गुजरात: गुजरातमधील वडोदरा शहरात राहणारी २४ वर्षीय शमा बिंदू सध्या चर्चेत आहे. खरंतर शमा स्वत:शीच लग्न करणार आहे. म्हणजेच या लग्नात विधी, फेऱ्यांपासून पारंपारिक विधींपर्यंत सर्व काही केले जाईल, पण वर नाही. हे गुजरातचे पहिलेच स्व-विवाह लग्न आहे असे म्हटले जाते. मात्र, तीच्या या आत्मनिर्भर निर्णयाला आता विरोधही सुरू झाला आहे.
कोणत्याही मंदिरात लग्न होऊ देणार नाही : सुनीता शुक्ला
वडोदरा शहराच्या माजी उपमहापौर सुनीता शुक्ला यांनी या लग्नाला आक्षेप घेत शहरातील कोणत्याही मंदिरात या लग्नाला परवानगी दिली जाणार नाही, असे म्हटले आहे. शुक्ला यांनी मंदिराच्या विश्वस्तांनाही सदर लग्न थांबवण्यास सांगितले आहे. त्या म्हणाल्या, ‘ ती (शमा बिंदू) मानसिकदृष्ट्या विक्षिप्त आहे’ असे सांगत त्या म्हणाल्या की – ‘हिंदू धर्मग्रंथ आणि वैदिक धर्मग्रंथानुसार विवाह सामाजिक व्यवस्थेसोबत होतात. अशा परिस्थितीत शमाचा हा विवाह शास्त्राच्या विरोधात आहे.
भटजीनेही केले हात वर
शहरातील कोणत्याही मंदिरात लग्न झाल्यास त्याला कडाडून विरोध केला जाईल, असा स्पष्ट शब्दांत सुनीता शुक्ला यांनी शमाला इशारा दिला आहे. शमाला लग्न करायचं असेल तर हॉटेल बुक करा किंवा दुसरीकडे जा.लग्न करा वाढत्या वादामुळे शमाचे लग्न लावणाऱ्या भटजीनेही लग्न लावण्यास आता नकार दिला आहे.
वधू व्हायचे आहे पण लग्न करायचे नाही
या स्व-विवाहाबद्दल क्षमाचं म्हणणं आहे, ‘मला कधीच लग्न करायचं नव्हतं, तर नवरी व्हायचं होतं.
म्हणून मी स्वत:शीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. स्व-प्रेमाचे उदाहरण मांडणारी मी कदाचित माझ्या देशातील पहिली मुलगी आहे.
महिलांनाही महत्त्व आहे
एका खाजगी कंपनीत काम करणारी क्षमा म्हणते की लोक या प्रकारचा विवाह अप्रासंगिक मानतील, परंतु मला हे सांगायचे आहे की महिलांनाही महत्त्व आहे. लोक त्यांच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करतात. माझे स्वतःवर प्रेम आहे म्हणूनच मी लग्न करत आहे.
हनीमूनसाठी गोव्याला जाणार
क्षमा बिंदू चे आई-वडीलही आपल्या मुलीच्या निर्णयाने खूश आहेत. त्यांनी या लग्नाला शुभेच्छाही दिल्या आहेत. गोत्रीच्या मंदिरात क्षमाने तिच्या लग्नासाठी पाच नवस लिहिले आहेत. लग्नानंतर क्षमाने हनिमूनसाठी गोवा निवडले, येथे ती दोन आठवडे राहणार आहे.
मात्र,विवाहाला विरोध होताना दिसत असून क्षमाचा विवाह निर्विघ्न पार पडणार का? याची उत्सुकता लोकाना लागून आहे.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
Samrat Prithviraj Box Office Collection पहिल्याच दिवशी निराशा
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
RRR Box office collection पहिल्याच दिवशी 200 कोटींचा आकडा पार
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 04, 2022 17 : 40 PM
WebTitle – I decided to marry myself.shama bindu going to self marriage now gujrat mayor oppose marriage