गेल्या 26 तारखेपासून सुरू झालेले शेतकऱ्यांचे आंदोलन आजही सुरूच असून त्यावर सरकारच्या वतीने कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. दरम्यान पंजाबमधील अव्वल क्रीडापटू आणि प्रशिक्षकांच्या गटाने केंद्र सरकारने देशातील तीन वादग्रस्त अध्यादेशांना रद्द न केल्यास देशातील सर्व पदके व सरकारचे पुरस्कार परत करण्याची आणि दिल्लीला घेराव घालण्याची धमकी दिली आहे.
सरकारचे पुरस्कार परत करण्याची धमकी
आंदोलक शेतकर्यांच्या समर्थनार्थ पुढे आलेल्या खेळाडूंमध्ये कुस्तीपटू
पद्मश्री पुरस्कार कर्तार सिंग,ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता हॉकीपटू गुरमेल सिंग, जो अर्जुन पुरस्कारप्राप्त आहे, ऑलिम्पिक हॉकीपटू आणि अर्जुन पुरस्कारप्राप्त सज्जन चीमा आणि माजी भारतीय हॉकी कर्णधार यांचा समावेश आहे. राजबीर कौर, ज्याना भारताच्या “गोल्डन गर्ल” म्हटले जाते आदींचा समावेश आहे.या सर्व खेळाडूंनी जालंधर येथील प्रेस क्लब येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत आपले म्हणने मांडले आहे.ते म्हणाले की, नवीन शेतीविषयक कायदे शेतकर्यांच्या बाजूने नसल्याने सरकारने हे कायदे मागे घ्यावेत,सरकारने ऐकले नाही तर जवळपास 150 पद्मश्री पुरस्कार विजेते आपले पुरस्कार सरकारला परत करतील.
गेल्या आठवड्याभरात नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर महिन्यात मंजूर केलेल्या नवीन कायद्यांचा निषेध करण्यासाठी हजारो शेतकरी,
पाण्याचे तोफ, अश्रू धूर आणि हरियाणा पोलिसांचे बॅरिकेड्स ह्यांचा मारा सहन करत दिल्लीच्या सीमेवर पोहोचले आहेत.
यातील काही जण शहरात प्रवेश करण्यास यशस्वी झाले आहेत, तर उर्वरित लोक सीमावर्ती भागात बसले आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीला संसदेने मंजूर केलेल्या तीन शेतीविषयक कायद्यांचा अंत पाहण्याकरिता
जे करायला हवे होते ते करण्यास शेतकरी तयार आहेत.त्यांनी निर्धार केला आहे. असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)