दिल्ली, दि.08 – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या भेटीला पोहोचले आहेत. दिल्लीत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोदींच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले असून यावेळी त्यांच्यात चर्चा सुरु आहे. गेल्या एक तासापासून मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा सुरु असून यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाणदेखील उपस्थित आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी ७ वाजता मुंबईतून निघाले होते. दिल्लीत दाखल झाल्यानंतर मोदींच्या शासकीय निवासस्थानी सकाळी ११ वाजता या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साडे अकराच्या सुमारास पत्रकार परिषद घेतील असं बोललं जात होतं. मात्र एक तासाहून अधिक काळ सुरु असलेल्या या बैठकीत काय चर्चा सुरु आहे याची आता उत्सुकता लागली आहे.
मोदींसोबतच्या भेटीदरम्यान मराठा आरक्षण, तौक्ते चक्रीवादळ नुकसानभरपाई, जीएसटी भऱपाई थकबाकी अशा अनेक विषयांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदींशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान या बैठकीला जाण्यापूर्वी सोमवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर सोमवारी रात्री उशीरापर्यंत ही बैठक सुरु होती.
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षण,
ओबीसी आरक्षणासंदर्भात केद्र सरकारनं सकारात्मक भूमिका घ्यावी.
केंद्र सरकारकडे 102 व्या घटनादुरुस्तीनंतर अधिकार आलेले आहेत.
केंद्र सरकारकडे अधिकार आहेत. त्यांनी निर्णय घ्यावा,अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केल्याचं सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी मोदींसमोर मांडलेले विषय
- मराठा आरक्षणाचा विषय
- विषय इतर मागासवर्ग आरक्षणाबाबतचा हा विषय देशपातळीवरचा आहे.
- मागासवर्गीय बढतीमधील आरक्षण
- मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचा विषय
- जीएसटीचा विषय, वेळेवर जीएसटी येणे
- शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत प्रस्न – पीक कर्ज असतं तसं पीक विमा आहे, त्याच्या अटीशर्तीबाबत चर्चा, महाराष्ट्रात बीड पॅटर्नची माहिती दिली
- गेली काही वर्षे महाराष्ट्रात किनारपट्टीच्या भागात चक्रीवादळं येत आहेत. मदतीचे निकष जुने झाले आहेत, ते बदलणे ९आवश्यक आहे, राज्य सरकारने गेल्यावर्षी निकष बदलून मदत केली. मुळात NDRF चे निकष बदलणे आवश्यक
- चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी
- मराठा भाषेला अभिजात दर्जा मिळावा
नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र कोर्टाकडून रद्द;खासदारकी धोक्यात
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचक हो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा)