22-01-2024 तारखेला अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन झालं. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या कार्यक्रमाशी संबंधित अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत. दरम्यान, एक फोटो शेअर केला जात आहे. ज्यामध्ये दुबईच्या बुर्ज खलिफा वर भगवान राम यांची प्रतिमा झळकली असल्याचे दाखवले जात होते. बुर्ज खलिफावर भगवान राम यांची प्रतिमा झळकली असल्याचे बोलले जात आहे.
एका यूजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर फोटो शेअर केला आणि लिहिले,
दुबईच्या बुर्ज खलिफा वरही जय श्री राम लिहिले आहे, तरुणांनो, जय श्री राम कधी म्हणणार? जय श्री राम.”
दुसऱ्या युजरने हा व्हायरल फोटो शेअर करत लिहिले की, “सनातनींनो, बुर्ज खलिफा दुबईतून जगाला दिलेली जय श्री रामची घोषणा स्वीकारा.”
दोन दशलक्षाहून अधिक व्ह्यूज
हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्याला दोन दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तसेच यावरून सोशल मिडियात वाद विवाद देखील सुरू झाले आहेत.
त्याचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही बुर्ज खलिफा शी संबंधित अधिकृत सोशल मीडिया हँडल शोधले.
असा कोणताही फोटो आम्हाला इथे सापडला नाही. याशिवाय,आम्हाला याची खात्री करणारा असा कोणताही प्रामाणिक रिपोर्ट सापडला नाही.
मग आम्ही व्हायरल इमेजचा गुगल रिव्हर्स सर्च केला. येथे आम्हाला मूळ फोटो सापडला ज्यावर प्रभू रामाचे चित्र संपादित करून पेस्ट केले होते. मूळ फोटो ‘जुलिया अल्बम‘ नावाच्या फूड ब्लॉग वेबसाइटवर सापडला होता, जो 2019 मध्ये अपलोड करण्यात आला होता.
याशिवाय, ‘X’ वर आम्हाला ‘एथिस्ट कृष्णा’ नावाच्या वापरकर्त्याचे हँडल देखील सापडले, ज्याने कदाचित काल हा फोटो ट्विट केला होता. याआधीही त्याने अनेकदा असे फोटो एडिट केले आहेत.
VERIFICATION AND METHODOLOGY
हे चित्र बुर्ज खलिफाच्या खात्यावर नाही
मात्र, गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च करताना, बुर्ज खलिफा देखील त्याच प्रकाशात दिसतो, परंतु त्यावर भगवान श्रीरामाचे कोणतेही छायाचित्र आढळून आले नाही. जेव्हा जेव्हा बुर्ज खलिफा वर एखादा प्रसंग साजरा केला जातो तेव्हा त्यांच्या अधिकृत फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर केले जातात, पण यावेळी त्यांनीही सोशल मीडिया हँडलवर अशी कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही.
निष्कर्ष
एकंदरीत, 22 जानेवारी रोजी दुबईच्या बुर्ज खलिफावर प्रभू रामाचे चित्र प्रदर्शित झाल्याची बातमी दिशाभूल करणारी आहे.
एडिट केलेले फोटो शेअर करून संभ्रम पसरवला जात आहे.
Fact-Check व्लादिमीर पुतिन खरंच बौद्ध भिक्षू बनले? वायरल फोटो मागील सत्य जाणून घ्या
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 23,2024 | 21:28 PM
WebTitle – factcheck On 22nd, the image of Lord Ram was seen on Burj Khalifa? Know the truth