Jammu Kashmir Elections : श्रीनगर : जम्मू-काश्मीर मध्ये मतदानाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बदललेल्या नियमांनुसार आता बिगर स्थानिक लोकांनाही जम्मू-काश्मीरच्या निवडणुकांमध्ये मतदान करता येणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी हिरदेश कुमार म्हणाले की, मतदार यादीत नाव नोंदवल्यानंतर अशा लोकांना मतदान करता येणार आहे. मतदार होण्यासाठी अधिवास प्रमाणपत्राची गरज नाही.
हिरदेश कुमार यांनी बुधवारी सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकीत गैर-स्थानिक मतदान करू शकतील. त्याच वेळी, नवीन नियमांनुसार, जो कोणी जम्मू-काश्मीरमध्ये अभ्यासासाठी आला असेल आणि त्याचे नाव मतदार यादीत नोंदवले असेल, तर तो आगामी विधानसभा निवडणुकीतही मतदान करू शकतो.
मतदारांची संख्या सुमारे 25 लाखांनी वाढू शकते
जम्मू काश्मीर मध्ये 25 लाख मतदार अचानक कसे वाढले? तर बदललेल्या नियमांनुसार, निमलष्करी दलाचे कर्मचारी, सरकारी कर्मचारी आणि मजुरांव्यतिरिक्त आगामी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत बिगर स्थानिक लोकही मतदान करू शकतात. सीमांकन आयोगाच्या अहवालावर नजर टाकली तर येत्या निवडणुकीत सुमारे २५ लाख मतदारांची संख्या वाढू शकते. म्हणजेच एकंदरीत म्हटल्यास आतापर्यंत ७६ लाख मतदारांची संख्या होती ती वाढून १ कोटीच्या जवळपास जाईल.
विरोधकांनी दिल्या तीव्र प्रतिक्रिया
जम्मू-काश्मीरमध्ये मतदानाबाबत बदललेल्या नियमांवर विरोधकांकडून तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की याचा अर्थ भाजप इथल्या निवडणूक निकालांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपला इथले जुने स्थायिक कमकुवत करायचे आहेत. दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी भाजपला आता इतके असुरक्षित वाटत आहे की मतांसाठी बाहेरून आयात करावे लागत आहे का, असा सवाल केला.
कलम 370 रद्द केल्यानंतर ही पहिलीच निवडणूक
काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होणार आहेत.
यासोबतच यावेळी स्थापन झालेल्या सरकारचा कार्यकाळ ५ वर्षांचा असेल हेही पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे.
त्याच वेळी, आतापर्यंतच्या नियमांनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये ही मुदत 6 वर्षे होती.
2019 मध्ये, भाजप सरकारच्या कार्यकाळात कलम 370 हटवण्यात आले, ज्याचा स्थानिक नेत्यांपासून सर्वत्र प्रभाव दिसून आला होता.
या ऐतिहासिक निर्णयानंतर केंद्र सरकारने देशभरात हवा केली होती.
परिसीमनानंतर वाढलेल्या जागांचे गणित समजून घ्या
जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक आयोगाने केलेल्या परिसीमनानुसार सात जागा वाढवण्यात आल्या आहेत. म्हणजेच पूर्वी ८३ जागांची संख्या वाढून ९० झाली आहे. वाढलेल्या जागांपैकी जम्मूमध्ये 6, तर काश्मीरमध्ये एक जागा आहे. एकूण 90 जागांवर बोलायचे झाले तर काश्मीरमध्ये 47 आणि जम्मूमध्ये 43 जागा आहेत. यातील दोन जागा काश्मिरी पंडितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रथमच एसटी कोट्यासाठी 9 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, PoK मधून विस्थापित निर्वासितांसाठी आरक्षण देखील प्रस्तावित आहे.
निवडणूक प्रचारात मोफत आश्वासनांची व्याख्या सर्वोच्च न्यायालय ठरवणार
‘अफजल’ बनून ‘विष्णू’ ने दिली मुकेश अंबानी ना जीवे मारण्याची धमकी
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 18,2022, 19:17 PM
WebTitle – how-did-25-lakh-voters-suddenly-increase-in-jammu-and-kashmir-understand