राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कोरोना बाधित झाल्याने उपचार घेत होते,चार दिवस उपचार घेतल्यानंतर ते पुन्हा परतले आहेत.दरम्यान राज्यातील सत्तानाट्य अजूनही सुरूच आहे.शिवसेना पक्षाचे आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार (mva government) धोक्यात आले आहे.
दुसरीकडे बंडखोर आमदारांच्या विरोधात राज्यातील स्थानिक शिवसैनिकांनी रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली असून,ठिकठिकाणी बंडखोर आमदारांचे कार्यालये ही स्थानिक शिवसैनिकांकडून फोडले जात असल्याचे चित्र आहे.यामुळे शिवसेनेसोबत बंडखोरी केलेले आमदार घाबरले असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची त्यांची भावना आहे.
आम्ही केंद्राकडून पत्र लिहून संरक्षणासाठी मदत मागू
महाराष्ट्रात शिवसैनिकांच्या विरोध प्रदर्शनावर आणि स्वतःवर हल्ल्याची धमकी व्यक्त करत दीपक केसरकर म्हणाले की,
मी हिंसेचे कधीही समर्थन करू शकत नाही. ज्याला जे करायचे ते करू द्या, एक दिवस राग शांत होतो.
सध्या लोक नाराज आहेत, त्यामुळे जाणे योग्य नाही. राग मनातून काढून टाकला की माणूस नीट विचार करू शकतो की मी हे का केले? आम्ही केंद्राकडून पत्र लिहून संरक्षणासाठी मदत मागू शकतो,असेही केसरकर म्हणाले.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पत्र लिहून घेतला मोठा निर्णय
या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बंडखोरी केलेल्या आमदारांना पोलीस संरक्षण द्यावे,
असे पत्रच मुंबई पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) आणि महासंचालकांना लिहिले आहे.
15 बंडखोर आमदारांना केंद्राकडून सुरक्षा
शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या घराबाहेर तसंच कार्यालयात तोडफोड आणि दगडफेक केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर केंद्राने या आमदारांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.शिंदे गटातील पंधरा आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. काल शिंदे गटातील 15 आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव आणि राज्यपाल यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या तोडफोडीच्या आणि हिंसक घटनांनंतर केंद्र सरकारने शिंदे गटातील आमदारांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
गुवाहाटीमधून 40 आमदारांचे मृतदेह येतील
शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. दहिसर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर कठोर टीका करताना धक्कादायक वक्तव्य केले. आता गुवाहाटीमधून थेट 40 मृतदेह येतील, त्यांना थेट शवागरात पाठवण्यात येणार असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता महाराष्ट्रातील राजकारणात आणखी तणाव वाढण्याची शक्यता आहे.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
बनावट रेमडेसिव्हिर,दुसर्या लाटेत भ्रष्टाचाराचा खेळ;६ महिने अहवाल दाबला
राहुल गांधी यांच्या कार्यालयावर हल्ला,तोडफोड,आठजण ताब्यात
महाराष्ट्राचे तीन तुकडे;तीन वेगळी राज्ये करणार – भाजप नेते उमेश कट्टी
अखेर एकनाथ शिंदे यांच्या नव्या Video मुळे सत्तेच्या संभ्रमाला The End
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 26, 2022, 17:21 PM
WebTitle – Governor Koshyari is back: he wrote a letter and made a big decision