भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याचे बौद्ध भिक्खू च्या पेहरावात असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत असून तो चर्चेचा विषय ठरला आहे. त्याच्या या नव्या लुकमागे अनेक तर्क लावले जात आहेत.( Mahendra Singh Dhoni new look reason reveal)
अनेकांनी असा प्रश्न विचारला की महेंद्रसिंग धोनी आता बौद्ध भिक्खू बनला आहे का?
फेसबुक ट्विटरवर अनेकांना हा फोटो भावला.काहींना त्याबद्दल खरंच वाटलं की महेंद्रसिंग धोनी याने बौद्ध धम्म स्वीकारला आहे.
व्हाट्सेपवरही अशाप्रकारच्या अनेक पोस्ट वायरल होऊ लागल्या..
दावा –
महेंद्रसिंग धोनी याने बौद्ध धम्म स्वीकारला असा दावा काही नेटकऱ्यांनी केला आहे.
सत्य –
महेंद्रसिंग धोनी याने बौद्ध धम्म स्वीकारला हा दावा असत्य आणि चुकीचा आहे.
VERIFICATION AND METHODOLOGY
आमच्या टीमने याबाबत स्टार स्पोर्ट (star sports ) च्या मुख्य स्त्रोत ची पडताळणी केली असता असे लक्षात आले की महेंद्रसिंग धोनी याने बौद्ध भिक्खूच्या पेहरावात जारी केलेले फोटो हा VIVO IPL 2021 या सीझनच्या प्रमोशनसाठीच्या जाहिरातीचा एक भाग आहे.नंतर प्रकाशित झालेल्या व्हीडिओतून ते स्पष्ट झालं.
पहिल्या व्हीडिओत महेंद्रसिंग धोनी हा या पेहरावाबाबत लवकरच माहिती मिळेल असे म्हणताना दिसतो.
आणि दुसऱ्या व्हीडिओत तो याबद्दल खुलासा करताना दिसतो.
आयपीएलचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स वाहिनीनं या जाहीराती तयार केल्या आहेत. यात धोनी जंगलामध्ये मुलांसोबत दिसत आहे आणि बौद्ध भिक्खूच्या रुपात दिसत आहे.तो मुलांना म्हणतो आजचा आपला विषय आहे “लालच” या जाहीरातींमध्ये तो रोहित शर्माला ( Rohit Sharma) ट्रॉफीसाठी लालची म्हणत आहे, रोहित शर्मा पाचवेळा जिंकला आहे मात्र त्याची जिंकण्याची ‘हाव’ आणखी वाढली आहे.आणि हेच जिंकण्याचे लालच आजच्या जगात “कुल” आहे. असं महेंद्रसिंग धोनी म्हणताना दिसत आहे.
इथं आणखी एक गोष्ट अशी नमूद करावीशी वाटते की बौद्ध धम्मात तृष्णा या घटकास अनन्य साधारण महत्व आहे.तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी जगभरातील मानव जातीला सम्यक मार्गाची शिकवण दिली त्यामध्ये त्यांनी दु:खाचे कारण तृष्णा आहे असे प्रतिपादन केले आहे.तृष्णेवरच विजय मिळवला पाहिजे असेही ते म्हणतात.अष्टांगिक मार्ग हा भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला सम्यक मार्ग आहे.काम, क्रोध, द्वेष, इ. दोष दूर करून जीवन निर्मळ करण्याचा सदाचाराचा मार्ग आहे.यांस मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात.
‘अजून हवं’ ही लालसा न सुटणे, त्यासाठी जिवाच्या आकांताने कर्म करीत राहणे हे वर्ज्य असले पाहिजे असे भगवान बुद्ध म्हणतात.मात्र जाहिराती मध्ये “लालच” म्हणजेच तृष्णेला वेगळ्या पद्धतीने सादर करून लालच हाच जगण्याचा नवा मंत्रा असल्याचे महेंद्रसिंग धोनी म्हणताना दिसतो.
हे एवढेच नाही,दुसऱ्या जाहिरातीत महेंद्रसिंग धोनी राग सुद्धा महत्वाचा आहे.असे म्हणतो, दुसऱ्या जाहिरातीत तो विराट कोहलीला ( Virat Kohli) रागीट म्हणत आहे.”क्रोध में खोकर अगर कोई जीत को पा ले तो क्रोध बुरा नहीं” असे म्हणताना दिसत आहे.
तथागत भगवान बुद्धानी राग,क्रोध यावर आपल्या शिकवणीतून मांडले आहे.राग,क्रोध हा अग्नीप्रमाणे आहे.राग,क्रोध हा विषाप्रमाणे असतो,राग,क्रोध म्हणजे आपण स्वत: विष पीणे आणि दुसऱ्याच्या मृत्यूची मनीषा बाळगणे.
यावरून असे दिसते की VIVO IPL 2021 स्टार स्पोर्ट्स ने यावेळी आपल्या जाहिरातींमध्ये सगळीकडे भगवान बुद्धांच्या शिकवणूकीचे संदर्भ वापरले आहेत,मात्र ते वेगळ्याच परिप्रेक्षात (context) वापरल्याने त्याचे अर्थ बदलून गेले आहेत,खरतर ही एक प्रकारची विटंबना,विचारांची मोडतोड आहे.हे यातून स्पष्ट होतं.
आता हे सगळं वाचून तुम्हाला संताप येईल परंतु तसं काही करू नका.
थांबा,तुम्ही अगोदर हे सगळं डोक्यावर घेतलं,माहिती घेतली नाही.
शीघ्र प्रतिक्रियावादी झालात,सारासार विचार केला नाही.
आणि भावनेच्या आहारी जाऊन भगवान बुद्धांच्या शिकवणूकीचीच विटंबना डोक्यावर घेतलीत.
आता आम्ही हे उजेडात आणल्याने या जाहिरातींवर विरोध करण्याची शक्यता आहे. तर तसं करू नका.
त्यामुळे काय होईल जाहिराती आणखी अनेक लोक पाहतील ज्याना माहीत नाही.
आणि क्रिकेट फिवर आपल्याकडे कसा आहे आपल्याला माहीतच आहे.
त्यामुळे या गोष्टी त्यांच्याच पथ्यावर पडतील त्यामुळे आता जे गेलं ते गेलं असं समजून गप्प राहणे हाच मध्यममार्ग आहे.
यापुढे सोशल मिडियात अशा गोष्टी येतील तेव्हा मात्र पुन्हा तशी चूक करू नका.
थोडा वेळ घ्या.गोष्टी समजून घ्या.माहिती मिळत नसल्यास जागल्या भारतकडे संपर्क करा,आम्ही त्याबद्दल शोध घेऊ.
माहिती घेण्याचा प्रयत्न करू.लगेच प्रतिक्रियावादी होणे टाळूया.भावनिक होणे टाळूया.
-
टीम जागल्या भारत
हे ही वाचा.. फॅक्ट चेक: पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील 5 जणांची हत्या,बातमी मागील सत्य
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on March 15 , 2021, 15 :33 PM
WebTitle – fact check netizens claim m s dhoni converted to Buddhism after photo in monk attire goes viral