मुंबई: राज्यात आर्यन खान आणि मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडत आहेत. हे प्रकरण थांबण्याचे नावच घेत नाही.दररोज नवे लोक पडद्यावर येत आहेत.आता यात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची एंट्री झालेली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी नंतर बॉम्ब फोडणार असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती.त्याप्रमाणे आज त्यांनी मुंबई मध्ये पत्रकार परिषद घेतली.माय मराठीची क्षमा मागून आजची पत्रकार परिषद सुरुवातीला आपण राष्ट्रभाषेत करणार आहोत.
मी एक घोषणा केली होती दिवाळीनंतर काही गोष्टी समोर आणणार आहे. उशीर झाला असं म्हणत पत्रकार परिषदेची सुरुवात हिंदी भाषेत करत राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले.देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती, त्यांची नावे उघड करत मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटींची जमीन फक्त २० लाखांत खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप केला. उद्या सकाळी १० वाजता देवेंद्रजींचा महाराष्ट्रात अंडरवर्ल्डसोबत काय खेळ सुरू आहे आणि देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना कशाप्रकारे पूर्ण शहराला हॉस्टेज बनवलं होतं, त्याविषयी मी माहिती देईन.असं म्हणत नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत हे सगळे आरोप फेटाळून लावले.
माहिती पुरवणारे कच्चे खेळाडू
याविषयी बोलताना नवाब मलिक म्हणाले,आज विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की दिवाळी नंतर फटके फोडणार मात्र त्यांचे फटाके भिजल्यामुळे वाजलेच नाहीत असे दिसते.एक वातावरण तयार केले गेले की नवाब मलिक यांचे बॉम्बब्लास्ट मधिल गुन्हेगारांशी संबंध आहेत.देवेंद्र जी तुम्ही 1999 साली या शहरात एक विधायक म्हणून पहिल्यांदा आलात.62 वर्षाच्या आयुष्यात या शहरात तुमच्या अगोदर दिवंगत मुंडे मंत्री म्हणून होते,तेही लोकांचे संबंध दाऊद सोबत जोडत असत.
परंतु या 62 वर्षात किंवा लोकप्रतिनिधी म्हणून 26 वर्षात कुणीही माझ्यावर असा आरोप करू शकले नाही.
आज एक जमिनी संबंधी काही कागदपत्रं लोकांसमोर ठेवली.
ज्यात असा उल्लेख आहे की दीड लाख फूट जमीन आम्ही कवडीमोल दराने माफियांच्या मदतीने खरेदी केली.
आम्हाला वाटतं की तुम्हाला माहिती पुरवणारे कच्चे खेळाडू आहेत.
तुम्ही सांगितलं असतं तर मीच तुम्हाला कागदपत्रं उपलब्ध करुन दिली असती. पण तुम्ही अंडरवर्ल्डचा खेळ सुरू केलाय.
आज तर त्याविषयीच्या सगळ्या गोष्टींबद्दल मी बोलणार नाही.
पण उद्या सकाळी १० वाजता देवेंद्रजींचा महाराष्ट्रात अंडरवर्ल्डसोबत काय खेळ सुरू आहे
आणि देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना कशाप्रकारे पूर्ण शहराला हॉस्टेज बनवलं होतं, त्याविषयी मी माहिती देईन.
फडणविसांनी राईचा पर्वत केला
माझे कोणत्याही अंडरवर्ल्ड शी संबंध नाहीत.मी ती जागा मुळ मालक मुनिरा प्लंबर यांच्याकडून खरेदी केली,आम्ही तिकडे भाडेकरू होतो. माझ्या सॉलिडस कंपनीचे तिथे गोडाऊन होते.मालक मुनिरा प्लंबर यांनीच मला ऑनरशिपसाठी विचारणा केली.सलीम पटेल याचे वडील तिथं वॉचमेन होते आणि त्यांनी त्या जागेवर स्वत:चे नाव सात बारा मध्ये चढवले होते.त्यालाही आम्ही पैसे देऊन ते कमी करायला लावले.हा सगळा व्यवहार कायदेशीर पद्धतीने झालेला आहे.जो व्यवहार झाला त्याची स्टॅम्प ड्यूटी आम्ही भरली आहे. फडणवीस यांनी बॉम्ब फोडतो म्हणून नुसतेच अवडंबर माजवले आहे.पण आता मी उद्या त्यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन उद्या करून उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार.
मलिक तुम्ही मुंबईच्या मारेकऱ्यांसोबत व्यवसाय का केला? – फडणवीस
जय भीम सिनेमा :व्यवस्थेने दिलेल्या यातनांचा वास्तवदर्शी थरारक अनुभव
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 09, 2021 16:26 PM
WebTitle – Devendra Fadnavis, Hydrogen bomb will explode tomorrow morning – Nawab Malik