गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या गाजीपूर सीमेवर देशातील शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत,परंतु 26 जानेवारीच्या निमित्ताने राजधानीत झालेल्या आंदोलनाने शेतकरी चळवळ कमजोर होत असल्याचे दिसू लागले.दुसरीकडे सरकारने मोठ्याप्रमाणार गाझीपूर बोर्डवर पोलिस आणि सैन्यदल तैनात केले गेले.राकेश टिकैत यांनी एका रात्रीत वातावरण बदललं.पश्चिम उत्तर प्रदेश, हरयाणाच्या अनेक गावांतील हजारो शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन गाझीपूर सीमा गाठली.
जवळपास शेतकरी आंदोलन संपल्यात जमा होतं
दिल्लीसह उत्तर प्रदेश पोलिसांच्या वेगवान हालचाली सुरू झाल्याचे दिसू लागले.बोर्डरवरील शेतकऱ्यांना कोणत्याही क्षणी कारवाई करत उचलले जाईल अशी आशंका देशभरातील नागरिकांच्या मनात दाटून आलेली.जवळपास शेतकरी आंदोलन संपल्यात जमा होतं.हिंसाचाराचा निषेध करत शेतकरी आंदोलनातून दोन शेतकरी संघटनांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.त्यामुळे शेतकरी आंदोलन संपणार अशी चिन्हं दिसू लागली.
प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनाची धार काहीशी कमी होताना दिसत होती.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांना हटवून सीमा मोकळ्या करण्याचे आदेश दिले.सीमेवर पोलिसांनी मोठ्या फौजफाट्यासह तंबू, शौचालयं हटवण्याचं काम सुरू केलं.
काही तासातच चित्र बदलले
भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आंदोलन संपवत असल्याचे संकेत दिले.त्यामुळे आंदोलन संपणार अशी शक्यता वर्तवली जात होती.आणि काही तासातच चित्र बदलले.राकेश टिकैत यांना रात्री उशिरा पर्यन्त समजावण्याचे प्रयत्न झाले,मात्र आपण आंदोलनस्थळ सोडत नसल्याचे जाहीर करत त्यांनी शेवटचा पत्ता ओपन केला.
जर हे शेतकरी विरोधी तीन कायदे मागे घेतले नाहीत तर मी आत्महत्या करेन.असा इशाराच त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला.माध्यमांशी संवाद साधतान राकेश टिकैत यांना अश्रू अनावर झाले.शेतकऱ्यांसोबत विश्वास घात झाला असं म्हणत त्यांनी आंदोलन संपणार नसल्याची घोषणा केली आणि वाऱ्याच्या वेगाने हे वृत्त देशभरात पसरलं त्याचा अपेक्षित परिणाम झाला अन एका रात्रीत वातावरण बदललं.
काही तासांत गाझीपूर सीमेवरील वातावरण पूर्णपणे बदललं
पश्चिम उत्तर प्रदेश, हरयाणाच्या अनेक गावांतील हजारो शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन गाझीपूर सीमा गाठली.सीमेवरील परिस्थिती बदलताच पोलिसांचा पवित्रादेखील बदलला. त्यांना कारवाईला स्थगिती दिली. याशिवाय खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा पूर्ववत केला गेला.सध्याच्या घडीला राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरी आंदोलनस्थळी पोहोचले आहेत. काही तासांत गाझीपूर सीमेवरील वातावरण पूर्णपणे बदललं आहे.
शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याबद्दल सोशल मिडियात जोरदार चर्चा सुरू आहे.त्यांचे फोटो वायरल होत आहेत.
महेंद्रसिंग टिकैत हे देशातील सर्वात मोठे शेतकरी नेते
या आंदोलनाचे वैशिष्ट्य हे आहे की शहरातील मध्यमवर्ग निम्नमध्यमवर्ग गरीब वर्ग सुद्धा शेतकऱ्यांच्या आंदोलनात जोडला जातो आहे.
लोक हळूहळू समर्थनात उतरायला लागले आहेत.
विशेष म्हणजे 26 जानेवारीच्या हिंसाचारानंतर सामान्य वर्गातून शेतकऱ्याना मोठ्याप्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे.
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात तरुण वर्ग बहुसंख्येने दिसतो आहे.
रातोरात वातावरण बदलणारे शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याबद्दल जाणून घेण्याची सर्वांची इच्छा आहे.
त्यांच्याबद्दल देशभरात चर्चा सुरू झाली आहे.तर जाणून घेऊया राकेश टिकैत यांच्याबद्दल –
माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्यानंतर महेंद्रसिंग टिकैत हे देशातील सर्वात मोठे शेतकरी नेते होते.महेंद्रसिंग टिकैत च्या एका आवाजावर, दिल्लीत लखनौपर्यंत सत्ता हलविण्याची ताकद बाळगून होते.महेंद्रसिंग टिकैत यांनी केंद्र व राज्यातील सरकारांना त्यांच्या मागण्यांसमोर एकदा नाहीतर अनेकदा झुकण्यास भाग पाडले.महेंद्रसिंग टिकैत हे दीर्घ काळ भारतीय शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.राकेश टिकैत हे महेंद्रसिंग टिकैत यांचे दुसऱ्या क्रमांकाचे सुपुत्र.
उच्चशिक्षित आणि पोलिस दलात कार्यरत –
राकेशसिंग टिकैत यांचा जन्म 4 June जून 1969 रोजी मुझफ्फरनगर जिल्ह्यातील सिसौली गावात झाला.त्यांनी मेरठ विद्यापीठातून एमए केले.त्यानंतर एलएलबी म्हणजे कायद्याची परीक्षा पास केली.1985 मध्ये राकेश टिकैत यांचे बागपत जिल्ह्यातील दादरी गावच्या सुनीता देवीशी लग्न झाले.त्याच वर्षी त्यांना पोलिस दलात नोकरी लागली.त्याना एक मुलगा चरण सिंह आणि दोन मुली सीमा आणि ज्योती असा परिवार आहे.त्यांची सर्व मुले विवाहित आहेत.पोलिस दलात त्यांना बढती मिळून ते सबइन्स्पेक्टर बनले.
90 च्या दशकात असेच एक शेतकरी आंदोलन लाल किल्यावर झाले होते.त्याचे नेतृत्व महेंद्रसिंग टिकैत करत होते. आणि त्याचवेळी राकेश टिकैत यांच्यावर सरकारकडून हे आंदोलन समाप्त करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता,त्यावेळी राकेश टिकैत यांनी पोलिस दलाच्या सरकारी नोकरीचा राजीनामा देत शेतकऱ्यांच्यासमर्थनात उभे राहणे पसंत केले.नोकरी सोडून ते आंदोलनात सहभागी झाले.
महेंद्रसिंग टिकैत यांचे राजकीय वारस बनले नरेश टिकैत
सरकारी नोकरी सोडून राकेश टिकैत यांनी शेतकरी संघटनेत काम करणे सुरू केले.
पुढे पिता महेंद्रसिंग टिकैत यांच्या मृत्यू पश्चात त्यांचे मोठे भाऊ नरेश टिकैत यांना
भारतीय किसान यूनियनचे अध्यक्षपद सोपवण्यात आले.
राकेश टिकैत राष्ट्रीय प्रवक्तापद सांभाळत राहिले.तथापि,संघटनेचे सर्व नियम राकेश टिकैत हेच घेतात,
संघटनेवर त्यांचीच कमांड आहे.शेतकरी संघटना आणि आंदोलनाची दिशा देण्याचे काम राकेश टिकैत हेच आजही करतात.
सक्रिय राजकारण दोनदा नशिब आजमवले
2007 मध्ये पहिल्यांदा त्यांनी मुझफ्फरनगरमधील खतौली विधानसभा मतदारसंघातून
अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती,पण तेव्हा ते विजयी होऊ शकले नाहीत.
दुसऱ्यांदा 2014 मध्ये अमरोहा जिल्ह्यातून राष्ट्रीय लोकदल पक्षाकडून लोकसभा निवडणूकही लढवली होती,
परंतु इथेही त्यांना यशाने हुलकावणी दिली.
44 वेळ तुरुंगात गेलेत टिकैत
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करताना राकेश टिकैत यांना 44 वेळा तुरुंगात जावं लागलं आहे.
एकदा मध्य प्रदेशात भूमी संपादन कायद्याच्या विरोधात 39 दिवस तुरूंगात रहावे लागले आहे.
दिल्ली 26 जानेवारी दरम्यान झालेल्या हिंसाचारात गुन्हा दाखल
किसान ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांनी राकेश टिकैत यांच्याविरोधात
एफआयआरही दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनी हिंसाचाराच्या कलम 395 ((दरोडा), 397 (जबरी चोरी किंवा दरोडा,
मारण्याचा किंवा जखमी करण्याचा प्रयत्न), १२० बी (गुन्हेगारी कारस्थान)
आणि अन्य कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
टीम जागल्या भारत
फॅक्टचेक: शाहीन बाग दादी; कंगणा राणावत च्या फेक ट्विट ला नोटिस
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)