विरार : विरारमध्ये आयसीआयसीआय च्या (ICICI Bank Virar) बँकेच्या माजी मॅनेजरने बॅंकेतील महिला कर्मचाऱ्यांवर धारदार हत्याराने हल्ला करून दरोडा टाकल्याची घटना गुरुवारी (29 जुलै) रात्री आठ वाजता घडली.अनिल दुबे असं या बँक मॅनेजर चं नाव आहे. आरोपी अनिल दुबे (Anil Dubey Bank Manager ) (माजी बँक मॅनेजर ) 1 कोटी 38 लाखांची रोख आणि सोनं घेवून फरार होण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने आरोपीला रंगेहात पकडण्यात यश आलं आहे.आरोपीने अनिल दुबे ने कर्जबाजारीपणामुळे हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
दुबेच्या हल्ल्यात असिस्टंट मॅनेजरचा मृत्यू, तर कॅशियर महिला गंभीर जखमी
विरार पूर्व येथील स्टेशन परिसरात असणाऱ्या ICICI बँकेत गुरुवार रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. बँकेवर दरोडा टाकणार हा दुसरा तिसरा कुणी नसून बँकेचाच माजी मॅनेजर असल्याचे समोर आले आहे. अनिल दुबे ने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात बॅंकेची असिस्टंट मॅनेजर महिलेचा मृत्यू झालाय. तर कॅशियर महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे. घटना घडली त्यावेळी बॅंकेत सुरक्षारक्षक नसल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने बँकेच्या कार्यप्रणालीवरही महिलांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अनिल दुबेने दरोडा का टाकला?
अनिल दुबे हा वर्षभरपूर्वीच बँकेच्या विरार शाखेत व्यवस्थापक म्हणून कामाला लागला होता.
मात्र दुसऱ्या एका राष्ट्रीयकृत बँकेत त्याला आणखी जास्त पगार आणि पद वाढवून मिळाल्याने त्याने ही नोकरी सोडली होती.
अनिल दुबेला श्रीमंतीचे प्रदर्शन करणे थाटात राहणे अशी सवय होती.दुबेला महिना एक लाख पगार होता.
पण त्याची हाव ऐशोआराम करण्याची वृत्ती त्याला कर्ज काढायला लावत होती.हाऊसिंग लोन कार लोन पर्सनल लोन अशी अनेक कर्जे त्याने काढून मजा केली.त्याचे हफ्ते फेडणे डोईजड झाल्यावर त्याने या कर्जातून बाहेर पडण्यासाठी ज्या आयसीआयसीआय बँकेत मॅनेजर पदावर काम केले त्याच बँकेत दरोडा टाकला.
बॅंकेतील 1 कोटी 38 लाखांचं सोनं आणि रोख रक्कम लुटून त्याने
महिला कर्मचारी असणाऱ्या असिस्टंट मॅनेजर योगिता चौधरी आणि आणि कॅशियर श्वेता देवरुखकर यांच्यावर सपासप वार केले.
यात योगिता चौधरी जागेवरच गतप्राण झाल्या,तर श्वेता देवरुखकर गंभीर जखमी झाल्या.
या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या योगिता चौधरी यांना ३ वर्षाचा लहान मुलगा आहे.
तर जखमी झालेल्या श्वेता देवरुखकर यांना एक पाच वर्षाचा मुलगा आहे.
घटनाक्रम
योगिता चौधरी आणि श्वेता देवरुखकर आपलं काम संपवून निघण्याच्या तयारीत असताना
रात्री आठच्या सुमारास अनिल दुबेने बँकेत प्रवेश केला.आणि तिजोरी असणाऱ्या रूम मध्ये जाऊ लागला.
त्यावेळी दोघींनी त्याला हटकले.मात्र दुबेने त्यांना धमकावले,”में जो यहा करने आया हूं,वो मुझे करने दो,बीच में मत आना”
असं बोलून त्याने तिजोरीकडे मोर्चा वळवला,तेव्हा दोन्ही महिलांना त्याला अडवण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी अनिल दुबेने सोबत आणलेल्या धारधार शस्त्राने दोन्ही महिलांवर सपासप वार केले.
जखमी अवस्थेत योगिता यांनी कसेबसे अर्धवट उघड्या शटरपर्यंत पोहोचून ते जोरजोरात वाजवले.
त्या आवाजाने बाहेरच्या नागरिकांना गडबड गोंधळ लक्षात आला,नागरिकांनी गर्दी केली.योगीता यांनी हाताने इशारा करून
कुणी आहे असे सांगितले.त्याचवेळी अनिल दुबे लुटलेला ऐवज बॅगेत भरून बाहेर पडून पळण्याच्या तयारीत असताना
नागरिकांच्या तावडीत सापडला त्यामुळे अनिल दुबेचा प्लान फसला,मात्र यात योगिता चौधरी यांचा हकनाक बळी गेला.
पोलिसाना घटनेची माहिती नागरिकांकडून देण्यात आली आणि आरोपीला अनिल दुबेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर अनिल दुबेला न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
हे ही वाचा.. धुवांधार वॉटर फॉल : त्यांच्या जीवाची किंमत फक्त ५० रूपये
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 01, 2021 13:50 PM
WebTitle – ICICI Bank Manager Anil Dubey robbery Killed one Virar