ओबीसी समाजाचे पुरोगामी, परिवर्तनशील नेते कालकथित हनुमंत उपरे काकांच्या नेतृत्वाखाली वर्णवर्चव्यवादी व्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी इतर मागासवर्गातील अनेक समाज घटकांच्या संघटनांनी एकत्र येऊन राज्यभर धर्मांतर अभियान सुरु केले होते. त्यालाचं ओबीसी बांधव बौद्ध धम्माच्या वाटेवर असे नांव देण्यात आले होते. मात्र, धर्मांतरापुर्वीचं १९ मार्च २०१४ रोजी उपरे काकांचे आकस्मित निधन झाले. त्यावेळी ओबीसी बांधव बौद्ध धम्माच्या वाटेवर हे अभियान फसते की काय अस वाटले होते. पण नाही, उपरे काकांचे सुपुत्र संदिप उपरे, ओमप्रकाश मौर्य, उल्हास राठोड आणि इतर मान्यवरांच्या नेतृत्वाखाली २५ डिसेंबर २०१६ रोजी, ओबीसी व इतर मागासवर्गातील समाज घटकांनी नागपूर दिक्षाभूमीवर धर्मांतर करुन बौद्ध धम्मात प्रवेश केला.
युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली आपल्या लाखो अनुयायांसह पवित्र नागभूमीत रक्ताचा एकही थेंब न सांडता, न भूतो, न भविष्यती अशी ऐतिहासिक धम्मक्रांती घडविली. मनुष्यहीन, भविष्यहीन, अखंड अंधारमय लाखो उपेक्षित, शोषितांच्या जीवनात परिवर्तनवादी स्थित्यंतर घडविले. बुध्दाचे धम्मचक्र जगावर फिरवून, पाश्चात बौद्ध जगाशी संबंध जोडला. भारत भूमीत बौद्ध धम्माला पुनरुज्जीव केले. त्या दिवसाची जगानेही सुवर्ण अक्षरांनी नोंद घेतली. बाबासाहेबांनी नागपूर मुक्कामी बौद्ध धम्म दिक्षा दिल्यानंतर, त्यांनी चंद्रपूरमध्ये हजारो लोकांना धम्म दिक्षा दिली आणि त्यानंतर त्यांना १६ डिसेंबर १९५६ रोजी मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सच्या अतिभव्य मैदानावर जागतीक धम्मक्रांती घडवायची होती. परंतु तत्पुर्वीचं त्यांचे अकाली महापरिनिर्वाण झाल्यांने हा जागतीक ऐतिहासिक सोहळा होऊ शकला नाही. त्यानंतर सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचे देशभर अनेक कार्यक्रम आयोजित करुन, धम्म चळवळ गतीमान केली.
अध्यक्षपदाची निवडणूक आपण जिंकलो नाही तर अमेरिकन लोकशाही संपुष्टात येईल, देशात रक्तपात होईल
असा इशारा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सध्या अध्यक्षपदाच्या रणांगणात असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
आज संपूर्ण जग हिंसाचार आणि अनैतिकतेने ग्रासलेले असून, जगाला युध्दाची नव्हे तर बुध्दाची आवश्यकता आहे,
अशा परिस्थितीत जगाला बुध्दाचा समतेचा सन्मार्गच तारु शकतो याची सर्वांना जाणीव होत आहे.
तथागत गौतम बुध्दांनी २५०० वर्षापुर्वी जगाला सत्य, अहिंसा, शांतीचा, मानवतेचा, क्रांतीचा अनमोल संदेश आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दिला आहे.
संपूर्ण जगात बुध्दाला ‘लाईट ऑफ एशिया’ म्हणतात. जगात बुध्द धम्म वैभवाने मिरवत असला तरी,
सार्या जगाचे लक्ष हे विश्ववंदनीय तथागत गौतम बुध्द यांच्या भारतभूमीकडे लागलेले असते. जगात भारतभूमीला बुध्दाची पवित्र भूमी म्हणून ओळखले जाते.
२००७ मध्ये बौद्ध धम्म दिक्षा सुवर्ण महोत्सव समितीच्या षण्मुखानंद सभागृहात झालेल्या उद्घाटकीय सोहळ्यात
अवघ्या विश्वातील बौद्ध भिक्खू प्रातिनिधीक स्वरुपात उपस्थित होते.
भारतातील काही समाज घटकांनी आपला मुळ वारसा ओळखून तो स्विकारण्याकडे कल दिला आहे. बौद्ध धम्म दिक्षा सुवर्ण महोत्सवी वर्षांत भटक्या विमुक्त समाजातील ४२ जातींमधील लाखों बांधवांनी भटक्या विमुक्त समाजाचे नेते, उपराकार लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली २७ मे २००७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, खासदार रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सवर धम्मक्रांती घडविली होती. त्यानंतर, २५ डिसेंबर २०१६ रोजी हनुमंत उपरे काकांचे सुपुत्र संदिप उपरे आणि सहकार्यांनी ओबीसी बांधवांच्या धर्मांतरांने हे धम्मक्रांतीचे चक्र पुन्हा गतीमान केले. प्रतीवर्षी धम्मचक्र परिवर्तन दिनी तसेच २५ डिसेंबर दिनी वालधुनी कल्याण व दिक्षाभूमी नागपूर आणि इतर ठिकाणी हजारों बांधव धम्माची दिक्षा घेतात, धर्मांतर करतात. ‘कल्चरली करेक्ट’ या ग्रंथाव्दारेही विविध समाज घटकातील, विविध क्षेत्रातील महिलांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत.
माहे डिसेंबर २०१२ मध्ये मुंबई येथे पहिली राज्यव्यापी निष्ठांतर परिषद आयोजीत करण्यात आली होती. आणि त्या परिषदेला ओबीसी, आदिवासी, आगरी, कोळी, भटके विमुक्त, दलित जाती जमातींच्या प्रतिनिधींनी बुध्द धम्माकडे जाण्याची गरज प्रतिपादन करुन, लाखोंच्या संख्येंने बौद्ध धम्म स्विकारण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यानुसार, हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधवांनी धर्मांतर केले आणि पुढेही धर्मांतराचे हजारो कार्यक्रम होतचं राहणार.. ओबीसी बांधव बौद्ध धम्माच्या वाटेवर अभियानाचे प्रणेते हनुमंत उपरे काकांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्रतापुर्वक अभिवादन !
मिलिंद कांबळे, चिंचवलकर
लेखक,आंबेडकरी चळवळ अभ्यासक तसेच वृत्तपत्रीय लेखनाचा तसेच सोशल मिडिया ब्लॉग लेखनाचा दहा वर्षापासूनचा अनुभव.
ऐतिहासिक : डॉ.आंबेडकर लेखन आणि भाषणे यांचे खंड हॉवर्ड युनिव्हर्सिटी ला भेट देण्यात आले
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 19,2024 | 16:20 PM
WebTitle – Greetings to OBC brother Hanumant Upare, the pioneer of the campaign on the path of Buddhism!