भारतीय समाज रचनेमध्ये तसेच भारतीय लोकसंख्या मध्ये हिंदू लोकांचे स्थान इतर धर्मातील लोकांच्यापेक्षा अधिक जास्त आहे. लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून पण ते अधिक आहे. समस्त समस्त हिंदू समाजाला लागू होईल असा हिंदू कायदा ब्रिटिश राजवटीत तयार करण्यात आला होता त्याचा पाया जो होता त्यामध्ये वेद, श्रुती आणि स्मृती तसेच हिंदू लोकांच्या धर्मशास्त्रांनी सांगितलेल्या आचार-विचार विषयक नियम आणि हिंदू लोकांच्या रूढी परंपरा यापासून बनलेला होता.यामध्ये वेद म्हणजे काय तर आर्य ऋषींनी रचलेल्या ऋचा.
ईश्वराने दिलेले दिव्य संदेश म्हणजेच आर्य ऋषींनी रचलेल्या ऋचा होत. श्रुती म्हणजे वेद वाक्य परंपरागत पद्धतीने ऐकलेले दिव्य ज्ञान म्हणजेच श्रुती होत. आणि स्मृती म्हणजे वेद आणि श्रुती यांच्यातील दिव्यज्ञान.या सर्वांचा समावेश हिंदू धर्मात केला गेला आहे. हिंदू धर्म हा वरील सर्व वेद, स्मृती, श्रुती यांचे पालन करणे. जो यांचे पालन करील तो स्वर्गात जाईल त्याला सद्गती प्राप्त होईल जो यांचे पालन करणार नाही त्याला दूर्गती प्राप्त होईल तो नरकात जाईल अशा पद्धतीची भावना हिंदूंच्या मनात बिंबवली गेली आहे.
हिंदूंच्या या सामाजिक श्रद्धेमुळे ब्राह्मणवर्ग,राज्यकर्ते आणि क्षत्रिय यांचे समाजात प्राबल्य वाढले ते शक्तिशाली झाले. पुरोहित वर्गाने म्हणजेच ब्राह्मण वर्गाने आपले अनियंत्रित सामर्थ्य आणि श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यासाठी समाजात हजारो जाती निर्माण करून आणि त्या जातींचे जीवन अत्यंत काटेकोररीत्या, चाकोरीबद्ध करून त्यांना जखडून टाकणारे नियम श्रुती व स्मृति हे हिंदू धर्म ग्रंथात समाविष्ट करून आपले प्राबल्य वर्चस्व सदैव कसे अबाधित राहील याची सोय हिंदू धर्मग्रंथामध्ये केली. स्त्रियांना आणि पुरुषांना ब्राह्मण वर्गाने वेळोवेळी वेगवेगळे नियम निर्माण करून ते नियम पालन करण्याचे धर्मग्रंथामार्फतच नियोजन केले या सर्वाचा परिपाक म्हणजे हिंदू समाजातील निरनिराळ्या जाती. त्यामधील स्त्री-पुरुष यांच्या जीवनात कमालीची विषमता निर्माण झाली आणि ही विषमता आपल्याला आजही पाहायला मिळते.
हिंदू कुटुंब पद्धतीच्या मालकीची जी काही स्थावर-जंगम मालमत्ता आहे त्या मालमत्तेचे वाटप हिस्सा नियोजन आणि व्यवस्था त्यासंदर्भात धर्मशास्त्र पंडितांनी दोन प्रकारच्या नियोजनबद्द टीका लिहून ठेवल्या आहेत. त्यामधील पहिली टीका म्हणजे “विज्ञानेश्वर” या महाशयांनी जे नियम लिहून लिहून ठेवले त्या नियमांना “मिताक्षर” असे नाव आहे.याचा कालावधी अकराव्या शतकातील आहे .दुसरे म्हणजे “जिमुतवाहन” नावाच्या दुसऱ्या एका महाशयाने जे नियम लिहून ठेवले आहेत त्याला “दायभाग” असे म्हटले जाते.याचा कालावधी पंधरावे शतक आहे. या दोन नियम पद्धती भारतात निरनिराळ्या प्रांतात चालू होत्या. त्यामध्ये “मिताक्षर” पद्धत प्रथम गुजरात मध्ये चालू होती पण त्यानंतर बंगाल प्रांत सोडून सर्व भारतभर ती प्रचलित झाली. “जिमुतवाहन” या महाशयांनी लिहिलेले “दायभाग” हे जे नियम आहेत ते बंगाल मध्ये प्रचलित होते.
“मिताक्षर” पद्धत एकत्र कुटुंबसंस्था यातील हक्क आणि वारसा हक्क याबद्दलचे कायदे याबाबत भाष्य करते.
यामध्ये वारसा हक्क पुत्रपौत्रादी वंशज, एका रक्ताचे नातेवाईक यांना मिळतो.
वडील हयात असताना ही मुलाला त्याच्या वडिलांच्या संपत्ती मधला हिस्सा मिळू शकतो.
पण स्त्रियांना मात्र असे कोणत्याही प्रकारचे हक्क नव्हते.
“दायभाग” पद्धती खाली मुलाला किंवा मुलांना वडलोपार्जित हिस्सा जो आहे तो वडिलांच्या पश्चात म्हणजे वडिलांच्या मृत्यूनंतर मिळू शकतो.
या दायभागाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्त्रियांना देखील याअंतर्गत पोटगीचा हक्क आहे.पोटगी द्यायला लागू नये म्हणून धर्ममार्तंडांना एक मार्ग सुचला तो म्हणजे स्त्रियांनी सती जाणे. बंगालमध्ये सतीची चाल फार प्रबळ असण्याचे कारण ह्या “दायभाग” पद्धतीत लपलेले आहे.
हे ही वाचा.. ट्विटर इंडिया ची डॉ.आंबेडकर जयंती निमित्त हॅशटॅग ची अनोखी मानवंदना
हे ही वाचा.. भारताचे संविधान: मानवी हक्कांचा प्रखर जाहीरनामा
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on APRIL 02, 2021 17:22 PM
WebTitle – Hindu Code Bill dr b r ambedkar 2021-04-02