मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुटाट गांवचे सुपुत्र तथा मुंबईत सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिवं. कृष्णा साळुंके यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आमदार अमिन पटेल यांच्या हस्ते जे.जे. हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल व शाबू सिद्दिकी हॉस्पिटलमध्ये १०० व्हिलचेअरचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दि. म्युनिसिपल को. ऑ. बँकेचे संचालक विलास साळुंके अन् दक्षिण मुंबई युवक काँग्रेसचे सरचिटणीस विनय साळुंके यांनी दिली आहे.
दिवं. कृष्णा साळुंके यांनी शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण येथून मॅट्रीक उत्तीर्ण केल्यानंतर चिपळूण धोपटेवाडी येथे प्राथमिक शिक्षक तर, महाड तळये येथे तलाठी म्हणून कार्यभार सांभाळला. पण, त्यात ते फार काळ रमले नाहीत. ५ मार्च १९६३ रोजी ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत दाखल होऊन, १ जाने. १९९६ रोजी मिस्त्री पदावर सेवेत कार्यरत असतांना सेवानिवृत्त झाले.
सामाजिक योगदान
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत कार्यरत असतांना जे.जी.भातणकर व सी.एच. खरे यांच्या नेतृत्त्वाखाली त्यांनी म्युनिसिपल कामगार संघाचा कार्यभार सांभाळला.
१९६० साली देवगड तालुक्यातील जाहिर धम्मदिक्षा कार्यक्रमाची त्यांनी संयुक्तिक जबाबदारीही सांभाळली होती.
मुटाट ग्रामस्थ बौध्दजन मंडळाचे ते संस्थापक सदस्य असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्म शताब्दी
व महात्मा फुले स्मृती व्दितीय शताब्दी वर्षात आमदार आप्पा गोगाटे यांच्या उपस्थितीत
ऐतिहासिक महाबोधी बुध्द विहार उद्घाटन साेहळ्याचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
याव्यतिरिक्त त्यांनी अनेकांना सढळ हस्ते मदत केली असून, १९९३ च्या दंगलीत अनेकांना जीवदानही दिले आहे.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कृष्णा साळुंके यांचा प्रथम स्मृतिदिन राजरत्न बुध्द विहार पटांगण,
म्युनिसिपल ट्रान्झिट कॅंप, बी वार्ड च्या पाठीमागे, जे.जे. हॉस्पिटल गेट नं. ८ च्या समोर
येथे आयोजित केला असून, केंद्रिय सामाजिक राज्यमंत्री नाम. रामदास आठवले,
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार अमिन पटेल, मुंबई बँकेचे संचालक नितीन बनकर,
नगरसेवक जावेद जुनेजा, नगरसेविका आफ्रिन शेख, मिरा भाईंदरचे नगरसेवक अनंत शिर्के, विकासक किशोर म्हात्रे,
मुंबई काँग्रेस सचिव हेमंत दळवी, जेष्ठ गीतकार संगीतकार विष्णू शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर स्मृतिदिनाला उपस्थित राहणार आहेत.
समान नागरी कायदा (यूनिफॉर्म सिविल कोड) म्हणजे काय? जाणून घ्या
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on AUG 28, 2021 18:00 PM
WebTitle – Distribution of 100 wheelchairs on the occasion of Krishna Salunke’s first memorial day