काय पेरियार रामस्वामी यांनी स्वत:च्या मुलीशी लग्न केले होते? पेरियार ने अपनीही 40 साल छोटी बेटी से शादी की थी? या प्रश्नांची उत्तरे आपण पडताळून या प्रचारच्या मागील सत्यता जाणून घेणार आहोत.
तुम्हाला गोबेल्स नीती हा शब्द माहिती असेल.आपण तो अनेकवेळा ऐकला/वाचला असू शकतो.ही गोबेल्स नीती काय आहे?
हे सर्वप्रथम आपण जाणून घेऊ.हिटलरचा एक विद्वान सहकारी ज्याचं नाव जोसेफ गोबेल्स.या गोबेल्सची ओळख हिटलरचा एक विश्वासू सहकारी फक्त एवढीच नव्हती तर तो एका अशा प्रचारतंत्राचा जनक म्हणून ओळखला जातो ज्यामुळे जगावर त्याचा दुष्परिणाम दीर्घकाळ होत राहीला आहे.हे प्रचारतंत्र एवढे प्रभावी होते की याच ‘गोबेल्सनीती’मुळे हिटलर सत्तेवर येऊ शकला आणि आपली हिंस्त्र रक्त पिपासू सत्ता टिकवू शकला.
गोबेल्स नीती म्हणजे काय? ती कशी काम करते?
गोबेल्स नीती म्हणजे असत्य गोष्ट सत्य म्हणून सतत मारा करणे,समाजात भय निर्माण करणे.आणि एकच गोष्ट वारंवार सांगत राहणे ‘उत्तम खोटे बोलणे’ आणि ते विविध माध्यमातून समाजात विविध स्तरावर सत्य म्हणून रुजवणे या अजेंड्याला ‘गोबेल्स नीती’ असे म्हटलं जातं.जोसेफ गोबेल्स म्हणायचा एकच गोष्ट (चुकीची खोटी गोष्ट) शंभर वेळा म्हणत राहा सांगत राहा,कालांतराने ती चुकीची खोटी गोष्ट लोकांना खरी/सत्य वाटू लागते.
गोबेल्स नीती कशी काम करते पाहूया जोसेफ गोबेल्स ने वेगवेगळ्या स्तरावर खोट्या गोष्टींचा पद्धतशीरपणे प्रसार करण्याचे तंत्र विकसित केले.त्या तंत्राचा परिणामकारक वापर जर्मनीतील ज्यू लोकांच्या विरोधात करत ज्यू लोकांचा छळ, करणे चर्चवर (ख्रिश्चन) हल्ले करणे, माध्यमात अफवा पसरवणे, एखाद्या विशिष्ट जाती जमाती-धर्माबद्दल द्वेष, चीड निर्माण करत राहणे,त्यांच्याबद्दल तिरस्कार उत्पन्न होईल असे वातावरण प्रचार प्रसार करून निर्माण करत राहणे, तसेच दुसऱ्या आघाडीवर स्वार्थ साधण्यासाठी, समाजातील आपले आर्थिक आणि इतर वांशिक, सामाजिक, सांस्कृतिक हितसंबंध जोपासण्यासाठी कुठल्या तरी गोष्टीबद्दल सतत गैरसमज पसरवणे, अशा प्रकारे गोबेल्स नीती काम करत असते.
आजही जगात नवनवे गोबेल्स तयार होत आहेत
आजही जगात नवनवे गोबेल्स तयार होत आहेत किंवा ते करण्याचे काम सुरू आहे.आपल्याकडेही हे काम होत आहे आणि समाज माध्यमात ट्रोलिंग हा प्रकारही त्यापैकीच एक.तसेच विशिष्ट धर्मियांना कपड्यावरून ओळखा अशी धोकादायक सूचना देणारे राजकीय नेतेही असाच प्रकार करत असतात.तसेच विरोधकांच्या महापुरुषांच्या विरोधात चुकीच्या बातम्या चुकीची माहिती निर्माण करून समाजात त्यांचे चारित्र्य हनन करत राहणे असले प्रकार आता मोठ्याप्रमाणात पाहायला मिळत आहेत.
अलिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,महात्मा क्रांतिसूर्य जोतीबा फुले,सावित्री बाई फुले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहूमहाराज तसेच पेरियार रामास्वामी यांच्या बाबत जाणीवपूर्वक खोट्या बातम्या माहिती देऊन त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम काही विशिष्ट लोकांकडून सुरू असते.
पेरियार यांनी स्वत:च्या मुलीशी लग्न केले होते? पेरियार ने अपनीही 40 साल छोटी बेटी से शादी की थी? जाणून घ्या सत्य
त्यातलाच एक प्रकार म्हणजे हिन्दी मराठीत पेरियार यांनी स्वत:च्या मुलीशी लग्न केले होते,
पेरियार ने अपनीही 40 साल छोटी बेटी से शादी की थी अशा प्रकारे प्रचार करून
त्यांचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न सतत केला जातो आहे.
परंतु आमच्यासारखे जागले हा प्रयत्न खोडून काढून त्यातील असत्य माहितीची पोलखोल करत पर्दाफाश करत राहणार आहोत.
विद्यार्थ्यांनी आंबेडकर आणि पेरियार वाचले पाहिजेत
काय पेरियार रामस्वामी यांनी स्वत:च्या मुलीशी लग्न केले होते? पेरियार ने अपनीही 40 साल छोटी बेटी से शादी की थी?
खरंतर सुप्रसिद्ध तमिळ चित्रपट सृष्टीतील अभिनेता विजय यांनी एका कार्यक्रमात
प्रमुख पाहुणे म्हणून आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटलं की विद्यार्थ्यांनी आंबेडकर आणि पेरियार वाचले पाहिजेत.
यामुळे अनेकांचा तीळपापड होणे जळून खाक होणे स्वाभाविक आहे.
त्यावर खालील प्रमाणे प्रतिक्रिया आल्या.
अखिलेश त्रिपाठी ॲडव्होकेट नावाच्या युजरने ट्विटरवर दावा केला होता की,
“पेरियार यांनी त्यांच्यापेक्षा 40 वर्षांनी लहान असलेल्या आपल्या मुलीशी लग्न केले होते. त्यावेळी पेरियार 70 वर्षांचे होते. कल्पना करा, वयाच्या 70 व्या वर्षी ही व्यक्ती इतकी वासनांध होती की स्वत:च्या मुलीलाही सोडलं नाही, अशी व्यक्ती तुमची आदर्श असू शकते, आमचा नाही, जा आणि पेरियारच्या चुकीच्या कृत्यांचे अनुसरण करा, तुम्हाला कोणीही रोखणार नाही.”
ही व्यक्ती कायद्याचा अभ्यास करून वकील झाली आहे हे इथं विशेष लक्षात घेणे गरजेचे आहे.
त्यांच्या ट्विटरवरील बायोनुसार, अखिलेश त्रिपाठी हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील आणि कर्मठ सनातनी आहेत.
अखिलेश त्रिपाठी हे मंदिर आणि गुरुकुल संवर्धन मोहिमेशीही संबंधित आहेत.
अमलेश सिंग यांनीही ट्विटरवर हाच दावा केला आहे.अमलेश प्रा. दिलीप मंडल यांचे ट्विट कोट-रिट्विट केले, ज्यात त्यांनी लिहिले आहे,
“रिट्विट करा: सामाजिक न्यायाची मशाल हातात सुरक्षित आहे, ज्यांनी NEET च्या अखिल भारतीय जागांवर ओबीसी आरक्षण लागू केले, ज्यांनी सर्व जाती आणि महिलांना मंदिरात प्रवेश दिला. पुजारी नेमले गेले, ज्यांनी तामिळनाडूत EWS लागू होऊ दिले नाही, असे स्टॅलिन बिहारमध्ये येत आहेत.”
अमलेश सिंगच्या ट्विटर बायोमध्ये केवळ राजा रामचंद्र जी के चरणों में आणि युजर नेम इंडिया विथ इजरायल असा उल्लेख आहे.
चेन्नई भाजपच्या राज्य युनिटने त्यांच्या पुण्यतिथी दिवशी श्रद्धांजली वाहण्याच्या नावाखाली दिवंगत (ईव्ही रामासामी) पेरियार यांच्या वैयक्तिक जीवनावर लक्ष्य करणारी आक्षेपार्ह ट्विटर पोस्ट केली तिथून राजकीय वादाला सुरुवात झाली. या ट्विटने एकच खळबळ माजवली, राजकीय पक्षांनी त्याचा निषेध आणि प्रश्न उपस्थित केल्याने भाजपला हे ट्विट डिलिट करत ट्विटरवरून हटविण्यास भाग पडले होते.
अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकारे इंटरनेटवर अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने पोस्ट करून ठेवलेल्या आहेत.ज्यामुळे सत्य उजेडात येणे खूप जिकिरीचे होऊन बसले आहे.
आम्हाला काल एक अशीच प्रोपौगंडा पसरविणारी पोस्ट दिसल्याने यावर सत्य उजेडात आणलं पाहिजे या भावनेने आम्ही ही माहिती आमच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत.
अनिवासी पुणेकर नावाने एकाने अशीच माहिती सोशल मिडियात शेअर करत वाईट भाषेचा वापर केलेला आहे.
Fact -Check तथ्य तपासणी:
व्हायरल दाव्याचे सत्य जाणून घेण्यासाठी Jaaglya bharat टीमने Google वर काही कीवर्ड शोधले.
या काळात आम्हाला अनेक मीडिया रिपोर्ट्स देखील मिळाले.शिवाय आमचा सामाजिक आंबेडकरी चळवळीचा अभ्यास आहेच.
पेरियार यांचे संपूर्ण नाव इरोड वेंकट नायककर रामस्वामी असे आहे. ते एक समाजसुधारक, द्रविड चळवळीचे जनक
आणि विसाव्या शतकातील तामिळनाडूचे प्रमुख राजकारणी होते.न्यूज 18 या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार –
पेरियार यांचा जन्म तामिळनाडूमधील इरोड येथील एका श्रीमंत व्यापारी कुटुंबात झाला.पण लवकरच ते नास्तिक बनले.
वयाच्या 19 व्या वर्षी वडिलांच्या इच्छेनुसार 14 वर्षांच्या नागम्मासोबत त्यांचा पहिला विवाह झाला होता.नागम्माबद्दल असे म्हटले जाते की त्या सर्वांशी मिळून मिसळून राहणाऱ्या स्त्री होत्या. नागम्मा आणि पेरियार यांना एक मुलगी झाली होती पण पाच महिन्यांनी त्या मुलीचा मृत्यू झाला. यानंतर त्यांना मूल झाले नाही. 1933 मध्ये नागम्मा यांच्या मृत्यूनंतर पेरियार यांनी पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानंतर पेरियार हे समाजाच्या उत्थानासाठी त्यांच्या चळवळ कार्याला पूर्णपणे समर्पित झाले.
महिलेशी लग्न केल्याच्या संदर्भात निर्माण झालेल्या मिथकामागील सत्याचा पर्दाफाश
पेरियार हे स्वातंत्र्य लढ्यात संघर्ष करत होते,याशिवाय ते काँग्रेसचे सदस्य देखील होते,त्यावेळी काँग्रेस स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करत होती.पुढे 1919 मध्ये पेरियार यांनी काँग्रेसचे सदस्यत्व सोडलं आणि द्रवीड कळघम नावाने एक नवा पक्ष स्थापन केला.
फेमिनिझम इन इंडिया या वेबसाइटने इंग्रजीमध्ये एक प्रदीर्घ अहवाल प्रकाशित केला आहे ज्यामध्ये पेरियार यांनी त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या महिलेशी लग्न केल्याच्या संदर्भात निर्माण झालेल्या मिथकामागील सत्याचा पर्दाफाश केला आहे.
या इंग्रजी अहवालात असे म्हटले आहे की – मनिअम्माई Maniyammai या जस्टिस पार्टीच्या सदस्य असलेल्या कनागसाबईंच्या कन्या आणि आत्मभान आत्मसन्मान चळवळीच्या तत्त्वांवर कट्टर विश्वास ठेवणाऱ्या होत्या. मनिअम्माई यांनी वयाच्या 20 व्या वर्षी द्रवीड कळघम (पेरियार यांनी स्थापन केलेला पक्ष ) मध्ये आपल्या वडिलांच्या मृत्यू पश्चात प्रवेश केला होता.मनिअम्माई यांना लग्न संस्थेवरच विश्वास नव्हता, त्यामुळे त्याना लग्न करण्यात रस नव्हता आणि समाजाने स्त्रियांसाठी ठरवलेले रूढीवादी जीवन जगण्यास त्यांनी नकार दिला होता.त्या संघटनेसाठी एकनिष्ठ राहिल्या आणि पेरियार यांच्या सर्वात विश्वासू अनुयायी बनल्या.
हे लग्न केवळ कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी
पेरियार यांनी त्यांच्या विदुथलाई या वृत्तपत्रात निवेदन दिले होते की, मनिअम्माई Maniyammai गेल्या पाच वर्षांपासून त्यांची काळजी घेत आहेत. त्या द्रविड कळघम च्या आदर्शांनाही समर्पित आहेत. म्हणून, मी मनिअम्माई यांच्याशी विवाहबंधनात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून कायदेशीर सोपस्कार पार पाडण्यासाठी मी त्यांच्याकडे ट्रस्ट आणि वैयक्तिक मालमत्तेचे अधिकार सोपवू शकेन आणि त्याच वेळी त्याना द्रविड मुन्नेत्र कळघम च्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवता येईल. ती त्यांची राजकीय आणि वैयक्तिक उत्तराधिकारी असेल.
वारसा हक्क देण्याची तरतूद जुन्या हिंदू कायद्यानुसार नव्हती
इथं हे स्पष्ट होते की त्यांनी हे लग्न केवळ कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी केलेले आहे.
जुन्या हिंदू कायद्यानुसार मुलींना संपत्तीवर कायदेशीर अधिकार नव्हता. 1956 पूर्वी, जुन्या हिंदू कायद्यानुसार, स्त्रीला तिच्या वडिलांच्या घरी राहण्याचा अधिकार होता आणि तिला फक्त स्त्रीधानमचा अधिकार होता.आपल्याकडेही स्वातंत्र्योत्तर मुलींना संपत्तीत वाटा मिळाला आणि हा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमामुळे मिळाला आहे.
याविषयी पेरियार यांनी स्पष्टपणे लिहिलं आहे की, “माझ्या आणि माझ्या मालमत्तेसाठी कायदेशीर वारस म्हणून कुणाची तरी नेमणूक (वारस) आताच्या काळात nominee name नामनिर्देशित व्यक्तीचे नाव करणे आवश्यक आहे, आणि त्याची तातडीची गरज आहे, मी मणियाम्मीला 5-6 वर्षांपासून ओळखत आहे, ती खूप एकनिष्ठ आहे आणि माझ्या आणि चळवळीच्या कल्याणाची ती काळजी घेत आहे मला तिला माझा कायदेशीर वारस बनवायचा आहे. मी एक ट्रस्ट डीड लिहून ठेवण्याची व्यवस्था केली आहे, तिला वैयक्तिक विश्वस्त म्हणून आणि ऑपरेशनल आणि भौतिक सुरक्षेसाठी 4,5 लोकांचा समावेश करून ते अधिकार दिले आहेत..”
(28.6.1949 -विदुथलाई)
यावरून हे स्पष्ट होते की, पेरियारचा हेतू फक्त मनिअम्माईला आपला कायदेशीर वारस बनवण्याचा होता. हे लग्न केवळ कायदेशीर कारणांसाठीच झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पेरियार यांच्या लग्नाच्या निर्णयामुळे द्रविड मुन्नेत्र कळघम तुटली.
अण्णादुराई यांनी अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) या नावाने एक नवीन पक्ष स्थापन केला
आणि द्रविड मुनेत्र कळघम चे जवळजवळ सर्व मोठे नेते आणि केडर त्यात सामील झाले.
मनिअम्माई 1974 मध्ये दिल्लीत तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या विरोधात निदर्शने करून देशभर प्रसिद्धी झोतात आल्या होत्या.
रावणलीलेचे आयोजन करताना त्यांनी राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या पुतळ्यांचे दहनही केले होते.तसेच त्यांनी आणीबाणीला उघड विरोध केला.
निष्कर्ष:
जागल्याभारत च्या या वस्तुस्थिती तपासणीवरून स्पष्टपणे दिसून येते की पेरियार यांनी त्यांच्या मुलीशी लग्न केलेले नव्हते, तर त्यांच्या सचिव आणि द्रविड मुनेत्र कळघम सदस्य मनिअम्माई यांच्याशी ट्रस्ट आणि वैयक्तिक मालमत्तेचे अधिकार आणि द्रविड मुनेत्र कळघमच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यासाठी विवाह करावा लागला होता.अखिलेश त्रिपाठी वकील,अनिवासी पुणेकर आणि इतर सोशल मीडिया वापरकर्त्यांचे दावे चुकीचे असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
रेडिट नावाच्या सोशल प्लॅटफॉर्मवर अशीच माहिती आहे.आम्ही सगळीकडे नाही पोचू शकत म्हणून
आपण सर्वांनीच शेअर करून सर्वत्र सत्य पोहोचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
पेरियार यांनी स्वत:च्या मुलीशी लग्न केले होते? पेरियार ने अपनीही 40 साल छोटी बेटी से शादी की थी? हे प्रश्न कॉपीपेस्ट करून
गुगलमध्ये सर्च करा,आणि रिजल्ट मध्ये आलेल्या केवळ जागल्याभारत च्या वेबसाईटवर क्लिक करा.
तुम्हाला हा लेख मिळेल.ही तांत्रिक माहिती हे आर्टिकल सतत वर राहण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी.
मिलिंद धुमाळे
संपादक जागल्याभारत
Fact-Check : 22 तारखेला बुर्ज खलिफा वर भगवान राम यांची प्रतिमा झळकली ? जाणून घ्या सत्य
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FRB 04,2024 | 21:00 PM
WebTitle – Did Periyar marry his own daughter?