पुणे : कोथरुडमध्ये दहशत माजविणाऱ्या कुख्यात गुंड शरद मोहोळ वर शुक्रवारी दुपारी पिस्तूलमधून गोळ्या झाडत हल्ला करण्यात आला.या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून मोहोळ याला तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, शरद मोहोळ चा मृत्यू झाला. मोहोळ याला यानंतर ससून रुग्णालयात नेण्यात आले याठिकाणी मोहोळ चे साथीदार मोठ्याप्रमाणावर येथे जमले होते. चारशे ते पाचशे जणांचा जमाव गर्दी करून होता.शरद मोहोळ हिंदुडॉन म्हणून ओळख निर्माण करत होता.जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सिद्दीकीचा तुरुंगातच गळा आवळून त्याने खून केल्याचा आरोप होता.गुंड कुणीही असो, त्याचा बंदोबस्तच शासनाद्वारे केला जातो.अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर दिली आहे.
कोण होता गुंड शरद मोहोळ? ‘हिंदू डॉन’ म्हणून ओळख कशी निर्माण झाली?
शरद मोहोळ पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील रहिवासी होता,त्याचे वडील शेतकरी आहेत.संदीप मोहोळ या गुंडाचा तो अत्यंत विश्वासू होता.मोहोळ संदीपचा ड्रायव्हर म्हणून काम करत होता. संदीप मोहोळचा ४ ऑक्टोबर २००६ रोजी पौड फाटा चौकात भरदिवसा गोळ्या झाडून प्रतिस्पर्धी टोळीने खून केला होता.त्याचा बदला म्हणून मोहोळ अन त्याच्या साथीदारांनी निलायम चित्रपटगृह परिसरातील एका उपहारागृहात प्रतिस्पर्धी टोळी असणाऱ्या गणेश मारणे टोळीतील किशोर उर्फ पिंटू मारणे याचा गोळीबार करुन खून केला.शरद मोहोळची दहशत वाढली.
मोहोळ येरवडा तुरुंगात होता,येरवड्यातील अंडा सेलमध्ये जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी कतिल सिद्धीकी हाही तिथे होता,
त्याचा पायजम्याच्या नाडीने गळा आवळून खून करण्यात आला होता.
हा खून शरद मोहोळ आणि साथीदारांनी केला असा आरोप करण्यात आलेला.कतिलच्या खुनानंतर मोहोळ देशभरात चर्चेत आला.
आणि हिंदू डॉन म्हणून त्याची राजकीय स्तरातील लोकांनी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली.
कतिल सिद्धीकी च्या खुनाच्या आरोपाखाली शरद मोहोळ आणि अलोक भालेराव यांना अटक करण्यात आली होती,
मात्र नंतर २६ जून २०१६ रोजी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
शरद मोहोळ च्या पत्नी चा भाजपा मध्ये प्रवेश
तुरुंगातून सुटल्यानंतर शरद मोहोळ विविध राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेऊ लागला होता.
त्याची पत्नी स्वाती मोहोळ हिने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.आणि सुतारदरा परिसरात पक्षाचे काम सुरू केलं.
भाजपा नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला होता.त्यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ तसेच शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे याप्रसंगी उपस्थित होते. गुंडाच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते,विरोधी पक्षाने यावर जोरदार टीका केली होती.
मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. जुलै 2022 मध्ये शरद मोहोळला पुणे शहर व पुणे जिल्ह्यातून तडीपारदेखील करण्यात आले होते.अशा कुख्यात गुंडाच्या पत्नीला भाजपामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश देण्यात आला होता.पुण्यातल्या गुंडांना पाठीशी घालणं आणि त्यांना राजकारणात सक्रिय करणं यामध्ये भाजपा देखील मागे नाही, हे यातून दिसून आलं होतं. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनदेखील गजानन मारणे या गुंडाच्या पत्नीला पक्षामध्ये प्रवेश देण्यात आला होता.त्यावरुन या दोघांनी एकमेकांवर टीका केली होती.
शरद मोहोळ (पुणे) याची हत्या कुणी आणि का करण्यात आली?
शरद मोहोळ ( sharad mohol pune पुणे) याची हत्या त्याच्याच जवळच्या साथीदारांनी केली.ही हत्या जमिनीच्या वादातून आर्थिक देवाणघेवाण वरून झालेल्या वादातून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.शरद मोहोळचा साथीदार मुन्ना उर्फ साहिल पोळेकर याने ही हत्या केल्याचे समोर आले आहे.जमिनीच्या वादातून आर्थिक देवाणघेवाण यावरून या दोघांचे मोठे वाद झाले होते.यातून ही हत्या केली गेली.
असा केला शरद मोहोळचा गेम
घटनेच्या दिवशी शरद मोहोळ दुपारी एक वाजता घराबाहेर पडला होता. त्यावेळी आरोपीही त्याच्यासोबतच होते. शरद मोहोळ पुढे चालत जात असताना मुन्ना पोळेकर याने मोहोळ वर मागून चार गोळ्या झाडल्या.यातील एक गोळी पायाला आणि दोन गोळ्या पाठीत लागल्या. मोहोळ हल्ला कोणी केला हे पाहायला मागे वळला तेव्हा त्याच्या छातीत चौथी गोळी झाडण्यात आली.गोळीबाराच्या आवाजाने आजूबाजूचे रहिवासी बाहेर आले त्यावेळी मोहोळ जखमी अवस्थेत पडला होता आणि आरोपी फरार झाले होते.मात्र,तपासाची चक्रे जलद फिरली आणि पुणे सातारा रोडवर किकवी ते शिरवळ दरम्यान एका संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करत पोलिसांनी 8 आरोपींना ताब्यात घेतलं.त्यांच्याकडून 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राउंड आणि दोन चार चाकी गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
गुंड कुणीही असो, त्याचा बंदोबस्तच शासनाद्वारे केला जातो- फडणवीस
शरद मोहोळ ची हत्या झाल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले की, “ही घटना घडल्यामुळे राज्यात कुठेही टोळीयुद्ध होण्याची शक्यता नाही, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होणार नाही. सदर कुख्यात गुंडाची हत्या त्याच्याच साथीदारांनी केलीय. गुंड कुणीही असो, त्याचा बंदोबस्तच शासनाद्वारे केला जातो. त्यामुळे असं टोळीयुद्ध करण्याचा प्रयत्न कुणीही करणार नाही.” अशी प्रतिक्रिया पुण्यात माध्यमांशी संवाद साधत असताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
धक्कादायक : मुस्लिम नावाने ID बनवून राम मंदिर उडवण्याची धमकी देणाऱ्या दोघांना अटक
हिट अँड रन चा नवा कायदा काय आहे जाणून घ्या, ज्यामुळे वाहनचालक तणावात; देशभरात चक्का जाम सुरू
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 06,2024 | 11:00 AM
WebTitle – gangster Sharad Mohol pune killed in Kothrud