उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत भाजपची रणनीती या निवडणुकीत जास्तीत जास्त दलित मते सोबत आणण्याची आहे. याबाबत पक्षाच्या हायकमांडकडून कार्यकर्त्यांना दलितांसोबत जोडण्याचे बोलले जात आहे. यूपी भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दलितांच्या घरी जाण्याचा आणि त्यांच्याशी जवळीक साधण्याचा व दलितांसोबत चहा प्या,जेवा मग मत मागा असा सल्ला दिला आहे.
रविवारी स्वतंत्र देव सिंह यांनी इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि तथाकथित उच्च जातीच्या समुदायातील
पक्षाच्या कार्यकर्त्यांना दलितांसोबत चहा आणि जेवण करण्याचा सल्ला दिला
तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर पक्षाला मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याबद्दल सांगितले.
स्वतंत्र देव सिंह यांनी ओबीसी सामाजिक प्रतिनिधी संमेलन आणि वैश्य व्यापारी संमेलनात ही माहिती दिली.
त्याचवेळी, दुसऱ्या एका कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्षांनी लोकांना संबोधित करताना सांगितले की,
त्यांनी त्यांच्या शेजारच्या आणि गावातील 10 ते 100 दलित कुटुंबांसोबत चहा प्यावा
आणि त्यांना समजावून सांगा की, मते जातीच्या नावावर नाहीत. प्रदेश आणि पैसा पण राष्ट्रवादामुळे. नाव सांगा.”
तुम्हाला निघून जाण्यास सांगितले जात असेल तर तिथे चहा घेण्याचा प्रयत्न करा
तत्पूर्वी पक्षाच्या ओबीसी मोर्चाने आयोजित केलेल्या सामाजिक प्रतिनिधी परिषदेत सिंह म्हणाले,
“मी तुम्हाला आवाहन करत आहे की, तुम्ही जर तुमच्या समुदायांमध्ये गेलात,
तर दलित, अत्याचारित आणि वंचित कुटुंबातील कमीत कमी एक हजाराहून अधिक घरांमध्ये एकदा तरी जा.
आणि त्यांच्याकडे चहा जरूर प्या. जर तुम्हाला तिथे चहा दिला जात असेल तर याचा अर्थ त्यांच्यामध्ये तुमची प्रतिमा चांगली आहे.”
ते म्हणाले की, चहासोबत जेवण विचारले तरी ते कुटुंब भाजपशी संबंधित असल्याचे स्पष्ट होते.जर तुम्ही एखाद्या घरी 10 दिवस गेलात आणि तुम्हाला चहा मागितला नाही आणि तुम्हाला निघून जाण्यास सांगितले जात असेल तर तिथे चहा घेण्याचा प्रयत्न करा.हजार वेळा जावे लागले तरी जा. तुमच्या भेटीमुळे पक्ष मजबूत होईल आणि तुम्हीही मोठे नेते बनाल.” दलितांच्या घरी जाण्याचा आणि त्यांच्याशी जवळीक साधण्याचा व दलितांसोबत चहा प्या,जेवा मग मत मागा असा सल्ला यूपी भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला आहे.
मध्यंतरी दलित मुले कोपऱ्यात वेगळे बसून जेवतानाचा युपीतील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता
एका प्राथमिक शाळेतील दलित विद्यार्थी मध्यान्ह भोजन इतर विद्यार्थ्यांसोबत न बसता वेगळे कोपऱ्यात बसून खातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने चौकशीचे आदेश दिले होते.या भेदभावाच्या मुद्यावर उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनीही या जातीयवादक आणि भेदभावजनक कृत्याचा निषेध करत कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.मात्र दुसरीकडे निवडणुका आल्या की राजकीय नेते दलित लोकांच्या घरी चहा पिण्याची सहल आयोजित करतात हे सगळं फारच किळसवाणे आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रकृतीबद्दल रुग्णालयाने दिली लेटेस्ट अपडेट
गया मध्ये नक्षलवाद्यांचे तांडव, एकाच कुटुंबातील चार जणांना फाशी
डॉ.कफील खान यांना क्लीनचिट मिळूनही सरकारी सेवेतून केले बडतर्फ
“जय भीम” फिल्म पाहिल्यानंतर अभिनेत्याने “पार्वती” साठी घर देण्याचे ठरवले
जय भीम चित्रपट:पोलिसांनी बॅग भरून लाच देण्याचा प्रयत्न केला न्या.चंद्रू
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 15, 2021 10:45 AM
WebTitle – Drink tea with Dalits, eat and then ask for votes – UP BJP chief Swatantra Dev Singh has advised his workers