी नेते मिलिंद तेलतुंबडे (Milind Teltumbde) हे देखील चकमकीत ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नक्षलवाद समाधान बहुपक्षीय प्रयत्नांद्वारेच शक्य आहे
अमरावती मध्ये बंद ला हिंसक वळण का लागले? बांगलादेश ते महाराष्ट्र
डॉ.कफील खान यांना क्लीनचिट मिळूनही सरकारी सेवेतून केले बडतर्फ
“जय भीम” फिल्म पाहिल्यानंतर अभिनेत्याने “पार्वती” साठी घर देण्याचे ठरवले
हे वाचा जय भीम चित्रपटातील ती केस कायद्याच्यादृष्टीने का महत्वाची जाणून घ्या
जय भीम चित्रपट:पोलिसांनी बॅग भरून लाच देण्याचा प्रयत्न केला न्या.चंद्रू
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 14, 2021 13:01 PM
WebTitle – In Gaya, four members of the same family were hanged by Naxalites