महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना इतरांना मुंबईत परतण्याची 24 तासांची मुदत दिली होती,मात्र एकनाथ शिंदे यांनी आता उशीर झाल्याचे सूचक विधान केले होते,एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदें यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आणि इतर काही अपक्ष आमदार गुवाहाटीमध्ये आहेत. असा दावा केला जात आहे.त्यामुळे सरकार दोलायमान स्थितीत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी राज्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी बोलताना आपण या दबावाला घाबरून कधीही भाजपासोबत हातमिळवणी करणार नाही, असं ठणकावून सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस बैठकांमधून आगामी परिस्थितीत काय पावलं उचलावीत, याविषयी सल्लामसलत करत असल्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊतांनी खोचक शब्दांत टोला लगावला आहे.देवेंद्र फडणवीसांनी यात पडू नये,नाहीतर.. असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी यात पडू नये,नाहीतर ..संजय राऊत
‘मी देवेंद्र फडणवीस यांना एक सल्ला देईल,ते बऱ्याच वर्षांपासून राजकारणात आहे, ते चांगले खेळाडू आहे. तुम्ही यात पडू नका, आधी सकाळी झालं होतं ना. आता संध्याकाळी होईल. तुम्ही या भानगडीमध्ये पडू नका. भाजपने जी काही प्रतिष्ठा कमावली आहे, ती धुळीला मिळवू नये. आमचे राजकीय मतभेद असले तरी चांगले संबंध आहे. त्यामुळे त्यांनी या फंद्यात पडू नये, निवडणुकीमध्ये पाहू या, उगाच तुम्ही फसाल. आम्ही आमचं पाहून घेऊ, असा सल्लावजा टोलाही राऊत यांनी फडणवीस यांना लगावला.
तसंच ‘राष्ट्रीय कार्यकारणी ही प्रत्येक पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याची बैठक आज बोलावली आहे. तिथे चर्चा होईल, पक्षाच्या भविष्य़ आणि विस्ताराबाबत चर्चा होणार आहे. पक्ष हा खूप मोठा आहे. देशात हा पक्ष मोठा आहे. या पक्षाला बनवण्यासाठी आम्ही रक्त आटवले आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी प्रचंड मेहनत घेऊन हा पक्ष उभा केला आहे. कुणाकडून पैसे घेऊन हा पक्ष उभा राहिलेला नाही. आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. कुणी तरी महाशक्ती म्हणवणारा पक्ष आमच्या पाठीमागे नाही. शिवसेना हायजॅक केलेला पक्ष नाही .आज हजारो लाखो शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहे. पक्ष एकसंध आहे आणि एकजूट आहे’ असंही राऊत म्हणाले.
XXला पाय लावून का पळाला, आता बकरी सारखे बेबे करू नका
‘त्या आमदारांची सुरक्षा अजिबात सरकारची जबाबदारी नाही. ते महाराष्ट्रातून पळून गेले आहे. XXला पाय लावून पळाले आहे.
त्यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी रक्षक घेऊन गेले आहे.आपल्या राज्यात या, असं वणवण भिकाऱ्यासारखे का भटकत आहात.
असं बकरी सारखं बेबे काय करू नका.सोडून द्या हे सगळं अजूनही वेळ गेली नाही’
असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी
एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या पत्राला सणसणीत उत्तर दिलंय.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
राहुल गांधी यांच्या कार्यालयावर हल्ला,तोडफोड,आठजण ताब्यात
महाराष्ट्राचे तीन तुकडे;तीन वेगळी राज्ये करणार – भाजप नेते उमेश कट्टी
अखेर एकनाथ शिंदे यांच्या नव्या Video मुळे सत्तेच्या संभ्रमाला The End
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 25, 2022, 12:58 PM
WebTitle – Devendra Fadnavis should not interfere , otherwise .. – Sanjay Raut’s warning