मुंबई,दि 5 : मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी Stan Swamy यांचं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. भीमा कोरेगाव प्रकरणी हिंसा भडकवल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
कोण आहेत स्टॅन स्वामी ?
फादर स्टॅन स्वामी हे देशातले नावाजलेले सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.गेले तीन दशक ते झारखंडच्या आदिवासी भागात कार्यरत होते.आदिवासींच्या विस्थापनाबाबत त्यांनी मोठा लढा दिला तसेच झारखंडच्या तुरुंगांमध्ये बंदिवान असणाऱ्या हजारो आदिवासींसाठी कोर्टात आवाज उठवला.
भारतीय राज्यघटनेच्या पाचव्या दुरुस्तीनुसार आदिवासींनी देण्यात आलेल्या विशेष अधिकारांचं संरक्षण, समता जजमेंट, पेसा कायदा याविषयीचे त्यांनी कायदेशीर लढे दिले होते.आदिवासींच्या प्रश्नांवर त्यांचे मोठे काम होते.
केंद्रातील भाजपा सरकारद्वारे करण्यात येणारी जमीन अधिग्रहण कायद्यातली सुधारणा, वनाधिकार कायदा लागू करण्याबद्दलचं सरकारचं औदासिन्य, झारखंडमधल्या आधीच्या भाजप सरकारने केलेली लँड बँकची निर्मिती, आदिवासींवर नक्षलवादी असल्याचं सांगत त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावणं या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी सतत आवाज उठवला होता.
मागीलवर्षी स्टॅन स्वामी यांची प्रकृती खराब असताना कोविड-१९ च्या काळातही ९ ऑक्टोबर २०२० रोजी त्यांना झारखंड मधिल रांची येथून अटक करून मुंबईत आणल्यानंतर त्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.त्यावेळी एल्गार परिषद व माओवादी संघटनांशी आपला कसलाही संबंध नाही, असा दावा स्टॅन स्वामी यांनी केला होता.
मुंबईत आणल्यानंतर त्यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते.पार्किन्सन या रोगाने ते दीर्घकाळ आजारी होते,त्यामुळे त्यांना अन्न ग्रहण करण्यासाठी स्ट्रॉ व सीपर चा वापर करावा लागत होता.मात्र कारागृहात आल्यानंतर एनआयए कडून त्यांच्याकडील सर्व साहित्य जप्त करण्यात आले होते,त्यात स्ट्रॉ व सीपर हे सुद्धा जप्त करण्यात आले होते.ते आपल्याला परत द्यावे अशी मागणी तळोजा कारागृह प्रशासनाला केली होती पण तो त्यांना मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली होती.हा मुद्दा माध्यमात आल्यानंतर त्यांना या वस्तु पुन्हा देण्यात आल्या होत्या.
काही दिवसांपूर्वी स्टॅन स्वामी यांची प्रकृती खूपच खालावली होती तेव्हा त्यांना तळोजा कारागृहातून मुंबईतील खासगी रुग्णालयात दोन आठवड्यांसाठी उपचाराकरिता दाखल करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिले होते. आज दुपारी दीड वाजता त्यांचे निधन झाले.
हे ही वाचा.. ‘एमपीएससी’ च्या भरती प्रक्रिये बाबत आज मोठा निर्णय घेण्यात आला
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 05 , 2021 17 : 23 PM
WebTitle – Human rights activist Father Stan Swamy passes away 2021-07-05