मुंबई : महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे एक लाजीरवाणी घटना घडली आहे. येथे तीन दलित तरुणांना बकऱ्या आणि कबुतर चोरल्याच्या संशयावरून झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दलित संघटना आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. या घटनेच्या निषेधार्थ हरेगाव येथे बंद पाळण्यात आला. संबंधितांचे जबाब नोंदवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हा दाखल करून आवश्यक ती कारवाई केली जाईल.
काय आहे संपूर्ण प्रकरण
हरेगाव येथे मजूर म्हणून काम करणाऱ्या तीन दलित तरुणांसोबत ही घटना घडली. या तरुणांनी उंदिरगाव येथील गलांडे यांच्या वस्तीतून एक बकरा व चार कबुतरे चोरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर काही गुंडांनी तिन्ही तरुणांना विवस्त्र करून झाडाला उलटे लटकवले.चोरीबाबत विचारणा केली असता त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.
त्यांच्यासोबत अमानवी कृत्य करण्यात आल्याचे पीडित कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
मारहाण करताना तरुणांच्या अंगावर थुंकण्यात आले. तसेच लघवी देखील करण्यात आल्याचा आरोप आहे.
मारहाणीत शुभम वाघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड हे गंभीर जखमी झाले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माराहण करतानाच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे युवक आणि त्यांचे कुटुंब मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात.
या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीरामपूर येथील रुग्णालय गाठले.
यामध्ये सुरेंद्र थोरात, प्रदीप थोरात, दीपक ओहळ, नाना खरात, अक्षय माघाडे, अमोल शिंदे, मिलिंद सोनवणे यांचा समावेश आहे.
पोलिसांना माहिती मिळताच श्रीरामपूरच्या अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके
यांनी रुग्णालयात पोहोचून पीडित तरुणाची चौकशी केली. त्यांचे व नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष चरण दादा त्रिभुवन यांनी त्यांना रात्री दवाखान्यात ऍडमिट करून त्याच्यावर उपचार करण्यास दाखल केले, त्यानंतर जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे हे स्वतः शेकडो आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांनी दवाखान्याच्या गेटवर पालकमंत्री विखे पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला याच्या समोर धरणे आंदोलन करून गुन्ह्यात वाढीव कलम लावण्यास सांगितले, तसेच दुसऱ्या दिवशी सर्व पक्षीय रास्ता रोको करून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी यासाठी रास्ता रोको करण्यात आला त्याप्रसंगी तालुका अध्यक्ष चरण त्रिभुवन,ठोकळ,संतोष त्रिभुवन,सुमेध पडवळ,या सह शेकडो भिसैनिक उपस्तीत हो
नागरिकांनी संयम राखण्याचे पोलिसांचे आवाहन
दरम्यान, आरोपींवर कडक कारवाई करण्याचा इशारा रिपब्लिकन संघटनेच्या प्रदीप थोरात यांनी दिला आहे. अन्यथा आम्ही मागे हटणार नाही. त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. कुणालाही सोडले जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी संयम राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
प्रसिद्ध महाबोधी विहार मध्ये बीएसएपी जवानाच्या बंदुकीतून गोळ्या सूटल्या,जवान मृत्युमुखी
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 27,2023 | 12:22 PM
WebTitle – Haregaon: Dalit Youth Assaulted for Alleged Pigeon Theft