संपूर्ण विश्वाला शांती आणि विज्ञानवादी विचार देणाऱ्या तथागत भगवान बुद्ध यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेक देश बुद्धाचा विज्ञानवादी धम्म स्वीकारतात.तसेच अनेक प्रसिद्ध व्यक्तीही बुद्धाचा धम्म स्वीकारतात.भारतातील आणि जगातील देखील अनेक सेलिब्रेटींनी बौद्ध धम्म स्विकारल्याचे आपल्याला माहित आहे.अलिकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना बौद्ध भिक्खूच्या पोशाखात दाखवणाऱ्या दोन प्रतिमांचा एक संच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात पुतिन यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे.असा दावा केला जात आहे.
तथागत भगवान बुद्धांचा धम्म कुणीही व्यक्ती जात,धर्म,पंथ वंश,लिंग इत्यादी अडसर न येता स्वीकारू शकतो,सर्वांना बुद्ध धम्मात समान स्थान व नियम आहेत.याशिवाय कोणतीही अंधश्रद्धा कर्मकांड नाही.त्यामुळे लोकांना हा धम्म साधा सरळ अन आचरण करण्यास सोपा वाटतो.जगातील अनेक महत्वाच्या व्यक्तींनी बौद्ध धम्म स्वीकारला आहे.ही भारतीय नागरिकांसाठी आणि विशेषत: बौद्ध धम्मीय नागरिकांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.
मात्र,काही वेळेस भावनिक विचार वरचढ ठरले आणि आपण धम्माचेच नियम तर्कदृष्टी विसरलो की आपली फसगत होते.अशीच फसगत व्लादिमीर पुतिन यांच्या फोटोमुळे अनेकांची झाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना बौद्ध भिक्खूच्या पोशाखात दाखवणाऱ्या दोन प्रतिमांचा एक संच सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात पुतिन यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे.असा दावा केला गेला आहे.यामुळे काही लोकांनी ही माहिती पडताळून न पाहताच डोळे झाकून विश्वास ठेवला.
खरंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना बौद्ध भिक्खूच्या पोशाखात दाखवणाऱ्या दोन प्रतिमांचा संच हा AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंटस् चा वापर करून तयार करण्यात आल्या आहेत.या दोन्ही प्रतिमा एवढ्या अस्सल आणि प्रामाणिक वाटतात की कोणत्याही सामान्य व्यक्तीला त्या खऱ्याच आहेत असा विश्वास बसू शकतो.
आम्हाला सत्य कसे कळले?
VERIFICATION AND METHODOLOGY
आम्ही व्हायरल फोटोज रिव्हर्स इमेज तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शोध घेतला आणि 18 मार्चची एक फेसबुक पोस्ट समोर आली.
ही पोस्ट ‘AI CREATIVES THAILAND’ नावाच्या ग्रुपवर आढळली.
पोस्टमध्ये चार प्रतिमा होत्या ज्यात पुतिनचे दोन व्हायरल फोटो आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्या दोन प्रतिमांचा समावेश होता,
जिथे ते दोघेही बौद्ध भिक्खू म्हणून चिवर परिधान केलेले असल्याचे दिसून येत होते.
मात्र,पोस्टकर्त्याने पोस्टमध्येच स्पष्ट लिहिले होते की या प्रतिमा वास्तविक नाहीत आणि मिडजर्नी या एआय टूलद्वारे त्या तयार केल्या गेल्या आहेत.
या प्रतिमा पोस्ट करणार्या युजर ने स्वतःची ओळख डिजिटल निर्माता म्हणून सांगितली आहे.
त्याने त्याच्या पेजवर अशा अनेक एआय-जनरेट केलेल्या प्रतिमा शेअर केल्या आहेत.
त्याने या इमेज मिडजर्नी या AI टुलच्या सहाय्याने तयार केल्या आहेत.
या फेसबुक ग्रुपवर या इमेजस आपण पाहू शकतो.
मिडजर्नी म्हणजे काय?
मिडजर्नी हे AI-टुलद्वारे चालणारे एक साधन आहे जे युजर्स/वापरकर्त्यांनी दिलेल्या प्रॉम्प्ट्सच्या कमांड वर वास्तववादी प्रतिमा तयार करू शकते.
निष्कर्ष:
स्पष्टपणे, व्लादिमीर पुतिन यांचा भिक्षूच्या पोशाखात व्हायरल झालेला फोटो AI-व्युत्पन्न आहे आणि तो खरा फोटो म्हणून शेअर केला जात आहे.मात्र हा फोटो खरा नाही,फेक आहे .असे फोटो शेअर करताना दहादा विचार केला पाहिजे,येत्या काळात AI तंत्रज्ञानाचे आव्हान मोठं असणार आहे.त्यामुळे काळजी घ्या.
फॅक्टचेक: धोनी बौद्ध भिक्खू बनला? कारण जाणून घ्या..
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 21,2023 | 21:32 PM
WebTitle – Fact-Check Did Vladimir Putin Really Become a Buddhist Monk?