एके काळी, अफू हे ब्रिटनचे साम्राज्य कधीही न मावळत्या सामाज्यासाठी सर्वात मोठे व्यापाराचे स्त्रोत्र होते. खरंच, अफूची कथा आणि त्याचा नाश ही एक जागतिक शक्ती म्हणून ब्रिटनच्या उदयाची कथा आहे. 19 व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून हळूहळू भारताचा ताबा घेत असलेल्या ब्रिटनला दोन समस्या भेडसावत होत्या. एक ब्रिटनच्या जनतेला चायनीज चहाचे व्यसन लागले होते आणि यामुळे त्यानां तिथून मोठ्या प्रमाणात आयात करावे लागले. समस्या अशी होती की चीनला ब्रिटेनमध्ये बनवलेल्या वस्तूंपेक्षा चहाच्या निर्यातीसाठी चांदी हवी होती. अशा प्रकारे ब्रिटनची चांदी चहामुळे चीनपर्यंत पोहचत होती आणि तिजोरी रिकामी होत होती. दुसरीकडे, भारतातील वाढत्या भौगोलिक व्याप्तीमुळे ईस्ट इंडिया कंपनीचा खर्चही झपाट्याने वाढत होता. मग अफू मुळे ब्रिटिशानी एका दगडाने दोन बळी घेतले.
ब्रिटनचा हा गलिच्छ व्यवसाय शतकभर चालू राहिला
ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश सरकारने 1857 नंतर बिहार आणि बंगालमधील शेतकऱ्यांना अफू पिकवण्यास भाग पाडले आणि गाझीपूर आणि पाटणा येथे त्याच्या प्रक्रियेसाठी कारखाने सुरू केले. येथे तयार होणारी अफू कलकत्ता येथे नेली जाऊ लागली आणि तेथून ती जहाजांमध्ये भरून चीनला निर्यात केली गेली. अशा प्रकारे ब्रिटनलाही उत्पन्नाचे स्त्रोत मिळाले आणि चहाच्या आयातीच्या बदल्यात चांदी निर्यात करण्याची गरज नव्हती. ब्रिटनचा हा गलिच्छ व्यवसाय शतकभर चालू राहिला.
अफू हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे याची त्याना चांगली जाणीव होती, परंतु आपले साम्राज्य वाचवण्यासाठी त्याने अफूच्या वाईट गोष्टींकडे डोळेझाक केली. तथापि, या अफूच्या व्यापाराने केवळ ब्रिटिश साम्राज्यवादाची मुळे मजबूत केली नाहीत, तर देशामध्ये आर्थिक विषमतेची बीजेही पेरली. भारतीय पत्रकार थॉमस मॅन्युएलने ‘ओपियम इंक’ नावाचे एक अद्भुत पुस्तक लिहिले आहे, ज्यात अफूचा व्यापार आणि त्याचे जागतिक प्रभाव यावर लक्ष केंद्रित केले आहे.
हे पुस्तक वाचल्यानंतर वाचकांना हे देखील सहज समजेल की बिहारमध्ये गरिबीचा नाला का वाहतो आणि मुंबईत समृद्धीचा महासागर का वाहत आहे.
अमेरिकेचा ढोंगीपणा
अमेरिकेचा ढोंगीपणाही पुस्तकात उघड झाला आहे. तथ्य, तर्क आणि घटनांद्वारे, लेखकाने सांगितले आहे की अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने अफू आणि इतर मादक पदार्थांच्या विरोधात मोहिमेच्या नावाखाली त्यांच्या काळ्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी कसे काम केले. एकीकडे अमेरिका सर्व देशांना संयुक्त राष्ट्रांच्या झेंड्याखाली नशा औषधांविरोधात आंतरराष्ट्रीय करारावर स्वाक्षरी करण्यास प्रवृत्त करत आहे आणि दुसरीकडे सीआयएला या पदार्थांच्या तस्करीद्वारे बंडखोरांना आर्थिक मदत देत आहे तेही वेगवेगळ्या देशांमध्ये.
लोकशाहीला धोका निर्माण झाला यांचा कांगावा करण्याच्या नावाखाली अमेरिका हे सर्व करत असे आणि आता ते इस्लामिक दहशतवादाशी लढण्याच्या नावाखाली करत आहे. अमेरिकन सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (सीआयए) एजंट अफगाणिस्तानमधून पश्चिमेकडे अफूची तस्करी करण्यासाठी, अफगाणिस्तानच्या प्रतिकारासाठी निधी गोळा करण्यासाठी ,सोव्हिएत युनियनला कमकुवत करण्यासाठी अमेरीका अफु व्यापाराला प्रोत्साहन देत आहे अशा सोव्हिएत युनियनने आरोप केला होता.
जागतिक अफू उत्पादन 90 % एकट्या अफगाणिस्तानमध्ये
अल्फ्रेड मॅककॉयच्या मते सीआयएने विविध अफगाण ड्रग लॉर्ड्सचे समर्थन केले, उदाहरणार्थ गुलबुद्दीन हेकमतयार ,हाजी अयूब आफ्रिदी लोकांना प्रोत्साहन दीले . अनेक नेत्यांनी नशाचे औषधा वापर इस्लाम मध्ये ‘हराम’ आहे यांची पर्वा न करता त्यांच्या प्रदेशात अफूचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला. विशेषत: गुलबुद्दीन हेकमतयार, मुल्ला नसीम अखुंदजादा आणि इस्मत मुस्लिम हे त्याचे मुख्य एजंट होते.
1982 ते 1983 दरम्यान अफुचे उत्पादन दुप्पट 575 मेट्रिक टन झाले. यावेळी युनायटेड स्टेट्स अमेरीका ही मुजाहिदीनच्या “शस्त्रांच्या लढाईला ” ला समर्थन देणारी रणनीती अवलंबत होता ज्याचा मुख्य उद्देश सोव्हिएत युनियनला अफगाणिस्तानातून परत ढकलणे होता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की अफगाणिस्तानची जमीन जगातील सर्वात मोठ्या अफूच्या उत्पादनासाठी देखील ओळखली जाते. 1994 मध्ये 3500 टन अफूचे उत्पादन होते, जे 2007 मध्ये 8200 टन झाले. आता हे उत्पादन कमी झाले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, 2020 मध्ये अफगाण शेतकऱ्यांनी 2,300 टन अफूची लागवड केली. एका अंदाजानुसार, जागतिक अफू उत्पादन 90 % अफगाणिस्तानमध्ये आहे.
अफू वधू
या मधील आणखी एक बाब समोर आली आहे. अफगाण-अमेरिकन पत्रकार फरिबा नावा यांनी तिच्या 2011 मध्ये लिहीलेल्या ‘ओपियम नेशन: चाईल्ड ब्राइड्स, ड्रग लॉर्ड्स आणि वन वुमन जर्नी थ्रू अफगाणिस्तान’ या पुस्तकात या देशातील ड्रगच्या व्यापाराशी संबंधित पैलूंचा उल्लेख केला आहे. नावा म्हणाले की, अफगाणिस्तानच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाचा जीडीपी 60 टक्के भाग हा 400 कोटी डॉलर अफूच्या व्यापारातून येतो. लेखकाने असेही म्हटले आहे की अफगाणिस्तानच्या सीमेबाहेर हा व्यवसाय सुमारे 6,500 कोटी डॉलर आहे. या पुस्तकात म्हटले आहे की अफूच्या व्यापाराचा अफगाणिस्तानातील लोकांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम होतो. बरीच कुटुंबे अफू उद्योगावर पूर्णपणे अवलंबून आहेत आणि उत्पादक, तस्कर , एक ना एक मार्गाने त्याच्याशी संबंधित आहेत. यासह ‘अफू वधू’ ची संस्कृती देखील विकसित झाली आहे. ज्या वर्षी पिकांचे पुरेसे उत्पादन होत नाही त्यावेळी शेतकरी अफूचे कर्ज फेडण्यासाठी आपल्या मुली तस्करांना विकतात. नावा यांनी या संदर्भात दर्या नावाच्या 12 वर्षांच्या मुलीचा उल्लेख केला.
अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर आता अफगाणिस्तान
पुन्हा अंमली पदार्थांच्या तस्करीचे केंद्र बनेल की नाही ही मोठी चिंता आहे.
युरोपियन तज्ज्ञांचे म्हणणे आहे की तालिबानला अमली पदार्थांच्या व्यापारावर नियंत्रण ठेवणे सोपे होणार नाही.
याचे कारण असे की, अफगाणिस्तानातील अनेक प्रांतांमध्ये अफूची लागवड हे अनेक लोकांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन आहे.
याशिवाय, त्यांच्या आधीच्या राजवटीच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये तालिबानने अफुला त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत बनवले.
मात्र, त्यांच्या राजवटीच्या शेवटच्या दोन वर्षात त्यांनी अफूची लागवड थांबवण्याचा प्रयत्न केला.
हे अफू तालिबानी अतिरेक्यांसाठी पैशाचे मुख्य स्त्रोत आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जरी तालिबानला अफूच्या लागवडीवर नियंत्रण ठेवायचे असेल,तरीही त्यांच्यासाठी हे एक कठीण आव्हान असेल.
अशावेळी त्याला ज्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे त्यांच्या बंडाला सामोरे जावे लागेल.
अफूच्या व्यापारावर तालिबानचे अवलंबित्व वाढण्याची भीती वाढली आहे
लंडन विद्यापीठातील स्कूल ऑफ ओरिएंटल आणि आफ्रिकन स्टडीजमधील प्रोफेसर जोनाथन गुडहँड यांनी पॉलिटिको.
ईयू या वेबसाईटला सांगितले की, तालिबानच्या मागील राजवटीत
अफूच्या लागवडीला आळा घालण्याच्या तालिबानी प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना अडचणी आल्या.
यावेळी सत्ता ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तान अफूच्या लागवडीचे केंद्र राहू देणार नाही असे म्हटले आहे.
तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या पहिल्या पत्रकार परिषदेत
तालिबानचे प्रवक्ते झुबिहुल्ला मुजाहिद यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला तालिबानला
अफूची लागवड थांबवण्यास मदत करण्याचे आवाहन केले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सध्या तालिबान अफूच्या उत्पन्नावर अवलंबून नाही.
तथापि, तो त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर करत आहे.आता पाश्चिमात्य देशांनी अफगाणिस्तानला दिलेली मदत थांबवली असल्याने
अफूच्या व्यापारावर तालिबानचे अवलंबित्व वाढण्याची भीती वाढली आहे.
नोव्हेंबर 2017 मध्ये अमेरिकन लष्कराने तालिबानच्या ड्रग प्लांटवर हवाई हल्ला केला
आणि त्यांच्याविरोधात विशेष ऑपरेशनही केले. ‘आयरन टेम्पेस्ट’ नावाच्या या ऑपरेशनमागील तर्क असा होता की
या हल्ल्याचा हेतू तालिबानच्या कमकुवत नसांवर म्हणजेच त्यांच्या आर्थिक स्रोतावर हल्ला करणे आहे.
अफूच्या व्यापारातून तालिबानला त्याच्या ऑपरेशनसाठी सुमारे 60 टक्के पैसे मिळतात.
शेकडो हवाई हल्ले केल्यानंतर तालिबानच्या 200 दशलक्ष डॉलर्सच्या वार्षिक अफूच्या व्यापारावर नियंत्रण मिळवण्यात
अपयशी ठरलेल्या अमेरिकन लष्कराने ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी
तालिबानशी थेट शांतता चर्चा सुरू केल्याने त्याचे कामकाज बंद केले.
परंतु दहशतीबरोबरच अमेरिका अफूच्या व्यापारात किती आणि कोणत्या पातळीवर सामील होती हे एक गूढ आहे.
कॉर्पोरेट्स शेती : कॉर्पोरेट्स कंपन्या चा भारतीय शेती वर डोळा
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 24, 2021 17:07 PM
WebTitle – Imperialism growing under opium Afu Afim