26 जानेवारी 2021 या दिवशी आज देशात एकीकडे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना दुसरीकडे शेतकरी आंदोलनाने मात्र या दिनाच्या दिवशी वेगळेच वातावरण तयार झाले.प्रजासत्ताक दिन काळा दिन म्हणून हिंदू महासभेकडून साजरा करण्यात आला.
देशभरातच एक चिंतेचे वातावरण
अनुषंगाने देशभरातच एक चिंतेचे वातावरण निर्माण झाले.दिल्लीत शेतकऱ्यांवर लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा मारा केल्याने गेली 65 दिवस शांततापूर्ण आंदोलने सुरू होते,ते चिघळले शेतकऱ्यांचा संयम सुटला.सरकारी पातळीवर या आंदोलनास कायम अडवणुकीच्या पद्धतीने हाताळले गेले.
अनेकदा शेतकऱ्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.त्यांचे जेवण,फुटमसाज,कपडे इत्यादींवर हिणकस शेरेबाजी झाली. आणि आज बळाचा वापर करत आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न झाला.
हे एका बाजूला सुरू असताना दुसरीकडे मात्र धक्कादायक घटना घडत होती.अखिल भारतीय हिंदू महासभा ने 26 जानेवारी या दिवशी काळा दिवस साजरा केला.
अखिल भारतीय हिंदू महासभा हे दरवर्षी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हे दोन्ही दिवस काळा दिन म्हणून साजरा करत आले आहेत.
आपण जाणून घेतलं पाहिजे की अखिल भारतीय हिंदू महासभा हे दरवर्षी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हे दोन्ही दिवस काळा दिन म्हणून साजरा करत आले आहेत.
यासाठी त्यांनी जाहीरपणे पत्रकच काढले असून ते पत्र त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविन्द (ramnath kovind) यांना पाठविण्यात आले आहे.
या पत्रकातील मजकूर वाचल्यास सामान्य भारतीय नागरीकास धक्का लागल्याशिवाय राहणार नाही.या पत्रकात भारतीय राज्यघटना म्हणजेच संविधान (constitution of india) रद्द करण्याची मागणी करून हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांना करण्यात आली आहे.
भारतीय राज्यघटना मान्य नसणे हा राष्ट्रद्रोह आहे.देशद्रोह आहे.
विशेष म्हणजे या संघटनेवर आजही बंदी सोडा साधी कारवाई देखील केली गेली नसावी असे त्यांच्या दरवर्षी प्रसारित होणाऱ्या फोटो आणि कार्यक्रमावरून लक्षात येते.
विशेष म्हणजे या संघटनेवर आजही बंदी सोडा साधी कारवाई देखील नाही
या बातमीचा व्हिडिओ इथे पाहता येईल
“गणतंत्र दिवस को काला दिवस”
“hindu maha sabha celebrates republic day as black day”
असे किवर्डस गुगल सर्च मध्ये टाकले की तुम्हाला या संघटनेशी संबंधित अशा अनेक बातम्या आढळून येतील.आश्चर्य वाटते की याबद्दल आजवर कोणतीही ठोस कारवाई केल्याचे दिसून येत नाही.
वाचकांसाठी आम्ही काही लिंक उपलब्ध करून देत आहोत
पंडित अशोक शर्मा हे या अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.
गोडसे राष्ट्राभिमानी असल्याचा पत्रकावर उल्लेख
या पत्रकावर पंडित नथुराम गोडसे अमर रहे असाही उल्लेख आहे.नथुराम गोडसे ने महात्मा गांधी यांचा खून केला होता.
गोडसे राष्ट्राभिमानी असल्याचा उल्लेख पत्रकावर आहे.
या कृत्याबद्दल देशातील प्रसारमाध्यमे देशातील पत्रकार डोळे झाकून बसलेले दिसतात.
याबद्दल कुणीही प्राइम टाइम कार्यक्रम करत नाही.किंवा कोणतीही चर्चा घडवून आणली जात नाही.
मेरठ पोलिसांनी यावेळी कारवाईचे आश्वासन दिले आहे अशी माहिती मिळत आहे.
हिंदू कोर्ट नावाची पर्यायी न्यायव्यवस्था
अखिल भारतीय हिंदू महासभा अशा अनेक कृत्यात सहभागी असल्याचे दिसून येते. मध्यंतरी गांधीजींच्या पुतळ्याला गोळ्या मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि गोळ्या झाडणारी पूजा शकुन पांडेय हिला पोलिसांनी त्यावेळी अटक केली होती. ती बातमी इथे पाहता येईल
एवढेच नाही तर या लोकानी मध्यंतरी हिंदू कोर्ट नावाची पर्यायी न्यायव्यवस्था देखील उघडली होती.
आता यावर नक्की काय कारवाई होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मात्र अशा घटना आणि त्याच्याशी संबंधित लोक कायम इतराना देशभक्ती राष्ट्रभक्ती राष्ट्रध्वज
आणि राष्ट्रगीत याबद्दल दम देताना त्यावरून राजकारण करत हिंसक कृती करताना पाहण्यात येतात.
टीम जागल्या भारत
समान नागरी कायदा (यूनिफॉर्म सिविल कोड) म्हणजे काय? जाणून घ्या