नवी दिल्ली : कृषी विधेयकांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचा आवाज संपूर्ण जगभरात पोहोचविणाऱ्या किसान एकता मोर्चाचे फेसबुक पेज वर फेसबुकने कारवाई केली आहे. कम्युनिटी स्टँडर्डचे कारण देत फेसबुकने हे पेज बंद केले आहे. याबाबत किसान एकता मोर्चाने ट्विट करून माहिती दिली होती.मार्क झुकरबर्ग हा फेसबुकचा निर्माता मालक आहे.
फेसबुकचे कम्युनिटी स्टँडर्ड हे फक्त भाजप विरोधी लोकांच्या विरोधातच काम करत असते
लक्षात असावं, फेसबुकचे कम्युनिटी स्टँडर्ड हे फक्त भाजप विरोधी लोकांच्या विरोधातच काम करत असते.याशिवाय इतर दल आणि इतर संघटना आयटी सेल यांचे पेजेस फेक न्यूज चा भडिमार हे सर्व बेधडक सुरू असते.याविषयीच्या बातम्या आपण वेळोवेळी पाहिल्या वाचल्या आहेत.विशेष म्हणजे जागल्या भारतला सुद्धा अशीच कम्युनिटी स्ट्राईक मध्यंतरी देण्यात आलेली होती, त्यावेळी जागल्या भारत चे वाचक जागल्या भारतच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. अनेकांनी ट्विटर आणि फेसबुकवरून फेसबुक व्यवस्थापकांना जाब विचारला आम्ही ईमेल्सद्वारे अपील केले त्यानंतर ती स्ट्राईक हटवली गेली. यापुढेही असे काही झाल्यास आम्ही फेसबुकचे विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी करून ठेवलेली आहे.अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी जागल्या भारत कदापि सहन करणार नाही.
किसान एकता मोर्चा हे पेज पुन्हा रिस्टोर करण्यात आले
यावेळी किसान एकता मोर्चा संदर्भातही असेच झाले.
देशभरात शेतकरी आंदोलन हा मुद्दा तापत असल्याने देशभरातील नागरिक यावेळी किसान एकता मोर्चा बाजूने उभे राहिले.
अनेकांनी फेसबुकचे निर्माते संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना याबाबत थेट जाब विचारला.
अनेकांनी जागतिक पातळीवरील न्यूज एजन्सीसना याबाबत माहिती दिली.यामुळे फेसबुकचे धाबे दणाणले.
आणि किसान एकता मोर्चा हे पेज पुन्हा रिस्टोर करण्यात आले.आता हे पेज सुरू आहे.आणि यावरून आंदोलक शेतकरी live व्हिडिओच्या माध्यमातून आपले प्रश्न मांडत आहेत.ज्ञात असावं की शेतकऱ्यांनी देशातील कोणत्याही प्रसारमाध्यमांना त्यांचे आंदोलन कव्हर करण्यास मनाई केली आहे.देशातील मिडिया विकली गेलेली आहे. असे शेतकऱ्यांचे मत आहे.त्यामुळे त्यांनी स्वत:चा मिडिया उभारला आहे.आपल्या आंदोलनाच्या अपडेट्स ते स्वत: फेसबुकच्या याच किसान एकता मोर्चा पेजवरून देत आहेत.
फेसबुक आणि ट्विटररच्या माध्यमातून नेटीझन्स आपला रोष व्यक्त करत आहेत
यात आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडली की या पेजला सुरुवातीला 2 हजारच्या जवळपासच लाईक फॉलोअर्स होते,
कारण बहुतांश लोकाना त्याबद्दल माहिती नसावी.जेव्हा फेसबुकने पेज बंद केल्याचे समजले तेव्हा ट्विटरवरून माहिती दिली गेली. मात्र देशभरातून आता या पेजला लाईक फॉलोअर्स मिळू लागले आहेत, या पेजची लिंक साठी इथे क्लिक करा
फेसबुक आणि ट्विटररच्या माध्यमातून नेटीझन्स आपला रोष व्यक्त करत आहेत. काही लोक फेसबुकवर पोस्ट लिहून तर काही ट्विटरवर झुकेरबर्गच्याविरोधात ट्रेंड सुरू करुन फेसबुकचा निषेध व्यक्त करत आहेत. रविवारी रात्रीपासूनच सोशल मीडियावर फेसबुक आणि झुकेरबर्गविरुद्ध रोष पाहायला मिळाला. #ShameOnFacebook #ZuckerbergShameOnYou हे दोन हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेंड करत आहेत.
हेही वाचा.. एमएसपी वा किमान आधारभूत मूल्य
हेही वाचा.. ऊसतोड कामगार :प्रश्न की व्यथा ?