26 जानेवारी 2021लाल किल्ल्यावर शेतकऱ्यांनी फडकवला झेंडा
आताची मोठी अपडेट लाल किल्ल्यावर शेतकऱ्यांनी फडकवला झेंडा
शेतकरी विरोधी विरोधी कायदे मागे घेण्यासाठीचे आंदोलन आता निर्णायक वळणावर आल्याचे दिसत असून
पोलिस आणि शेतकरी यांच्यात संघर्ष होताना दिसत आहे.
शेतकरी आंदोलनातील संघर्ष सुरू असताना काही आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर परिसरात शेतकरी संघटनेचा झेंडा फडकावला आहे.
झेंडा फडकवणारी ही दुसरी घटना आहे.
दरम्यान, पोलिसांच्या गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू झाल्याचा आरोप शेतकरी आंदोलकांनी केला असून आता त्याच्यासाठी वेगळे ठिय्या आंदोलन सुरु झाले असून आम्ही आता केवळ सरकार सोबत बोलणी करू असा पवित्रा शेतकरी आंदोलकांनी घेतला आहे.
शेतकरी नेत्यांपैकी एक योगेन्द्र यादव यांनी शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन केले असून आंदोलनाला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे, माध्यमांशी बोलताना यादव म्हणाले “जो रूट निश्चित केला आहे त्याच मार्गावर चालावे,तसेच माझ्या आतापर्यंतच्या माहितीप्रमाणे कुठेही आतापर्यंत लाठीचार्ज झालेला नाही गोळीबार झालेला नाही,या अफवा आहेत त्यावर विश्वास ठेवू नये.मागील दोन महिन्यापासून आपण शांतता पूर्ण आंदोलन करत आलो आहोत आणि देशाने आणि जगानेही आपल्या आंदोलनाचे कौतुक केले आहे. त्यामुळे गणतंत्र दिवसाच्या दिवशी कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी. शांती टूटी आंदोलन टुटा असं व्हायला नको.”
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)