लंडन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन मधील ज्या ‘ग्रेज इन’ कोर्टातून बॅरिस्टर पदवी मिळवली तिथे डॉ आंबेडकर यांचा एक खास फोटो लावून सन्मान करण्यात आला आहे.डॉ.आंबेडकर यांनी जिथून बॅरिस्टर पदवी मिळवली तिथेच त्यांचं तैलचित्र लावणं जाणं हा एक प्रकारे अवघ्या भारताचा बहुमान आहे.

ब्रिटिश राजकीय तज्ज्ञ, मानवाधिकार कार्यकर्ते आणि ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्डचे (राज्यसभा खासदार) सदस्य लॉर्ड डेव्हिड अल्टन यांनी ट्विटरवरून लंडनच्या ‘ग्रेझ इन’ मध्ये डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचा जो फोटो लावण्यात आला आहे, ते शेअर केलं आहे. यावेळी लॉर्ड डेव्हिड अल्टन यांच्यासमवेत बाबासाहेबांचे पणतू सुजात आंबेडकर हे देखील उपस्थित होते.

लॉर्ड डेव्हिड यांनी ह्यावेळी सुजात आंबेडकर यांना महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे, 21व्या शतकात त्यांनी भारताला जातीपातीच्या विळख्यातून बाहेर काढण्यास प्रयत्न करावेत. लंडन मधील ‘ग्रेज इन’ ही तीच जागा आहे जिथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली बॅरिस्टर ही पदवी मिळवली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑक्टोबर 1916 साली लंडनमधील ग्रेज इनमध्ये बॅरिस्टरच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला होता.
सोबतच त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये देखील प्रवेश घेतला होता.
जिथे त्यांनी अर्थशास्त्राच्या डॉक्टरेट थीसिसवर काम करणं सुरु केलं होतं.
आणि जो त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण देखील केला होता. त्यामुळेच त्यांना डॉक्टरेट ही पदवी देखील बहाल करण्यात आली होती.
लॉर्ड डेव्हिड अल्टन यांनी शेअर केला फोटो –
ब्रिटिश राजकीय तज्ज्ञ, मानवाधिकार कार्यकर्ते आणि हाऊस ऑफ लोर्डचे सदस्य ( राज्यसभा खासदार ) लॉर्ड डेव्हिड अल्टन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून लंडनच्या ‘ग्रेझ इन’ मध्ये डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे तैलचित्र शेअर केलं आहे.
At the Unveiling of a Portrait of Dr.B.R.Ambedkar at Grays Inn I paid tribute to Santosh Dass, driving force behind the project, and told Sujat Ambedkar – Dr.Ambedkar’s great grandson- that he must help India to finally cast out caste in the 21st century https://t.co/cZ5sNCmbP4 pic.twitter.com/SHFMUSkSoh
— Lord (David) Alton (@DavidAltonHL) June 30, 2021
लॉर्ड डेव्हिड अल्टन यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘ग्रेज इन’ मध्ये डॉ. आंबेडकरांच्या चित्राच्या अनावरणप्रसंगी मला खूप आनंद होत आहे. यावेळी लॉर्ड डेव्हिड अल्टन यांनी बाबासाहेबांचे पणतू सुजात आंबेडकर यांना सांगितले की, 21व्या शतकात त्यांनी भारताला जातीपातीच्या विळख्यातून बाहेर काढण्यास प्रयत्न करावेत.
हे ही वाचा.. संयुक्त महाराष्ट्र दिन निर्मिती आणि डॉ. आंबेडकरांनी दिलेला शब्द
लेखन – जितरत्न पटाईत
( पत्रकार, सहयोगी संपादक प्रबुद्ध भारत )
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 03 , 2021 13: 00 PM
WebTitle – Dr. Ambedkar’s portrait at Gray’s Inn London 2021-07-02