दरवर्षी पाऊस येतो आणि काही जिल्ह्यात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण करून जातो. मग आपत्कालीन व्यवस्था उभारत सर्व समाजातील माणसातील माणुसकी जागी होते,जो तो आपापल्या परीने मदत गोळा करून वाटप करण्याचे पुण्यकर्म करतो.अशावेळी राजकीय पक्ष नेते दौरे करून पाहणी करतात.दुसरीकडे सामाजिक संस्था संघटना सामाजिक जबाबदारी स्वीकारून आर्थिक मदत निधी संकलन करतात, पूरग्रस्तांना, संकटगस्तांना मोठ्या उत्साहात मदतकार्य करतात.त्यामुळे त्यांचे नांव इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहल्या जाते.ते खरोखरच कौतुकास पात्र ठरतात,इतरांना प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरतात. कोकणात कधी नव्हे इतका महाप्रलय आला आहे.
महापुराच्या संकटाने कोकण पुन्हा किमान दहा वर्षे मागे गेला
विशेषत: चिपळूण शहराची परिस्थिती फार भयानक झाली आहे.त्या सोबत खेड महाड राजापूर सर्व बाजारपेठा उध्वस्त झाल्यात.अनेक घर संपूर्ण पाण्याखाली गेली. प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.कोकणातील हजारो कुटुंबे अतिशय अडचणीत आहेत.तर हजारो कुटूंब पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत.संकटामागून संकट येत आहेत, काही दिवसांपूर्वी चक्रीवादळात किनारपट्टी उद्ध्वस्त झाली होती त्यातून पूर्णपणे सावरत नाही तोच महापुराचा जबरदस्त तडाखा बाजारपेठेला बसला आहे. लघुउद्योग-व्यवसाय प्रगतीच्या दृष्टीने कोकण विभाग पहिलाच मागे असतांना महापुराच्या संकटाने कोकण पुन्हा किमान दहा वर्षे मागे गेला असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही.
हजारो वर्ष निसर्गाच्या सानिध्यात राहणारा कोकणवासी पर्यावरण,जंगल तोड,ग्लोबल वार्मिंग,पूरग्रस्त परिस्थिती शासकीय यंत्रणांचा ढिसाळपणा,आपत्कालीन व्यवस्था (डिझास्टर मॅनेजमेंट) नावाची गोष्टच कोकणात अस्तित्वात नसल्यामुळे कोकणातील नावाजलेली शहर पुरगस्त होणे विज्ञानाच्या दृष्टीने मोठे अपयश म्हणावे लागेल.हजारो वर्षांपासून अमंलात येणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी कडे कसे दुर्लक्ष केले त्यावर जाहीर चर्चा करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात घेतल्या जाणाऱ्या अनेक दक्षतेमुळे किती पाऊस पडला तरी नुकसान होत नव्हते. अशा अनेक गोष्टींची चर्चा आपल्याला करता येईल.आज या सर्व चर्चा करण्यापेक्षा आपण आपल्या सर्वच जाती धर्माच्या माणसाला मदतीसाठी पुढे येणे आवश्यक आहे.
आपत्कालीन व्यवस्था वेळेवर दिसली नाही
जागतिक पातळीवर सुप्रसिद्ध असलेलं शहर म्हणजेच महाड! महाडच्या महापूराने महाभयंकर नुकसान झाले आहे.पूरग्रस्त परिस्थितीत जवळपास सर्वच महाडकरांचे घरात कपडे अन्नधान्य जीवनावश्यक सर्वच वस्तू अनपेक्षितपणे पुरात वाहून गेल्या किंवा गाळात कायमस्वरूपी खराब झाल्या आहेत.आपत्कालीन व्यवस्था वेळेवर दिसली नाही.कोकणी माणसं नेहमीच स्वाभिमानी असतात.कितीही नुकसान झाले तरी चेहऱ्यावर जराही हतबलता दाखवित नाही, पण यावेळची परिस्थिती वेगळी व भयानक आहे.प्यायला पाणी नाही, घरादारात चिखलच चिखल झाल्यामुळे कोणताही पर्याय उपलब्ध नाही.काल पर्यंत सगळ होत आणि आज अंगावरचे ओले कपडे सोडले तर काहीच उरल नाही.प्रसंग मोठा कठीण आहे. बर काही जणांकडे पैसे आहेत पण बाजारात वस्तूच मिळणार नाही सारा चिखल आहे.केवळ जीव वाचला एवढ काही ते मानसिक समाधान.
महाड,चिपळूण खेड या शहरातील सकळ भागांत पाण्यात बुडणाऱ्या कुटूंबांना मुस्लिम समाजाने मोठा माणुसकीचा आधार दिला.रात्रीच्या अंधारात बॅटरी ने माणसांना शोधून पाण्याबाहेर काढले दोन तीन दिवस रात्र त्यांना अन्न पाण्या वाचून राहावे लागले. या भागाची आम्ही पाहणी केली, पूरग्रस्तांना भेटून चर्चा केली, तेव्हा अनेकांनी म्हटलं की घरातील सर्व वस्तू गेल्या त्यांचे दुःख नाही तर आम्ही वाचलो तेच आम्हाला मोठे आहे, कष्टाचे कामे करून आम्ही ती पुन्हा पुन्हा विकत घेऊन संसार उभा करू शकतो.पण ज्याच्या कुटुंबातील कमावती व्यक्ती गेली ती परत मिळवता येणार नाही.
काही मुलांचे आईवडील,भाऊ बहिण गेले ते तर कायमचे निराधार झाले.हे दुःख कायमस्वरूपी राहणार आहे.पण सरकारकडे आपत्कालीन व्यवस्थापन नाही यांचे खूप मोठे दुःख आहे.संकटात सापडलेल्या माणसांना त्यांच्या कुटुंबांना मदत करणे आवश्यक असतांना त्यांच्या जाती चा विचार करून मदत केली जात नसेल तर आपत्कालीन व्यवस्था म्हणजे काय हे स्वतःला सुवर्ण समजणाऱ्या डुकरांना काय म्हणावे कळत नाही.
जातीच्या मुद्यावरून गावात अंतिम संस्कार करण्यास मनाई
पोसरे गावातील सतरा कुटुंबातील माणसं दरडखाली गाडले गेल्यावर मदत करण्यासाठी कातकरी आदिवासी पुढे आले त्यांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्या पांच माणसांच्या प्रेत बाहेर काढले पुढे त्यांना काही कारणास्तव काम करण्यास मनाई करणात आली.तालुक्यातील जिल्ह्यातील कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनी तिव्र असंतोष व्यक्त झाल्यावर आठ तासाने बाकी प्रेते काढण्यात आली.त्या नंतर ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली त्यांना जातीच्या मुद्यावरून गावात अंतिम संस्कार करण्यास मनाई करण्यात आली.त्यावेळी सरकारी आपत्कालीन व्यवस्थापनाचे काम पाहणारे अधिकृत अधिकारी कुठे होते आणि काय करीत होते.हा प्रश्न कोणीच विचारला नाही.लोकप्रतिनिधी अशा संकटात पुढे आले पाहिजे.पण ते ही जातीच्या चौकटीत बंधिस्त होतात ही भारताच्या लोकशाहीला लागलेली कीड सतर वर्षानंतर ही गेली नाही.आम्हाला ही आरक्षण पाहिजे असे मागणी करणाऱ्यांनी या घटने कडे पाहावे.
सामाजिक सुरक्षा ही राज्य सरकारची जबाबदारी असते.अन्न मिळविण्याचा हक्क आहे.केंद्र सरकारने 4882 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षितता अभियानाची सुरूवात केली आहे. 11 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींची पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी सरकारतर्फे किशोरी शक्ती योजनादेखील व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे.आपत्कालीन व्यवस्था नियोजन चक्रातील प्रमुख घटक कोणतीही नैसर्गिक आपत्ती पूरग्रस्त परिस्थिती किंवा अन्य आपत्ती, अपघात यासारख्या घटनांना आपण सामोरे जात असतो. जेष्ठ नागरिकांसाठी विविध योजना अंतर्गत कुटूंबात मिळणाऱ्या सोयी सुविधा, आधुनिक उपचार पध्दती, वैद्यकीय सुविधा, राहणीमान, सकस आहार व आरोग्याविषयी जागृती निर्माण झाल्यामुळे आयुष्यमान वाढत आहे.निवृत्तीवेतन कौटुंबिक आणि वैवाहिक लाभ हा गरीब कुटुंबांतील मिळवत्या व्यक्तीचा मृत्यू, वृध्दत्व,लग्नखर्च ह्यांकरीता सामाजिक सहाय्य करण्यासाठी राष्ट्रीय धोरणाची ओळख करून देण्यात आली आहे.
सामाजिक सुरक्षा
प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य, दळणवळणाची साधने उपलब्द व्हावी यासाठी प्रयत्न करणे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत दळणवळणाची साधने अधिक दर्जेदार व्हावी यासाठी परिवहन विभागाने गेल्या तीन वर्षात अनेक योजना व उपक्रम राबवले.मानवी हक्क : मानवी हक्कांची संकल्पना नैसर्गिक विधी ह्या संकल्पनेचे अपत्य आहे. जन्मानेच माणूस काही हक्क घेऊन येतो.त्या गृहीतकृत्यांवर ह्या हक्कांची मांडणी करण्यात येते.रोजगार गरिबी-प्रतिरोधक धोरणान्वये गरिबी दूर करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी विविध कार्यक्रम आपल्याकडे अनेक वर्षे राबविण्यात येत आहेत सामाजिक सुरक्षा (सोशल सिक्युरिटी ).व्यक्ती आणि तिचे कुटुंब यांच्या कल्याणार्थ आर्थिक सुरक्षितता देणारी व्यवहार्य तत्त्वप्रणाली.
सामाजिक सुरक्षिततेची उपाययोजना मानवी समाजाच्या सुरूवातीपासून मानवाने या ना त्या स्वरूपात केलेली होती. माणसाच्या आयुष्यात काही अकल्पित दुर्घटना घडत असतात त्यांतून आर्थिक असुरक्षितता वाढते, त्या संकटांना तोंड देणे कठीण जाते.म्हणूनच प्रत्येक देशात आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा चोवीस तास सज्ज असते.आपल्या देशात शहरीभाग असो कि ग्रामीण भाग ही यंत्रणा जातीव्यवस्थेच्या चौकटीतून बाहेर निघतांना दिसत नाही.आग ही आगच असते पण ती कोणत्या वस्तीत,कोणत्या समाजाच्या धंद्याला लागली यावर त्याची उपाय योजना ठरविली जाते.
सामाजिक स्वयंसेवी संस्था मदत कार्य
पुरगास्तांना संकट समयी पाणी बाॅटल, नाश्ता, जेवण, मेणबत्ती, आगपेटी जीवनावश्यक सामान कपडे,
अंथरुण-पांघरुन सर्व सामुग्री उपलब्ध करुन देण्याचे जिल्हाधिकारी प्रशासकीय अधिकारी वर्गांचे काम असते
सोबत सामाजिक स्वयंसेवी संस्था यांना घेऊन मदत कार्य करणे आवश्यक असते.
विविध संघटनाच्या माध्यमातून आपण आपल्या बांधवा करता तातडीची मदत गोळा करायचे आवाहन केले जाते.
मदत वाटप करतांना गरजू लोकांना भेटणे अपेक्षित असते
पुरग्रस्तांना लागणारे तातडीचे अन्नपदार्थ म्हणाजे धान्य,स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या वस्तू,
आणि पाण्याचे बॉक्सेस ही तातडीची मदत वस्तू रूपाने किंवा या वस्तू खरेदी करण्याकरता मदत निधी
आणि वस्तू रूपाने मदत जमा केली जाते.
पण ही वाटप करतांना गरजू लोकांना भेटणे अपेक्षित असते.
बरेच वेळा स्थानिक कार्यकर्ते बाहेरून आलेला मदत निधी गरजू लोकां पर्यंत पोचू देत नाही.
त्यावर आपत्कालीन व्यवस्थापनाचे नियंत्रण असणे आवश्यक असतांना त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते.
मग हा मदत निधी मधले लोक स्वता लाटून स्वताची घरे भरतात.
हा अनुभव प्रत्येक वेळी येत असतांना त्यावर कडक उपाय योजना करावी असे कोणत्याही सरकारला आणि समाजाला वाटत नाही.
आग लागल्या नंतर विझविण्यासाठी रस्ता कुठे आहे हे शोधावे लागते.पावसाचे पाणी तुंबल्यावर त्याला वाट कशी करावी ते शोधली जाते.
पूर आल्यानंतर उपाय कसे करावे शोधल्या जाते.ब्रिज पडल्यावर उपाय शोधले जातात.
महाड,चिपळूण खेड या परिसरात झालेली पूरगास्तांची जीवित,आर्थिकहानी
ही बेजबाबदार शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधीच्या वागण्यामुळे झाली
हे शंभर टक्के सत्य असतांना त्यावर कोणीच लिहणार,बोलणार नाही.
कारण आपत्कालीन व्यवस्थापन हे निपक्ष निर्भीडपणे काम करणारया कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे असावे लागते.
तरच आपत्कालीन व्यवस्थेत सर्वांना योग्य मदत मिळू शकते.
यांचे सर्व भारतीय नागरिकांनी गांभियाने विचारमंथन करायला पाहिजे.अन्यता संकटात नियमितपणे वाढ होत राहणार आहे.
चिपळूण पुरग्रस्तांना महिला बचत गटांनी दिला मदतीचा हात
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 12, 2021 16:00 PM
WebTitle – Flood Relief Fund, casteism disaster management