यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर :प्रज्ञासूर्याचा पुत्रएकदा वडिलांनी त्यांच्या तरुणपणीच एक अनुभव मला सांगितला होता. एकदा काही कामानिमित्त वडील भोईवाडा कोर्टात गेले होते. एका काउंटरवर मोठी रांग लागलेली. वडील त्या रांगेत उभे होते. काही वेळाने एक प्रकृतीने कृष असलेली एक व्यक्ती येऊन रांगेत शेवटी उभी राहिली. त्या व्यक्तीच्या हातात काही तरी कागद पत्रे होती. ऊन भरपूर होते. उन्हापासून बचाव करण्यासाठी त्या व्यक्तीने हातातल्या कागदपत्राने डोक्यावर आडोसा केला होता. वडिलांची त्या व्यक्तीकडे नजर गेली.
आपण सुद्धा शिस्त, नियम पाळले पाहिजेत.
वडिलांना क्षणभर डोळ्यावर विश्वास बसेना. वडिल रांग सोडून त्या व्यक्तीकडे गेले आणि जयभीम करून म्हणाले “भैय्यासाहेब माझा नंबर आता लवकरच येईल तुम्ही माझ्या जागेवर उभे राहा मी ईथे थांबतो.” यावर ती व्यक्ती सुद्धा जयभीम करून म्हणाली “नको, सगळेच शिस्तीत रांगेत उभे आहेत. आपण सुद्धा शिस्त, नियम पाळले पाहिजेत.” ती व्यक्ती होती घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र भैय्यासाहेब अर्थात यशवंतराव भीमराव आंबेडकर. त्यांचा हा संवाद आसपास उभ्या असणाऱ्या लोकांनी ऐकला. रांगेत उभा राहणारी ही व्यक्ती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा आहे हे समजल्यवर अनेकांनी त्यांना रांगेत उभे न राहता थेट पुढे जाण्याची विनंती केली पण भैय्यासाहेबांनी ती विनंती अमान्य केली आणि रांगेतच उभे राहिले. त्यांनी नियमभंग केला नाही. स्वतःच्या बापाच्या कर्तृत्वाचा गैरफायदा घेतला नाही.
भैय्यासाहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला
आज लोक नेत्यांशी जवळकिचा लाभ घेऊन सर्रास नियमभंग करत असतात
पण भैय्यासाहेबांनी मात्र घटनाकाराचा मुलगा म्हणून गैरफायदा घेतला नाही.
ते अखेरपर्यंत सामान्य माणसासारखे जगले. काँग्रेस सोबत युती करून त्यांना पदरात बरचं काही पाडता आलं असत.
अनेक दिग्गज आरपीआय नेते काँग्रेससोबत तडजोड करत असताना भैय्यासाहेब त्या वाटेला गेले नाहीत.
आरपीआय नेते काँग्रेससोबत तडजोड करून पदरात मान मरातब , पद, प्रतिष्ठा पाडून घेत असताना
भैय्यासाहेबांनी मात्र आंबेडकरवादी जनतेला सोबत घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे चैत्यभूमी स्मारक निर्माण केले.
आज हे स्मारक देशातली कोट्यवधी लोकांची उर्जाभूमी बनले आहे.
दलित पँथरच्या युवकांना भैय्यासाहेब म्हणजे मोठा आधारस्तंभ होता. पॅंथरचे युवक अनेकदा भैय्यासाहेबांचे मार्गदर्शन घेत असत.
आंबेडकर हे नाव बदनाम झाल्याशिवाय आपलं राजकारण यशस्वी होणार नाही
या विचारातून अनेकांनी भैय्यासाहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला.
पक्षपातीपणाचा आरोप होऊ नये म्हणून बाबासाहेब स्वतःच्या या प्रिय मुलाशी काही वेळेस कठोरपणे वागले
पण तरीही बाबासाहेबांचे आपल्या या मुलावर निस्सीम प्रेम आणि विश्वास होता.
त्या प्रेमाची आणि विश्वासाची तुलना केवळ शिवाजी महाराज व संभाजी महाराज या पिता-पुत्रातील प्रेमाशी केली जाऊ शकते.
त्यांचे धार्मिक कार्य :
‘मी सारा भारत बौद्धमय करीन’ हा बाबासाहेबांचा संकल्प उराशी घेऊन भैय्यासाहेबांनी काम सुरु केले. त्यांनी अनेक ठिकाणी धम्मदीक्षेचे कार्यक्रम घेतले, धम्म परिषदा भरविल्या, धम्म मेळावे सर्वत्र होत होते.
भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी श्रीलंका, थायलंड, म्यानमार, सारनाथ व दिल्ली येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदांमध्ये भारतीय बौद्धांच्या समस्या मांडल्या.
खेड्यापाड्यातील बौद्ध विहारांचे उद्घाटन केले. १९६८ साली मुंबई येथे धम्म परिषद भरविण्यात आली व प्रमुख पाहुणे म्हणून १४ वे दलाई लामा यांना बोलविण्यात आले.
● ह्या धम्म परिषदेमध्ये अनेक महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. त्यात संस्कार विषयक आचार संहिता सर्वानुमते मान्य करण्यात आली.
बौद्ध जीवन संस्कार पाठ या नावाचे पुस्तक तयार करण्यात आले. धम्म प्रसार कार्याचा एक भाग म्हणून १९६७ मध्ये ११व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी भैय्यासाहेबांनी स्वतः श्रामणेरची दीक्षा घेतली व त्या कालावधीत ते चैत्यभूमीतच राहत होते.
● त्यांचे नाव ‘महापंडित काश्यप’ असे ठेवण्यात आले होते. १९५९ मध्ये ब्रिटिश भिक्खू महास्थविर संघरक्षित लंडनहून आले असता त्यांनी भैय्यासाहेबांची भेट घेतली होती.राजकीय काराकीर्द :
१९६२ ते ६८ दरम्यान महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य (आमदार) असताना भैय्यासाहेबांनी विधानपरिषदेत बौद्धांच्या हक्कांबद्दल हिरीरीने बाजू मांडली तसेच या नवीन बौद्धांच्या सवलतीविषयी ते तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाईंनाही भेटले होते.बाबासाहेबांच्या सानिध्यात राहून कार्य :
● १९४४ पासून बाबासाहेबांच्या जनता, प्रबुद्ध भारत या मुखपत्रांचे व्यवस्थापन तेच पाहत होते.
बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमध्ये बाबासाहेबांचा थॉट्स ऑन पाकिस्तान हा इंग्रजी ग्रंथ भैय्यासाहेबांनी छापला होता.
बाबासाहेबांनी हा ग्रंथ भैय्यासाहेब व मुकुंदराव यांना अर्पण केलेला आहे. बाबासाहेबांचे फेडरेशन वर्सेस फ्रिडम आणि थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स हे ग्रंथही भैय्यासाहेबांनी छापले.
त्यानंतर बाबासाहेबांच्या सांगण्यावरून आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांनी
वा.गो. आपटे लिखित बौद्धपर्व हा ग्रंथही आपल्या छापखान्यात छापून प्रसिद्ध केला.आणखी काही वाचण्याजोगे भैय्यासाहेबांचे कार्य :
भैय्यासाहेबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ अनेक स्मारके उभारली.
पहिले स्मारक त्यांनी मुंबई येथे उभारले. या डॉ. आंबेडकर सभागृहाचे भूमिपूजन २ एप्रिल १९५८ रोजी भुमीपूजन व २२ जून १९५८ रोजी उद्घाटन झाले.
● मुंबई नागरिकांच्या वतीने कफ परेड येथे बाबासाहेबांचा पुतळा बसविण्याचे ठरले.
भैय्यासाहेबांनी आग्रह धरला की २६ जानेवारी १९६२ रोजीच पुतळ्याचे अनावरण झाले पाहिजे.
● म्हणून शेवटच्या क्षणी कमी पडत असलेली रक्कम महापौरांना दिली व ठरल्याप्रमाणे २६ जानेवारी १९६२ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल प्रकाश यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले.
आज भैय्यासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. प्रज्ञासूर्याच्या या थोर पुत्रास विनम्र अभिवादन!
अवतार सिंह पाश…. सबसे ख़तरनाक होता हैं अपने सपनो का मर जाना..
महाश्वेता देवी, शोषित-उत्पीडित वंचिताच्या वेदनेचा आवाज
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)