तामिळनाडूमध्ये सत्ताधारी द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) आणि राजभवन (राज्यपाल,केंद्र सरकार ) यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. राज्यपालांचे विधानसभेतून वॉकआउट आणि तामिळनाडू विरुद्ध थामिझगम वादावर राज्यपाल आर.एन. रवी यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून ट्विटरवर ‘गेट आऊट रवी’ हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आणि अनेकांनी रवी यांना राज्यपालपदावरून हटवण्याची मागणी सुरू केली.
तामिळनाडू च्या राज्यसरकारने सभागृहात राज्यपाल आर. एन. रवी यांच्यावर विधानसभेतील अभीभाषणातील काही भाग वगळल्याचा आरोप केला आहे.तमिळनाडूच्या राज्यपालांनी धर्मनिरपेक्षता तसेच पेरियार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णादुराई, कामराज, करूणानिधींचा उल्लेख भाषणात टाळला. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी यावर आक्षेप घेत तिथेच जागच्या जागी निषेध नोंदवत सरकारने दिलेले भाषणच वाचावे असा ठराव आणला.तेव्हा चिडून राज्यपाल सभात्याग करून निघून गेले. विधानसभेच्या इतिहासात प्रथमच.विशेष म्हणजे राज्यपाल निघून जात असताना यानंतर मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी त्यांना थांबविण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही.
पोंगल च्या निमंत्रणावरून सुद्धा वाद
राज्यपालांच्या पोंगल आमंत्रणात तामिळनाडूच्या सरकार ऐवजी “थमिज़हागा अजुनार” असे शब्द वापरण्यात आले होते.राजभवनाच्या पोंगल उत्सवाच्या निमंत्रणावर राज्य सरकारच्या लोगोच्या अनुपस्थितीवरून सुद्धा आणखी एक वाद निर्माण झाला. निमंत्रणपत्रिकेवर केवळ राष्ट्रचिन्ह असल्याचा आरोप अनेकांनी केला. हे आमंत्रण तमिळ भाषे मध्ये आहे.
राज्यपालांच्या वक्तव्यानंतर वाद
गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमात राज्यपाल रवी म्हणाले होते, ” जे संपूर्ण देशाला लागू होईल अशा गोष्टी तामिळनाडूत लागू होत नाहीत. ही सवय झाली आहे. अनेक संशोधने लिहिली गेली आहेत – सर्व खोटे अन निकृष्ट काल्पनिक कथा. हे सगळं तोडलं पाहिजे. सत्याचा विजय झाला पाहिजे. तमिझगम हा अधिक योग्य शब्द आहे. उर्वरित देशाने परकीयांच्या हातून बराच काळ विध्वंस सहन केला आहे.” तामिळनाडू म्हणजे “तामिळांचे राष्ट्र” तर तमिझगम म्हणजे “तामिळ लोकांचे निवासस्थान” आणि हे या प्रदेशाचे प्राचीन नाव आहे.
द्रमुक चे राज्यपालांवर गंभीर आरोप
सत्ताधारी द्रमुक आणि त्यांच्या मित्रपक्षांनी राज्यपालांवर गंभीर आरोप करत म्हटलंय की राज्यपाल विरोधी पक्ष भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांचा अजेंडा Tamil Nadu vs ‘Tamizhagam’ पुढे नेण्यासाठी तमिझगम नावाचा वापर करत आहेत. द्रमुक नेते टीआर बालू म्हणाले, “ते अशी वक्तव्ये करतात जी तथ्यात्मकदृष्ट्या चुकीची आणि संभाव्य स्वरूपात खतरनाक आहेत.”
राज्यपालांनी सदनातून वॉक आउट केले
राज्यपाल आर. एन. रवी यांनी विधानसभेतील भाषणातील काही भाग सोडल्याचा आरोप सरकारने त्यांच्यावर करत निषेध केला.
यानंतर मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी बदल नाकारण्याचा प्रस्ताव मांडला, त्यामुळे राज्यपाल रवी चिडून सभागृहातून बाहेर पडले,
बहुधा विधानसभेच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली असावी.
भाजपच्या तामिळनाडू युनिटने राज्यपाल रवी यांचे समर्थन केले आणि ते अपमानास्पद असल्याचे म्हटले.
त्याचवेळी सीएम स्टॅलिन यांनी राज्यपालांच्या उपस्थितीतच त्यांच्याविरोधात ठराव मांडला.
‘गेट आऊट रवी’चे पोस्टर्स
‘तमिळनाडू’ ऐवजी ‘तमिझगम’ हे राज्यासाठी अधिक योग्य नाव असेल, असे राज्यपाल रवी यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात आहे.
ट्विटरवर ‘गेट आऊट रवी’ #GetOutRavi हा हॅशटॅगही जोरात ट्रेंड करू लागला आहे.
आणि अनेकांनी रवी यांना राज्यपालपदावरून हटवण्याची मागणी केली.
विधानसभेतील हाणामारीनंतर दुसऱ्या दिवशी शहरातील काही भागात ‘गेटआउट रवी’ (रवी निघून जा)
हॅशटॅग असलेले पोस्टर्स दिसू लागले. या पोस्टर्समध्ये मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या छायाचित्राला देखील स्थान देण्यात आले आहे.
राज्यपालांना हटवण्याची मागणी
काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी राज्य अस्थिर करण्याचा आरोप केला.
त्यांनी राज्यपाल आर एन रवी यांना हटवण्याची मागणी केली.
त्यांनी ट्विट केले की, तामिळनाडूमधील त्यांची स्थिती अस्थिर असल्याने राष्ट्रपतींनी राज्यपालांना तातडीने परत बोलावले पाहिजे.
जितेंद्र आव्हाड यांनी केला सॅल्युट
‘द काश्मीर फाइल्स’ ऑस्कर साठी शॉर्टलिस्ट नाही?
काश्मीर फाइल्स : नागराज मंजुळे यांचं स्पष्ट मत
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 10,2023 20:48 PM
WebTitle – Get Out Ravi ; An angry reaction against the tamilnadu governor r n ravi