मुंबई,दि 22 : महाविकास आघाडीचं काहीही व्हिजन दिसत नाही एबीपी माझा वृत्तवाहिनीला आज 14 वर्ष पूर्ण झाली आहेत.14 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या तरुणांचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांशी माझा संवाद या विशेष कार्यक्रमात सुजात आंबेडकर बोलत होते.सुजात आंबेडकर हे सध्या लंडन येथे इलेक्शन स्ट्रेटजी संदर्भात शिक्षण घेत आहेत.ही मुलाखत एबीपीमाझाचे पत्रकार अभिजीत करंडे यांनी घेतली.
औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील बरड वस्ती येथे 30 वर्षातून पहिल्यांदा वीज पोहोचली
हे एबीपी माझाच्या बातमीच्या प्रभावाने घडल्याने त्यांनी एबीपीमाझाचे आभार मानले.
तसेच देशाबाहेर असताना आवर्जून चर्चेसाठी बोलवल्याबद्दलही आभार मानले.
आंबेडकरी चळवळीतील विविध गटांच्या ऐक्य संदर्भातील प्रश्नावर
त्यांनी निवडणूक आयोगाच्या 2019 च्या निवडणुकांच्या आकडेवारीचा दाखला देत म्हटले की इतर आंबेडकरी गट हे राजकीयदृष्ट्या नगण्य आहेत.
याशिवाय त्यांनी उलट प्रश्न विचारला की
भाजपा कॉँग्रेस तृणमूल सीपीआय सिपीएम दक्षिण भारतातील अनेक पक्ष यामध्ये ब्राह्मण नेत्यांची लीडरशिप आहे.या लोकांना ऐक्य करण्यासाठी किंवा एका छत्राखाली येण्यासाठी का बोलले जात नाही?
वंचित बहुजन आघाडीचा इलेक्टोरियल मेरिटचा प्रयोग चालला नाही का?
या प्रश्नावर त्यांनी असे म्हटले की तुम्ही टाईमलाईन वाईज स्टॅटेस्टीक पाहिले तर असे दिसेल
2018 मध्ये स्थापन होणारा पक्ष 2019 च्या लोकसभा निवडणूकीत 43 लाख मतदान मिळवतो
याला मी डिमेरिट नाही म्हणू शकत तर इलेक्टोरियल मेरिट स्थापित केल्याचे म्हणू शकतो.
आणि हे केवळ सहा महिन्यातील यश आहे.आम्हाला आणखी वेळ मिळाला तर आम्ही आणखी काय काय करू शकतो हे दाखवून देऊ.
संवेदनशील मनाच्या व्यक्तींना आपल्या देशात आताच्या घडीला राजकारण करणे खूप अवघड आहे का?
या प्रश्नावर भूमिका मांडताना सोशल मिडियातून होणाऱ्या ट्रोलिंगवर त्यांनी फार महत्वाचा मुद्दा मांडला आणि तो मांडत असताना भविष्यातील नेतृत्व पक्षभेद विसरून समान राजकीय क्षेत्रात काम करत असताना राजकीय नेते आणि इतर प्रसिद्ध व्यक्तींच्या ट्रोलिंगवर बोट ठेवले त्यावेळी त्यांनी राहुल गांधींचा मुद्दा उपस्थित केला.
2014 पासून ज्याप्रकारे देशात,सोशल माध्यमात जे प्रचंड प्रमाणात ट्रोलिंग केले गेले त्यामुळे राहुल गांधींच्या मानसिक स्थितीवर काय प्रकारचा परिणाम झाला असू शकतो याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त करत याबाबत देशातील कोणत्याही पत्रकाराने बुद्धीवादी विचारवंतांनी विचारच केला नसल्याचे लक्षात आणून दिले.
देशातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील राजकारणाकडे कसे बघता?
या प्रश्नावर त्यांनी आपण क्लूलेस असल्याचे म्हटले.सध्यातरी कंफ्यूज आहे.म्हणजे काहीच सांगता येत नाही. यावर एक छोटेसे उदाहरण म्हणून त्यांनी डॉक्टर ऑलिव्हर हिथ म्हणून लंडन मध्ये प्रोफेसर आहेत,आणि त्यांचे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत.ते ब्रेक्झिट तज्ज्ञ म्हणूनही ओळखले जातात.तसेच त्यांचा जगभरातील राजकारणाचा अभ्यास आहे.शिवाय भारतातील राजकारणावर त्यांची स्टडी रिसर्च पेपर्स प्रसिद्ध आहेत.त्यांनी डॉ. सुहास पळशिकर डॉ. योगेन्द्र यादव डॉ. सुखदेव थोरात यांच्यासोबत काम केले आहे. त्यांना सुरुवातीचा अर्धातास केवळ हे समजावण्यात गेला की महाराष्ट्रात कॉँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसची युती होऊन त्यांनी सत्ता स्थापन केली आहे.त्यामुळे पुढे एवढं कंफ्यूजन आहे की काय होईल सांगणे कठीण आहे.यावर लोकांनी ही आघाडी स्वीकारली असे दिसते असं अभिजीत करंडे यांनी म्हटले असता यांनी युती अंतर्गत एकमेकांना स्विकारले आहे का हा खरा प्रश्न असल्याचे ते म्हणाले.तसेच महाविकास आघाडीकडेच कोणते व्हीजन दिसत नाही.विचारांच्या विरोधाभासी राजकारणावर हे तीनही पक्ष बोलत नाहीत.आताच्या होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणूकीत या तीनही पक्षांचे तीन वेगवेगळे व्हीजन दिसते मत दिसते. प्रत्येकाला वेगळे लढायचे आहे असे ते म्हणत आहेत. त्यामुळे हे सगळं विचित्र आणि गोंधळात टाकणारे आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलं की एक सोपी गोष्ट महाराष्ट्र सरकारला करता येईल ती म्हणजे केजी टु पीजी मोफत आणि दर्जात्मक शिक्षणाच्या धोरण राबवून शैक्षणिक आरक्षणाचा मुद्दा सहज सोडवता येईल.परंतु युती सरकार असेल आघाडी सरकार किंवा आताचे महाविकास आघाडी सरकार असेल या सर्व सरकारांचे शैक्षणिक खर्चाचे धोरण वा तरतूद ही 12 टक्क्यांच्याही खाली आहे.आणि महाराष्ट्रा सारख्या राज्यासाठी फारच चिंताजनक बाब आहे.
यावेळी कमी जागांचा मुद्दा उपस्थित झाला.तेव्हा सुजात यांनी प्राध्यापक विचारवंत कांचा इलैया यांचा संदर्भ देत सांगितले की जर 50 जागा आरक्षित आहेत आणि 50 जागा अनारक्षित आहेत.
आपण केवळ हेच गणित बघतो.परंतु यातला खरा मुद्दा हा आहे की आपल्याकडे केवळ 100 जागा आहेत.
आणि त्याच समस्येचे मुळ कारण आहे.यासाठी तुम्हाला शैक्षणिक संस्था वाढवाव्या लागतील शिक्षणावरील खर्च वाढवावा लागेल.
बजेट वाढवणे आराखडा तयार करणे हे सरकारने धोरण राबवणे गरजेचे आहे.
मात्र हे आपल्याकडे होताना दिसत नाही.भारतीय शिक्षण पद्धती ही “घोका आणि ओका” अशी राहिली आहे.आपण शिक्षण घेऊन सक्षम होऊ शकत नाही.
आपलं शिक्षण आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी सक्षम करतेय का हे आपण पाहिले पाहिजे असेही त्यांनी मांडले.
भविष्यातील आंबेडकरी राजकारणावर बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की
गेल्या दहा ते बारा वर्षात देशपातळीवर आंबेडकरी सांस्कृतिक सामाजिक आणि राजकीय पातळीवरही विविध प्रयोग होत आहेत.
सिनेमा,सिरियल असेल किंवा बहुजन प्रतिकावर आलेल्या टीव्ही सिरिज असतील.
अनेक पातळ्यांवर आंबेडकरी विचार ठळकपणे उमटत आहेत.
हे सकारात्मक चित्र पुढील काळात राजकीय क्षेत्रात सुद्धा पाहायला मिळेल.
ग्रेज इन कोर्टात बाबासाहेबांचे तैलचित्र !
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on JUN 22 , 2021 22 : 40 PM
WebTitle – I am an activist of the movement and have always stood for the movement – Sujat Ambedkar 2021-06-22