कृष्ण जन्मला : कॉलेजमध्ये असताना एका मुस्लिम मुलीसोबत एका हिंदू मुलाचं प्रेम जुळलं, बाहेरच्या दुनियादारीची अजिबात जाणीव नसलेले दोघे जण फक्त टिपिकल पुस्तकी किडे होते. आणि या वयात कुणाला एवढी समज असते म्हणा..? प्रत्येकवर्षी फर्स्टक्लासने पास व्हायचं एवढंच त्यांच्या डोक्यात.आणि व्हायचे सुद्धा..दोघांचीही फॅमिली बॅकग्राउंड एकदम स्ट्रॉंग…कशाचीच कमी नाही..आपल्याच जगात चांगलं सुखवस्तू पिक्चरमधली कॉलेज लाईफ जगत होते.पण अंगाबांध्यानं दोघपण अगदी किरकोळ…एका झापडीत जीव जायचा अशी.
एके दिवशी मुलीच्या घरी हे प्रकरणं गेलं, मुलगा हिंदू असल्याने त्यांना हे अजिबात मान्य न्हवत…त्यांनी पोराला घरी बोलावून घेतलं
सगळे भाईजान जमले आणि पोरीचा नाद सोड म्हणून दम दिला…पोरग म्हणलं तस काय होणार नाही.
चार दोन फटके पडले,तुकडे करू वैगरे धमक्या दिल्या तरी पोरग काही माघार घेईना.
दुसऱ्या दिवशी त्यांनी पोराला सोडलं, ती रात्र त्याची कशी गेली असेल विचार करा.
पोरीवर सुद्धा दबाव टाकला, मारलं पण पोरगी सुद्धा मागे हटली नाही.
घरातून बाहेर काढले गेले
काही दिवसांनी पोरीची घरातून हाकलपट्टी झाली…
पोराने तोवर घरी सगळा मॅटर सांगितला होता पण घडलं उलटच, मुलगी मुस्लिम असल्याने तू आमचा धर्म बाटवला …, लोक आमच्या तोंडात शेण घालतील तू आमच्यासाठी मेला म्हणून पोराला झिडकारले… सगळ्यांनी संपर्क तोडला.
दोघांच्या डोक्यावरच छप्पर गेलं, आधार गेला आता पुढं काय..? आज वडापाव तरी भेटला उद्या काय परिस्थिती असेल? नुकतंच कॉलेज संपल होत म्हणून बरं नाहीतर शिक्षणाची पण वाट लागणार होती.मित्रांच्या मदतीने पोराने थोडीफार जुळवाजुळव केली,जॉब नाही..फ्रेशरला कुणी विचारत नाही.जेवढे पण पैसे होते ते सगळे संपले.या दोघांकडे पाहून भाड्याने रूम सुद्धा कुणी देईना..त्यात बाहेरच काही नॉलेज नाही. एकावर एक बेकार परिस्थिती झटके देत होती…
मला फोन आला, सगळी परिस्थिती सांगितली.
तेव्हा भावाची ड्युटी साताऱ्यातच होती, त्याला सांगून लागेल ती मदत करायला लावली.रूमचं काम झालं, भांडीकुंडी, स्टोव्ह जुळवून,कसंबसं दोघांच लग्न लावून दिलं आणि संसारला सुरवात झाली.पोरांन घरी सांगितलं लग्न केलं म्हणून.घरातले अजून पिसाळले , पोरीला डिओर्स दे म्हणून दबाब टाकू लागले…पोरानं काही एकल नाही आणि गपचूप MIDC त धडपड करीत काम धरलं.
वेळ प्रसंगी उपाशी राहून दिवस काढले, पण कुणासमोर कधीच दोघांनी हात पसरले नाहीत.
एक वर्ष गेलं आणि पोरीला दिवस गेले.मुलीची तब्येत किरकोळ असल्यानं अनेक प्रश्न पुढे उभे होते. रुटीन चेकअप सुरू केलं…जुनं-जाणतं सोबत कुणी नव्हतं.कसतरी मॅनेज करीत अखेर तो दिवस उजाडलाआणि पोरीला साताऱ्यातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं.
डॉक्टरसोबत सगळा स्टाफ खुश होऊन कृष्ण जन्मला म्हणत होता
त्यादिवशी जेवढ्यापण डिलीव्हरीज झाल्या त्या सगळ्या मुलीच्या झाल्या आणि यांच्या पोटी मुलगा झाला.तीही नॉर्मल डिलीव्हरी.डॉक्टरसोबत सगळा स्टाफ खुश होऊन कृष्ण जन्मला म्हणत होता.आम्हाला काही समजत नव्हतं पण नंतर कळलं की अरे आजचा दिवसच कृष्ण जन्माष्टीमिचा आहे आणि अख्या वार्ड मध्ये हीच हवा झाली.अतिशय खडतर परिस्थितीत कथेतल्या त्या सुद्धा कृष्णा चा जन्म झाला होता आणि या सुद्धा.
तोवर दोघांच्या घरातून हे जिवंत आहेत की मेलेत याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. दोन्ही कडचे लोक कट्टरतेला पेटलेले होते..
कारण दोन्ही कडचा धर्म भ्रष्ट झाला होता,बाटला होता.समाज काय म्हणेल हा प्रश्न होता.हे इतकं टोकाला गेलं की पोटच्या पोरांना,ऐनउमेदीच्या काळात,तुम्ही आमच्यासाठी मेलात म्हणून सरळ वाऱ्यावर सोडून दिलं.बर असंही नाही की यांच्या घरातले अडाणी आहेत.दोन्ही कडे सगळे इंजिनिअर,वैगरे उच्चशिक्षित भरलेत.पोराचा मोठा भाऊ गोल्ड मेडलिस्ट आहे आणि तोच घरातल्या लोकांची माथी भडकावून आगीत तेल ओतायचं काम करायचं.
परिस्थिती बदलायला जास्त वेळ लागत नाही
थोडा वेळ गेल्यावर सगळं काही ठीक होईल अशी त्यांची भाबडी समजूत जेव्हा मी घालतो तेव्हा, जर अश्या वेळेलाच हे सगळे सोडून जात असतील तर पुढे यांचं करायचंय तरी काय गणेशभाऊ सांगा…? या प्रश्नाला माझकडे उत्तर नाही.
पण परिस्थिती बदलायला जास्त वेळ लागत नाही..
अवघ्या चार वर्षात दोघांनी धडपड करून,धैर्याने सगळं चित्र बदलून टाकलंय.
दोघेही फर्स्टक्लास एम टेक झालेत…
पोरग चांगल्या कोजेल मधे, सगळा खर्च जाऊन दोन पैसे बाजूला पडतील अश्या पगारावर लेक्चरर म्हणून काम करत आहे, आणि पोरगी चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीत वर्क फ्रॉम होम करतेय..तिला सुद्धा चांगल्या पगाराच्या ऑफ़र्स येत आहेत पण कृष्णाकडे दूर्लक्ष नको म्हणून जेवढं घरातून करता येइल तेवढं करत करत आहे….आता सगळं व्यवस्थित सुरू आहे.
आता या सुखी दिवसाचं समाधान हे दोघांच्या चेऱ्यावर कायम दिसत मग ..अजून काय पाहिजे…?
भेटल्यावर मी मुद्दाम त्याला सलाम वालेकुम म्हणतो, आणि तो कडक मला जयभीम..!
असदुद्दीन ओवैसी अखिलेश यादव यांच्यासोबत भीम आर्मीची युती ?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on SEP 01, 2021 11:59 AM
WebTitle – hindu boy fell in love with a Muslim girl