न्यूयॉर्क : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जगभरात पुतळे आहेत.जगभरात त्यांचे विचार वाचले, अभ्यासले आणि आचरणात आणले जातात. त्यातून चळवळ निर्माण होत असते,ही प्रक्रिया निरंतर चालत आहे.आपल्या देशात मात्र चित्रं वेगळं आहे.आपल्या देशातील काही विशिष्ट लोकांना आंबेडकर वाचलं ऐकलं तरी मेंदूत इजा होऊन पोटशूळ उठतो.भारतात त्यांच्या पुतळ्यांची विटंबना केली जाते,ज्या देशावर त्यांनी प्रेम केलं,उपकार केले.सर्व समाज एका सूत्रात बांधला,मात्र काही विशिष्ट लोकांना त्यांची जातीय सत्ता घालवली म्हणून मनात मेंदूत प्रचंड द्वेष आहे.आजही तो सोशल मिडियात सुद्धा दिसून येतो.एका विद्यापीठाला नाव देण्यासाठी अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागले. घरादाराची राखरांगोळी करण्यात आली,हिणवण्यात आलं.मात्र आंबेडकर हे नाव जगात गाजत आहे.गाजत राहणार नाही.अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ब्रॉडवे या रस्त्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले आहे.Dr. Babasaheb Ambedkar’s co-name to Broadway street in New York City, USA न्यूयॉर्कच्या 61 स्ट्रीट ब्रॉडवे रोडला आतापासून डॉ. बी.आर.आंबेडकर मार्ग म्हणून ओळखले जाईल.यावेळी उपस्थितांकडून जय भीम च्या घोषणाही देण्यात आल्या.

सिटी कौन्सिल मेंबर ज्युली वॉन यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं की, “न्यूयॉर्क च्या श्री गुरु रविदास मंदिराच्या सहभागाने, 61st Street and Broadway, चा नामकरण आता डॉ. बी.आर.आंबेडकर मार्ग असं करण्यात आलेलं आहे.या समारंभाला #Woodside आणि जगभरातून आमच्या शेकडो समुदाय सदस्यांनी हजेरी लावली होती“.

ज्युली वॉन यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलंय की, “डॉ. आंबेडकर हे समाजसुधारक,अर्थतज्ज्ञ होते.कोलंबिया विद्यापीठातून पदवीधर, कायदा मंत्री आणि भारताच्या संविधानाचे जनक. दलित, स्त्रिया आणि धार्मिक अल्पसंख्याकांच्या भेदभावाविरुद्ध त्यांचे जीवन आणि कार्य हे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून न्यायासाठी लढण्याचे एक प्रगल्भ उदाहरण आहे.”


“यशस्वी क्रांतीसाठी असंतोष असणे पुरेसे नाही. न्याय आणि राजकीय आणि सामाजिक अधिकारांच्या महत्त्वाची गहन
आणि पूर्ण खात्री असणे आवश्यक आहे.” -बी.आर. आंबेडकर

भगवान बुद्ध अस्थि दर्शन ,सुट्टी न दिल्याने उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी दिला राजीनामा
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा....
First Published by Team Jaaglya Bharat on 26 JUN 2023, 14:15 PM
WebTitle – Dr. Babasaheb Ambedkar’s co-name to Broadway street in New York City, USA